✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोपट

ज
जव्हेरगंज यांनी
गुरुवार, 10/08/2015 - 19:31  ·  लेख
लेख
अथांग विश्वात चमचमणाऱ्या चांदण्या तशा असंख्य आहेत. निर्वात पोकळीत एक गोल गोळा भिंगत असेल. गडद ढगांतुन आत शिरल्यावर निळेशार पाणी आणि हिरवीगार झाडं दिसतील. वेगवेगळे देश, दगडधोंडे आणि डोंगररांगा ईकडेतिकडे पसरलेले असतील. नीट निरखुन बघितल्यास आमचं कुरसुंडी हे गाव पण दिसंल. याच गावात आमचं घर आहे. आतल्या खाटेवर मी बसलेला असेन. पण तुम्ही माझ्याकडं बघू नका. हाताकडं बघा. तिथं एक मच्छर बसलेला असेल. फट्याक..!! मारला मी त्याला. बघा आहे की नाय गंमत! आता पुन्हा हळुहळु वर जा. ढगाबिगांच्या खुप वर. लांबवर गेल्यावर मागे वळुन पाहा. गोल गोळा अजुन भिंगताना दिसेल. दुरुनच त्याला साष्टांग ठोका. आणि तसेच पुढे जा! चला नेक्स्ट!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
विज्ञान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10780 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

जव्हेरगंज भौ

बाबा योगिराज
गुरुवार, 10/08/2015 - 19:43 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments

जव्हेरभाऊ.

अभ्या..
गुरुवार, 10/08/2015 - 19:48 नवीन
जव्हेरभाऊ. एकटेएकटे पार्टी तरी करा नायतर मिपावर तरी लिहा. पण एकावेळी एक. आणि एखाद्या दिवशी नाही लिहिलं तर मालक हाकलत नैत लगेच. ;)
  • Log in or register to post comments

लैच रद्दड झालीय कायहो.

जव्हेरगंज
गुरुवार, 10/08/2015 - 19:54 नवीन
लैच रद्दड झालीय कायहो. आसुद्या, चालायचचं. तशीही बालकथा आहे ही. शशक वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एवढ्या खाजगी गोष्टी मुक्त

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/08/2015 - 20:12 नवीन
एवढ्या खाजगी गोष्टी मुक्त संस्थळावर टाकू नयेत भौ. लोकांचे गैरसमज होतात :)
  • Log in or register to post comments

खाजगी बिजगी काय न्हाय! आपलं

जव्हेरगंज
गुरुवार, 10/08/2015 - 21:50 नवीन
खाजगी बिजगी काय न्हाय! आपलं सगळं इम्याजनरी असतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

समजल नाही लिखाण

कविता१९७८
गुरुवार, 10/08/2015 - 20:56 नवीन
समजल नाही लिखाण
  • Log in or register to post comments

ते फ्रीजमधलं जिन्नस...

तर्राट जोकर
गुरुवार, 10/08/2015 - 21:16 नवीन
ते फ्रीजमधलं जिन्नस...
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर कथा !

धर्मराजमुटके
गुरुवार, 10/08/2015 - 21:18 नवीन
अतिशय सुंदर कथा ! पण ते पोपट कुटं ग्येलं ???
  • Log in or register to post comments

आरश्यात बघितला तर दिसेल

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/08/2015 - 23:20 नवीन
आरश्यात बघितला तर दिसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

माझी दाबून ठेवलेली कळ तुझ्या

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/09/2015 - 09:51 नवीन
माझी दाबून ठेवलेली कळ तुझ्या कळफलकातून बाहेर पडली रे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...कळ दाबून ठेवली तर वर

टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 10:16 नवीन
खिक्क...कळ दाबून ठेवली तर वर लिहिले आहे तसे काही तरी प्रसवेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बघीतला हो आरसा !

