हादगा
लेखनविषय (Tags)
आमची सोसायटी तशी कास्मोपाँटियनच. हादग्याची तोंडओळख सुद्धा अनेकाना नव्हती पण कामत काकूनी ती करून दिली.
नव्हे हादगा जोरात सुरु झाला. यंदाच हे चौथं वर्ष, पण त्याला थोडी कारुण्याची किनार लागली होती. यंदा हादगा बसवायचा की नाही इथून सुरवात होती, कारण काकूंची नात पल्लवी त्यात सहभागी असणार नव्हती. ती आता कराडला असते आपल्या नव्या घरी नव्या बाबा बरोबर, नवीन आजी बरोबर. जवळजवळ एक वर्षच झालं म्हणायचं की त्या घटनेला. काकूंचा धाकटा मुलगा चिंतन, सिव्हील इंजिनियर, दिवाळीच्या तोंडावरच डोकं दुखायची तक्रार करु लागला, पंधरा दिवस गेले असतील नसतील, डायरेक्ट मेंदुतज्ञनं गाठावा लागला. आणि पुढं आठ दिवसात सारा कारभारच आटपला. दुखाचा डोगंरच कोसळला कामत कुटूंबावर. कामत काकांनी मात्र धीर सोडला नाही. सुनेला सांगीतलं आता हे तुझं दुसरं माहेर समज. आणि दोन महिन्यातच तिचा पुनर्विवाह कराडच्या अशाच एका दुर्घटना ग्रस्त प्रभू कुटूबातल्या हेमंतशी करून दिला.
काकूंची ४ वर्षाची नात पल्लवी आता कराडला असते. कामत काकानी कटाक्षानं कमीतकमी संबंध ठेवले सूनेशी, कोणतीही ढवळाढवळ नको या हेतुनं. काकूंनी पण काळजावर दगड ठेवला. मुलगाही गेला नातही द्रुष्टिआड झाली. हादग्याचं रहित करावं असं आम्ही जवळजवळ सर्वच मुलिनी असं ठरवलं होतं. पण कांकूकडूनच कोणाकडून तरी निरोप आला, दरवर्षी सारखा तो करा. जड अंत:करणानं आम्हीही तयारी केली. आदलेदिवशी देसाई काकांच्या घरी एक मिटींग घेतली.
इकडं मुलीनि फेर धरलाय आणि तिकडं कामत काकूनी कोंडून घेतलंय स्वतःला आत घरात.
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, काय ठसक्यात म्हणायची पल्लवी. तसंच वाटतंय, छे भासच तो दुसरं काय? पुन्हा तसाच ठसका. काकूंनी खिडकी किलकिली करून बाहेर डोकावलं. डिट्टो पल्लवी, तेच परकर पोलकं मुद्दाम या सोहळयासाठी, परंपरेसाठी हौसेनं त्यानी शिवून घेतलेलं. बाहेर येवूनच बघावं बरं म्हणून त्या बाहेर आल्या, ही तर पल्लवीच आपली पल्लूच, चिंतनची अखेरची निशाणी. त्यांचा डोळ्यवर विश्र्वासच बसेना. मग त्या स्वतःच्या राहिल्याच नाहीत, पळत येवून पल्लवीला घट्ट मिठीत घेतलं. तिचे मुक्यावर मुके घेत सुटल्या.
"काकू तुमच्या पल्लवीशिवाय हादगा कसा होईल?" आम्ही मुलिंनी देसाईकाकांच्या गाडीतून सकाळीच तिला आणलं होतं ,
काकू तुमच्यासाठी, आमच्या कामत काकूसाठी, आम्ही काकुंना बोलत्या झालो. आणि त्यांनंतर आम्ही फक्त निरीक्षक उरलो.
प्रतिक्रिया
शेवट गोड झाला
+१
:)
आवडली गोष्टं!
छान
दु:खातून सुखाकडे... जग पुढेच
आवडली गोष्ट
छान
१+ छान.
हादगा म्हनजे काय...?
तुमको पितृपक्ष नै मालूम, नवमी
असं नै कै... पितॄपक्ष मालूम
>>> हमारे उदर ऐसा कुच नै होता
... आमच्या कडे ही गाणी
असं असं!!
हादग्याला पुण्याकडं भोंड्ला
तुमचा प्रतिसाद नंतर वाचला...
वा!
कामात काका काकुंचीच गरज आहे
कामात?? कश्याप्रकारच्या?..,
हाहाहाहाहाहाहाहाहाहा
सुखांत गोष्ट आवडली. :)
हादगा गाणी
फार छान कथा. आवडली.
सुंदर !!
रडवलंत...
छायाचित्र विनंती
मस्त
नाखूनकाका, किती गोळ्या माराल
प्यारे भौ
आपल्याला कै कल्पना नै.
माहिति / दुजोरा हवा
हादग्याची फुले