शेझवान बटाटे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
7 Oct 2015 - 11:01 pm

साहित्य-
३ ते ४ मध्यम उकडलेले बटाटे
लाल,पिवळी,हिरवी भोपळी मिरच्या- मध्यम आकाराची प्रत्येकी एक
रंगीत मिरच्या न मिळाल्यास हिरव्या भोपळी मिरच्या घ्या.
१ मध्यम कांदा
२-३ मोठ्या लसूण पाकळ्या बारीक चिरून. लसूण पाकळ्या लहान असतील तर ५-६ घ्या.
पेरभरं आलं बारीक चिरून
२ गर्द हिरव्या मिरच्या बारीक चिरून
३-४ पोपटी जाड्या मिरच्या (मिरचीवड्यासाठी घेतो त्या)
२ टेबल स्पून सोया सॉस
२ ते ३ टेबलस्पून शेझवान सॉस
२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
मीठ चवीनुसार
१ टी स्पून मोनोसोडिअम ग्लुटामेट (अजिनोमोटो)- ऑप्शनल
तेल, पाणी
सजावटीसाठी एक कांदापात- बारीक चिरून
.

कृती-
उकडलेल्या बटाटयाचे भाजीसाठी करतो त्यापेक्षा थोडे मोठे तुकडे करा.
भोपळी मिरच्या चौकोनी चिरा.साधारण वाडगाभर भोपळी मिरच्यांचे तुकडे हवेत.
कांदा उभा पण जाडसर चिरा व फार मोठा वाटला तर मध्ये कापा.
आले,लसूण व डार्क हिरव्या मिरच्या बारीक चिरा.
पोपटी मिरच्या मध्ये फोडून उभ्या चिरा व त्याचे दोन ते तीन तुकडे करा.
डावभर तेल तापत ठेवा, त्यात बारीक चिरलेला लसूण , आलं, मिरच्या घाला. आच मोठी ठेवा.
ते परतले गेले की कांदा घालून परता.
पोपटी मिरच्यांचे तुकडे घाला.
अर्धे सोया सॉस व शेजवान सॉस घाला आणि परता.
रंगीत भोपळी मिरच्या घालून परता.
उकडलेले बटाटे घाला.
उरलेले अर्धे सोया व शेजवान सॉस घालून परता.
कॉर्नफोअरची अर्धी वाटी पाण्यात पेस्ट करून घ्या व ती त्यात घाला.
चवीनुसार मीठ घाला. हवे असल्यास ग्लुटामेट घाला. ते खारट असते त्यानुसार मीठाचे प्रमाण पहा.
कांद्याच्या पातीने सजवा.
सर्व वेळ आच मोठी राहू द्या.
फ्राइड राइस्/न्यूडल्स बरोबर खा.

.

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

7 Oct 2015 - 11:07 pm | आदूबाळ

जबरी दिसताहेत!

पैसा's picture

7 Oct 2015 - 11:09 pm | पैसा

खूपच छान! अजि नो मोटो वगळून नक्की करणार!

अभ्या..'s picture

8 Oct 2015 - 12:18 am | अभ्या..

हम्म. तेवढेच त्रासदायक चायनीजात. ;)
बाकी भारी डिश. आवडली.

रातराणी's picture

7 Oct 2015 - 11:18 pm | रातराणी

स्लर्प...

लै भारी फोटू व कृतीही मस्त!

दिवाकर कुलकर्णी's picture

8 Oct 2015 - 12:16 am | दिवाकर कुलकर्णी

घरच्याना कामालालावणार,

स्रुजा's picture

8 Oct 2015 - 1:38 am | स्रुजा

आह् !!! कहर फो टु आलाय...

dadadarekar's picture

8 Oct 2015 - 5:54 am | dadadarekar

मस्त

नक्की करुन बघणार! बटाट्यामुळे आनंद झालेली स्मायली कल्पावी;)

अमृत's picture

8 Oct 2015 - 9:47 am | अमृत

नक्की करून बघणार. यावर जर थोडे तीळ भुरभुरलेत तर अजून छान लागतील ना.

पियुशा's picture

8 Oct 2015 - 10:10 am | पियुशा

वा यम्मी दिसतय :)

सस्नेह's picture

8 Oct 2015 - 10:22 am | सस्नेह

जबरा फोटो !
कृती अंमळ किचकट वाटली.

दिपक.कुवेत's picture

8 Oct 2015 - 1:18 pm | दिपक.कुवेत

पण बटाटे उकडुन घेण्यापेक्षा कच्चेच तुकडे करुन तळून घेतले तर? चव कदाचीत खुलेल शीवाय कुरकुरीतहि राहतील (अर्थात हा फक्त अंदाज). उकडलेल्या बटाट्यांचा कदाचीत लगदा होईल ना?