धर्मराजमुटके
Fri, 10/09/2015 - 16:38 नवीन
बघीतला हो आरसा ! पण तिथे पोपट नाही दिसला. दुसराच पक्षी दिसला. जाऊदे नाव सांगत नाही त्याच जाहिररित्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

असं कसं? आम्हाला तर दिसला

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/09/2015 - 20:53 नवीन
असं कसं? आम्हाला तर दिसला ब्वॉ आरश्यात, लेख वाचल्यावर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

>>>>नीट निरखुन बघितल्यास आमचं

प्यारे१
गुरुवार, 10/08/2015 - 21:20 नवीन
>>>>नीट निरखुन बघितल्यास आमचं कुरसुंडी हे गाव पण दिसंल. नाव कुठं तरी चाववाचल्यासारखं वाटतंय. बाकी अभ्या..शी आम्ही नेहमीच सहमत असतो. आमाला श्या दिल्या तरी!
  • Log in or register to post comments

कुरसुंडी काल्पनिक हाय! तुम्ही

जव्हेरगंज
गुरुवार, 10/08/2015 - 21:39 नवीन
कुरसुंडी काल्पनिक हाय! तुम्ही पण ना.... टीप: कथा काल्पनिक आहे. (!!) सर्वांनी नोंद घ्यावी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय ओ

पैसा
गुरुवार, 10/08/2015 - 21:48 नवीन
त्या माई तुमच्या गावच्या का? हळदीकुंकवाला बोलावलं तर आल्या नाहीत तेव्हापासून शोधतेय त्यांना.
  • Log in or register to post comments

व्हय जी. तुमचा नीरुप धाडतु

जव्हेरगंज
गुरुवार, 10/08/2015 - 21:56 नवीन
व्हय जी. तुमचा नीरुप धाडतु त्यास्नी. सध्या त्या धोतरं वर करीत असत्यात. आय मीन कपडे धुण्याचा व्यवसाय हाय त्यांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चला... माईंचे हे स्वतःच

अस्वस्थामा
गुरुवार, 10/08/2015 - 23:45 नवीन
चला... माईंचे हे स्वतःच मिपावर आलेले दिसतायत.. ;) बादवे, मस्त लिहिलंय हो.. जिलबी प्रकारात आजकाल असं दर्जेदार कै पडत नै फार काही. त्या अभ्या..ला मनावर घेऊ नका. त्याचा तांब्या एकतर थंडावलाय अन इतरांना पण आसं डिस्करेज करतोय वरुन.. ;) आता सिरियस नोट, एकंतर ध्यानस्थ होण्याच्या प्रक्रियेचा हा अस्तित्ववादी आविष्कार असे म्हणता येईल. आपले पूज्य सर तसेच इतर तज्ञ याबद्दल बरेच सांगून गेले आहेतच. जेव्हा ध्यानाच्या अत्युच्च पातळीवर जडत्वापासून मुक्ती मिळते तेव्हा निर्वातातून विश्व दर्शनाचेच वर्णन लेखकाने सुरुवातीस केलेले दिसतेय. जशी मनोवस्था परत जडत्वाकडे झुकू लागेल तसे मग ढग, झाडे इ. इ. चराचराचे अस्तित्व दर्शवणारे घटक जाणवू लागतील. मग लेखकु आपल्याला सुक्ष्मात घेवून जातो आणि हातावरचा डास दाखवतो. हा तुमचा "मी" चा निदर्शक आणि त्याचेच रुपकात्मक निर्दालन दर्शवून लेखक गोळीबंद असा परिणाम साधतो तेही अगदी थोडक्या शब्दात. तिथेच "फट्याक" असा नादसूचक मांडून हा परिणाम अगदी वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतो. शेवटची दोन (होय दोन!!) अवतरणे तर यात अजूनच भर घालतात. यानंतर ध्यानाची एक महत्वाची पायरी की फक्त सरांनीच इथे मांडली परंतु कोणालाही तेव्हा समजली नव्हती ती म्हणजे पुन:श्च जडत्वाकडून अनंताकडे जाणे. लक्षात घ्या की इथे शॉर्टकट नाहीत. तेव्हा ज्या मार्गाने आलात त्याच मार्गाने सांगता इतकाच साधा सरळ याचा अर्थ. या सर्वांवर कडी म्हणजे लेखकाने केलेला शेवट.!! याला तोडच नाही. "चला नेक्स्ट" असे म्हणून लेखक तुम्हाला आता पुढच्या यत्तेसाठी तयार करत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याही जाणिवेच्या प्रवासासाठी तयार करत आहे. निव्वळ अप्रतिम.. अजून येवू द्या असेच तुमच्या अप्रतिम प्रतिभेचे पैलूदार मौक्तिक. आणि असाच आस्वाद घेण्याची संधी मिळू द्या मिपाकरांना.. .. .. .. (अगदी अतिअवांतर : कै चिलमीचा बार लावलावता कै रे भौ.. अनि डासाने काशी केली मधीच? ;) )
  • Log in or register to post comments

आयडी बंद झालेल्या दिस्तोय.

