बाप्पाचा नैवेद्य : पातोळ्या आणि पातोळे

पैसा's picture
पैसा in पाककृती
27 Sep 2015 - 10:10 am

पातोळ्या आणि पातोळे हा कोंकणातला आवडता प्रकार आहे. साधारण नागपंचमीला, गौरीच्या नैवेद्यात, दसर्‍याला म्हणजे जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात तेव्हा पातोळ्या हौसेने केल्या जातात. गोव्यातले कॅथॉलिक ख्रिश्चन लोकही त्यांच्या सांजाव सणाला आवर्जून पातोळ्या करतात. सुकूर पर्वरीला १५ ऑगस्टला पातोळ्यांचे फेस्त (जत्रा) भरते.

पातोळ्या प्रकार १)

साहित्यः

१ वाटी तांदूळ
नारळाच्या एका वाटीचे ओले खोबरे
खोबर्‍याच्या अर्धा गूळ
किंचित मीठ
पाणी
वेलची पूड/जायफळ पूड आवडीप्रमाणे
हळदीची पाने

कृती:

तांदूळ सुमारे ४/५ तास भिजत घालावेत. मग किंचित मीठ घालून बारीक वाटावेत. भज्याच्या पिठाहून दाट पण भाकरीच्या पिठाहून सैल ठेवावे.
ओले खोबरे व गूळ एकत्र करून शिजवून मोदकाच्या पुरणासारखे पुरण तयार करून घ्यावे.
हळदीची पाने धुवून पुसून घ्यावीत. तयार पीठ हळदीच्या पानावर पसरावे. त्यावर थोडेसे पुरण घालून उभी किंवा आडवी आवडीप्रमाणे घडी करावी. पिठामुळे पानाच्या कडा चिकटून रहातात. अशी सर्व पाने तयार करून घ्यावीत. या पातोळ्या एका चाळणीत किंवा डब्यात ठेवून मग कूकरची शिटी काढून त्यात किंवा इडलीच्या कूकरमधे किंवा मोदकपात्रात ठेवून १५ मिनिटे उकडून घ्याव्यात. झाकण उघडून जरा थंड होऊ द्याव्यात. हळदीचे पान सोडवून तुपाबरोबर खाव्यात.

1

काही कॅथॉलिक ख्रिश्चन लोक या पातोळ्यांचे पीठ तयार करताना वाटलेले पीठ मंद विस्तवावर ठेवून थोडे शिजवून उकडीप्रमाणे मळून घेतात. ख्रिश्चन लोकांचा पातोळ्यांचा दुसरा आवडता प्रकार म्हणजे फणसाच्या पानाचे कोन तयार करून त्यात उकडलेल्या पातोळ्या. त्यांना अर्थातच वेगळा वास येतो.

प्रकार २) अशाच हरभर्‍याच्या डाळीचे पुरण घालून किंवा तांदुळासोबत फणसाचे पिकलेले गरे वाटूनही पातोळ्या करतात.

प्रकार ३) तांदूळ भिजत घालून वाटण्याऐवजी तांदुळाच्या पिठीची मोदकाप्रमाणे उकड काढून त्याच्या पातोळ्या करतात.

पातोळे: रत्नागिरीकडे काकडीचे पातोळे करतात.

साहित्य :

मध्यम काकडी
१ वाटी तांदुळाचे पीठ
२ चमचे रवा
१/२ वाटी चिरलेला गूळ
थोडेसे ओले खोबरे
१ चमचा तूप
किंचित मीठ
आवडीप्रमाणे वेलची पूड/जायफळ पूड
हळदीची पाने

कृती:

काकडी किसून घेऊन (हळदीची पाने वगळून) इतर साहित्य त्या किसात घालावे आणि एकत्र करून शिजत ठेवावे. २ वाफा काढाव्यात. मग हे मिश्रण थंड होऊ द्यावे. हळदीच्या पानात गोलसर आकारात थापून पानाच्या उरलेल्या अर्ध्या भागाने झाकावे आणि कूकरची शिटी काढून किंवा इडली कूकरमधे किंवा मोदकपात्रात चाळणीवर/डब्यात ठेवून १५ मिनिटे उकडून घ्यावेत.

हळदीची पाने सोडवून तुपाबरोबर खावेत.

(पातोळ्यांची डिटेल पाककृती अनन्न्याच्या या धाग्यात बघा.)

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

27 Sep 2015 - 10:21 am | कविता१९७८

वाह छानच

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 10:22 am | मांत्रिक

मस्तच आहे!!! झक्कास रेसिपी!!!

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 10:25 am | मांत्रिक

बेळगावकडे काकडीच्या तिखट पातोळ्या करतात. म्हणजे वरीलप्रमाणेच पण त्यात मिरची, आले, जिरे ठेचून घालतात. सोबत ओल्या नारळाची चटणी व बटाट्याची सुक्की भाजी. अप्रतिम लागतात. त्याला बहुतेक रासोळ्या म्हणतात.

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 10:29 am | मांत्रिक

रासोळ्या: तांदुळ पीठ + मिरची, आले, जिरे, काकडीचा खीस. घावनच्या पिठासारखे पातळ करतात. बिडाच्या तव्यावर जरा जादा तेल घालून घावनप्रमाणेच भाजतात. सुंदर लागतात.

पैसा's picture

27 Sep 2015 - 2:28 pm | पैसा

छान वाटतंय. आम्ही असे काकडीच्या किसाचे घावन करतो. पण गोड.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2015 - 10:48 am | बोका-ए-आझम

हे थोडं पानगीसारखं वाटतंय.