स्वाती दिनेश's picture

8 Oct 2015 - 3:41 pm | स्वाती दिनेश

बटाटे तळून घेतले तर कदाचित शेजवान आणी सोया सॉस आतपर्यंत मुरणार नाही. आणि कॅलरी....? आधीच बटाटा त्यात तळला म्हणजे... :)
उकडलेले बटाटे सर्वात शेवटी घालायचे आहेत, लगदा नाही होत. आपण बटाट्याची उकडून भाजी करताना कुठे होतो लगदा?
स्वाती

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 4:08 pm | वेल्लाभट

आणि कॅलरी....? आधीच बटाटा त्यात तळला म्हणजे... :)

घाबरू नका. बटाट्याचं नाव उगीच बदनाम झालंय. त्यात फक्त ११० कॅलरी असतात आणि शून्य फॅट. खूप कॉम्प्लेक्स कार्बस असतात जे तुमच्या शरीराचा प्राथमिक ऊर्जास्त्रोत आहेत.
Are potatoes healthy? Yes they are!

It’s a surprise for many to discover one medium potato (5.3 oz) with the skin contains:

45 percent of the daily value for vitamin C
More potassium (620 mg) than even bananas, spinach, or broccoli;
10 percent of the daily value of B6;
Trace amounts of thiamine, riboflavin, folate, magnesium, phosphorous, iron, and zinc

…and all this for just 110 calories and no fat, sodium or cholesterol.

बाकी तपशील http://www.potatogoodness.com/nutrition/ वर बघा.

सानिकास्वप्निल's picture

8 Oct 2015 - 7:31 pm | सानिकास्वप्निल

बटाटे अर्धवट उकडून मग तळले की छान लागतात ह्या पाकृत दिपक. ही पाकृ बघू शकतोस.

मधुरा देशपांडे's picture

8 Oct 2015 - 1:20 pm | मधुरा देशपांडे

फोटो बघुन लगेच फ्रांफुला यावेसे वाटतेय.

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 1:25 pm | वेल्लाभट

करणार..
सहीच इनोवेटिव्ह प्रकार केलायत... वाह..
आवडला...

पद्मावति's picture

8 Oct 2015 - 1:44 pm | पद्मावति

यम्मि बटाटे. खूपच मस्तं पाककृती आणि फोटोसुद्धा.

तुषार काळभोर's picture

8 Oct 2015 - 2:10 pm | तुषार काळभोर

अंडं (पा.कृ.त) घालून कशी करावी?

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 3:24 pm | टवाळ कार्टा

पाकृ बन्वून झाली की वर आम्लेटचे झाकण ठेवावे :)

स्वाती दिनेश's picture

8 Oct 2015 - 3:43 pm | स्वाती दिनेश

बटाट्यांऐवजी उकडलेली अंडी त्यात घाला,
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

8 Oct 2015 - 7:33 pm | सानिकास्वप्निल

तूझी पाककृती छान, सुटसुटीत आहे. मी पूर्ण उकडलेले बटाटे वापरुन ह्याआधी कधी बनवले नाहीये पण आता ही पाकृ नक्की बनवून बघेन, अनायसे घरात सगळे सामान आहेच, उद्याच करते आणि कळवते ताई :)
फोटो मस्तं आहे.

कविता१९७८'s picture

8 Oct 2015 - 8:57 pm | कविता१९७८

वाह जबरी

प्रसाद गोडबोले's picture

8 Oct 2015 - 9:01 pm | प्रसाद गोडबोले

उकडलेले बट्टाटे फारच जड होतात राव , त्या ऐवजी बटाट्याचे कुरकुरीत फिंगर चिप्स किंव्वा साबुदाण्या बटाट्याच्या चकल्या वापरल्यास पाककृती हलकी आणि खरपुस होईल असे सुचवतो .

- उंटावर बसुन शेळ्या हाकणारा
प्रगो

मदनबाण's picture

9 Oct 2015 - 3:18 am | मदनबाण

झटपट सोपी पाकॄ. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

सविता००१'s picture

10 Oct 2015 - 11:26 am | सविता००१

करणार लगेच :)

त्रिवेणी's picture

10 Oct 2015 - 3:26 pm | त्रिवेणी

आवाक्यट्ली पाकृ आहे सो नक्की करणार

foto freak's picture

14 Oct 2015 - 12:08 pm | foto freak

तों.पा.सु

जागु's picture

14 Oct 2015 - 12:43 pm | जागु

मस्त डिश.

अनन्न्या's picture

15 Oct 2015 - 9:11 am | अनन्न्या

नक्की करून पाहते, आता नवरात्र संपल्यावर!