तर्राट जोकर
Fri, 10/09/2015 - 00:00 नवीन
आयडी बंद झालेल्या दिस्तोय. अक्सेस डिनायड बिल्ला नंबरः18002
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

हा..हा..हा..

चांदणे संदीप
Fri, 10/09/2015 - 00:17 नवीन
कहर प्रतिसाद! ते पायांचा फूटु काडैची पद्धत बंद झाली नसेल तर एक काढून ठेवा आमच्यासाठी, येतोच! ____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

आर्र... स्वारी

चांदणे संदीप
Fri, 10/09/2015 - 00:21 नवीन
आर्र... स्वारी बर्का जव्हेरगंजभौ... ते लेख आवाल्डा हे सांगैच राहूनच गेल्त! तुमचाबी एक फूटु मारून ठेवा, कुरसुंडीच रिझर्वेशन करतोय! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हा हा हा..

अस्वस्थामा
Fri, 10/09/2015 - 14:08 नवीन
हा हा हा.. बस का संंदीप भौ.. ;) उगी हरभर्‍याचं झाड दाखवू नका राव.. जिलबी संप्रदायाचे शिष्य खवळिले ना तर मिपा ढवळतील.. @जोकरराव, ते "संक्षी सर" आता मिपा-दीर्घ संन्यासवासी झाले आहेत. परंतु त्यांचे लेखन वाचायचे असल्यास सापडू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

तिथं एक मच्छर बसलेला असेल.

मदनबाण
Fri, 10/09/2015 - 03:40 नवीन
तिथं एक मच्छर बसलेला असेल. फट्याक..!! मारला मी त्याला. या रतिबाच्या मागे साला एक मच्छर आहे तर ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर
  • Log in or register to post comments

काय काल बम बम भोले का?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/09/2015 - 06:48 नवीन
काय काल बम बम भोले का?
  • Log in or register to post comments

अत्यंत रटाळ कथा वाचायला

जव्हेरगंज
Fri, 10/09/2015 - 08:42 नवीन
अत्यंत रटाळ कथा वाचायला दिल्याबद्दल क्षमस्व. वैयक्तिक हल्ले टाळल्यास बरे होईल.
  • Log in or register to post comments

@जव्हेरगंज, कथा रटाळ नाहीय हो

अस्वस्थामा
Fri, 10/09/2015 - 14:11 नवीन
@जव्हेरगंज, कथा रटाळ नाहीय हो. चांगलीच आहे हे मनापासून सांगतोय. तेव्हा लिहित रहा. चेष्टा मस्करी तेवढी चालतेच हो. (तुम्ही कशाला वैयक्तिक हल्ले म्हणताय ते ठौक नै त्यामुळे पास)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

का य कू

नाखु
Fri, 10/09/2015 - 08:56 नवीन
लिखाण नसे हिरवट (तरी) चल हाण धोपट हा राघू जो ना दिसला ना ऊडला ======================== "काय कू" नाखु
  • Log in or register to post comments

अबाबा.. ही कथा स्पष्ट करायला

द-बाहुबली
Fri, 10/09/2015 - 14:28 नवीन
अबाबा.. ही कथा स्पष्ट करायला जव्हेरभाउंनी अजुन एक लेखमाला लिहावी अशी विनंती आहे. - अखिल्मिपीयगोंधळल्यालेसदस्यहक्कनिवारण्मंच्सदस्य
  • Log in or register to post comments

बरं बरं, केव्हापासून होतंय हे

सूड
Fri, 10/09/2015 - 15:27 नवीन
बरं बरं, केव्हापासून होतंय हे असं?
  • Log in or register to post comments

ओह आय सी!

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 20:48 नवीन
ओह आय सी!
  • Log in or register to post comments

जाऊ द्या रे खाली, आता वर आणू

जव्हेरगंज
Fri, 10/09/2015 - 21:04 नवीन
जाऊ द्या रे खाली, आता वर आणू नका. लैच भंकस धागा आहे.
  • Log in or register to post comments

Your past comes back to haunt

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/09/2015 - 21:14 नवीन
Your past comes back to haunt you! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा