बाप्पाचा नैवेद्य : वाटली डाळ

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Sep 2015 - 10:13 am

अनंत चतुर्दशी, बाप्पा घरी जायला निघणार आज. निरोपाच्या प्रसादात वाटली डाळ हवीच, नाही का?

या वाटल्या डाळीची पाककृती मीच पूर्वी मिपावर दिली आहे. पण आज जी वाटली डाळ इथे देते आहे ती प्रसादाची असल्याने त्यात कांदा घालायचा नाही.

साहित्य- २ वाट्या हरबरा डाळ, ४,५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, १ चहाचा चमचा साखर, तेल, फोडणीचे साहित्य, ओले खोबरे, कोथिंबिर, लिंबू
कृती- डाळ ५ ते ६ तास भिजत घालावी नंतर उपसून चाळणीवर घालून स्वच्छ धुवून घ्यावी व भरड वाटावी, वाटतानाच त्यात मिरच्या घालाव्यात.
साधारण पळीभर तेलात फोडणी करावी, त्यात भरड वाटलेली डाळ घालावी व नीट मिक्स करुन झाकावे व एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात मीठ व साखर घालून ढवळावे व परत झाकण ठेवून चांगल्या वाफा आणाव्यात. नंतर त्यात थोडे ओले खोबरे आणि कोथिंबिर घालावी व अजून एक वाफ आणावी.
गणपती विसर्जना नंतर हा प्रसाद सर्वांना वाटावा.
.
.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

27 Sep 2015 - 10:21 am | कविता१९७८

छान रेसिपी

मितान's picture

27 Sep 2015 - 10:27 am | मितान

मस्त रेसिपी!!
डाळ भिजत घातली आहे :)

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 10:32 am | मांत्रिक

छान आहे रेसिपी.

पियुशा's picture

27 Sep 2015 - 11:13 am | पियुशा

मला खुप आवड्ते अशी दाळ :)

पद्मावति's picture

27 Sep 2015 - 1:52 pm | पद्मावति

खुपच छान. फोटोही मस्तं.

पैसा's picture

27 Sep 2015 - 2:31 pm | पैसा

जाम चटकदार लागते! फोटो खासच आहे!

प्रचेतस's picture

27 Sep 2015 - 2:55 pm | प्रचेतस

वाटली डाळ मस्तच.
ओली वाटली डाळ पण भारी लागते.

उद्या परवामध्ये करणार ही डाळ. तुझी किंचित वेगळी पद्धत आहे. डाळीमध्ये मिरच्यांबरोबर उगीच पाव इंच आल्याच्या तुकडा व पाव वाटी दूध घालते (म्हणजे आई घालते म्हणून मीही घालते). बाकी कृती अशीच.

हेमंत लाटकर's picture

28 Sep 2015 - 11:53 am | हेमंत लाटकर

मला लहानपणी (आताही) वाटलेली दाळ खुप आवडत असे. चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी सर्व घरात वाटलेली दाळ करतात. माझी आई हळदी कुंक घेऊन वाटलेली दाळ आणे आणि ती खाण्यासाठी माझ्यात व ताईत भांडणे होत. त्यावर उपाय एक दिवस मी व एक दिवस ताई खाण्याचा असे. माझी आई आंध्रातील असल्यामुळे दोसा, इडली-सांबार, उपमा छान करते तसेच गुळाचे व तिळाचे कैरीचे लोणचे छान करते.

स्वाती दिनेश's picture

28 Sep 2015 - 1:16 pm | स्वाती दिनेश

चैत्रगौरीला आंब्याची डाळ व पन्हे करतात.
स्वाती

हेमंत लाटकर's picture

28 Sep 2015 - 7:17 pm | हेमंत लाटकर

चैत्रगौरीला आंब्याची डाळ व पन्हे करतात.

आमच्या मराठवाड्यात वाटलेली दाळ व कैरीचे पन्हे करतात.

सानिकास्वप्निल's picture

28 Sep 2015 - 4:01 pm | सानिकास्वप्निल

लिंबाची वाटली डाळ आवडते.
कैरी नसली तरी लिंबू पिळून हवे तेव्हा करता येते, आम्ही ह्यात आले घालतो.
छान आहे पाककृती, लवकरच करावी लागणार.
फोटो मस्तं.

वाटली डाळ अर्थात मोकळं तिखट हा पदार्थ मस्तच लागतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)

दिवाकर कुलकर्णी's picture

28 Sep 2015 - 10:20 pm | दिवाकर कुलकर्णी

पन्नास,पंच्चावन्न वर्षामागच्या आठवणी ताज्या केल्या.
वाटली डाल आणि पन्ह !! ती गौरीची आरास, व्वा क्या बात है

विसर्जनाच्या दिवशी करणे नाही जमले.
पण आता करणार आहे.
प्रसाद म्हणून नाही.. तशीही आवडते.

dadadarekar's picture

29 Sep 2015 - 7:48 pm | dadadarekar

चैत्रात करतात ती डाळ कच्चीच असते. वर फोडणी घालतात.

वाटली डाळ करताना एखादी वाफ पुरणार नाही. भरपूर खमंग परतून दणदणीत वाफ आणावे लागेल.

dadadarekar's picture

29 Sep 2015 - 7:49 pm | dadadarekar

ही पाककृती या दोन्हींच्या मध्ये असणारी कृती वाटते.

स्वाती दिनेश's picture

30 Sep 2015 - 12:07 pm | स्वाती दिनेश

एखादी वाफ पुरत नाही.. हे पहा..
नंतर त्यात मीठ व साखर घालून ढवळावे व परत झाकण ठेवून चांगल्या वाफा आणाव्यात.
स्वाती

अनन्न्या's picture

30 Sep 2015 - 4:42 pm | अनन्न्या

विसर्जनाच्या दिवशी ओले खोबरे + साखर असा प्रसाद असतो आमच्याकडे.

इशा१२३'s picture

30 Sep 2015 - 6:49 pm | इशा१२३

आवडता पदार्थ!
छान फोटो.

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:37 pm | दिपक.कुवेत

हि डाळ खाताना कोरडी असल्याने ढास लागते. घसा कोरडा होतो.

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 2:43 pm | प्यारे१

माई मोड ऑन....
अरे दिपु, एखादा घास प्रसाद म्हणूनच खायची असते रे वाटली डाळ. आणि हळू खा हो. बोकणा नाही भरायचा चोरासारखा. मग नाही लागायची ढास.
...माई मोड ऑफ.

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:51 pm | दिपक.कुवेत

हे असे कोरडेच उपदेशाचे डोस नाहि द्यायचे. आता तू केलीस तरच मी खाईन.