पैसा's picture

27 Sep 2015 - 2:29 pm | पैसा

पण पानगीमधे पुरण घालत नाहीत. गूळ चिरून पिठात मिसळून डारेक्ट पानात शिजवतात.

पियुशा's picture

27 Sep 2015 - 11:11 am | पियुशा

मस्त मस्त मस्त !

पद्मावति's picture

27 Sep 2015 - 1:46 pm | पद्मावति

अरे वाह, मस्तं. गरमागरम पातोळ्या आणि वर साजूक तूपाची धार, सुपर्ब लागत असणार.

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2015 - 2:06 pm | स्वाती दिनेश

डिलिशिअस!
स्वाती

प्रचेतस's picture

27 Sep 2015 - 2:48 pm | प्रचेतस

अस्सल कोंकणी पाककृती.
जबरी एकदम.

प्रचेतस's picture

27 Sep 2015 - 2:52 pm | प्रचेतस

तांदळाच्या उकडलेल्या पीठापासून बनवलेला निवगऱ्या का असा काहीसा प्रकार खाल्ला होता एकदा. जीरे, मिरची घालून केलेला. तो कसा करतात?

पैसा's picture

27 Sep 2015 - 2:56 pm | पैसा

मोदकासाठी तांदुळाच्या पिठीची केलेली उकड उरली की त्यात जिरे मीठ मिरची घालून लहान पुर्‍यांसारख्या निवग्र्या करून उकडतात. गोड मोदक खाऊन जिभेला कंटाळा आला की संध्याकाळी हा हमखास हिट्ट प्रकार! आम्ही तर आईला निवग्र्यांसाठी मुद्दाम जास्त उकड कर म्हणून सांगायचो!

प्रचेतस's picture

27 Sep 2015 - 3:07 pm | प्रचेतस

जबरी.
फ़ोटूसहित पाकृ येऊ द्यात की.

पैसा's picture

27 Sep 2015 - 3:09 pm | पैसा

एक दिवस मुद्दाम करीन!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Sep 2015 - 4:05 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त..

dadadarekar's picture

27 Sep 2015 - 4:10 pm | dadadarekar

छान

सुहास झेले's picture

28 Sep 2015 - 8:17 am | सुहास झेले

वाह वाह... झक्कास एकदम !!

बाप्पाने खास फर्माईश केलेली दिसतेय नैवैद्याची... दोन-दोन धागे ;-)

मनीषा's picture

28 Sep 2015 - 9:02 am | मनीषा

छान आहे पाककृती
हळदीची पाने नसतील तर काय वापरता येईल?

फणसाच्या पानाचे आईस्क्रीमसारखे कोन करून त्यात पीठ भरून करतात. किंवा केळीच्या पानातही करता येतील. पण हळदीच्या पानांना एक खास सुगंध असतो. त्यामुळे वेलचीची गरज भासत नाही. तो वास फणसाच्या/केळीच्या पानातल्या पातोळ्यांना येणार नाही. याचाच एक सोपा प्रकार म्हणजे केळीच्या पानातले पानगे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2015 - 9:44 am | डॉ सुहास म्हात्रे

ऐकून आहे पण कधीच खाल्ले नाही. त्यामुळे खाल्ल्याशिवाय मत देणार नाही :)

(पण चव ब्येष्ट असणार असेच वाटते. कधी आहे कट्टा गोव्याला ? ;) )

पैसा's picture

28 Sep 2015 - 9:47 am | पैसा

कट्टा ना, कधीही ठरवू. त्यात काय! गोवा म्हणजे काय पुणे नै! ;)

प्रचेतस's picture

28 Sep 2015 - 9:49 am | प्रचेतस

अगदी खरंय.
गोव्याची लोकं मात्र कुणीतरी यायचं झालं तर कायतरी काम काढून दुसरीकडे पळून जातात असं काहीसं ऐकलंय ब्वॉ.

पैसा's picture

28 Sep 2015 - 9:52 am | पैसा

तुमची पिंचिं ची अस्मिता कुठे गेली?

प्रचेतस's picture

28 Sep 2015 - 9:53 am | प्रचेतस

ती आहेच की ओ इथेच.

पैसा's picture

28 Sep 2015 - 10:02 am | पैसा

कोणाचा डु.आयडी? =))

प्रचेतस's picture

28 Sep 2015 - 10:05 am | प्रचेतस

ते कै माहीत नै ब्वा. पण डु आयडीच हे कशावरून म्हणे?

पैसा's picture

28 Sep 2015 - 10:10 am | पैसा

पण ती पिंचिं तली नाही हे माहीत आहे. ही दुसरी कोण अता?

प्रचेतस's picture

28 Sep 2015 - 10:12 am | प्रचेतस

असेना का कोणीही. पिंचिंची असल्याशी कारण :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2015 - 11:13 am | अत्रुप्त आत्मा

आगोबा आणि अस्मिता .. जुळतय , जुळतय नावातूणही जुळतय http://www.sherv.net/cm/emo/laughing/lol.png

नाखु's picture

28 Sep 2015 - 11:30 am | नाखु

"जुळ"वे आहात काय?

रास्त शंकायन नाखु
मेंबर चिमण हटेला गँग

नुसते ठरवणारच? पुण्यतले लोक करतात ब्वॉ कट्टा आणि गोयंच्या मिपाकरांना पाजतात.
डिसेंबरमें तय्यार रहो!

पैसा's picture

28 Sep 2015 - 8:19 pm | पैसा

डिसेंबरात मी कुठेच जात नै!

यशोधरा's picture

28 Sep 2015 - 8:23 pm | यशोधरा

हौ. मी येणार.

पैसा's picture

28 Sep 2015 - 8:30 pm | पैसा

कट्टा करू. शांतादुर्गेच्या देवळात जाऊ. आणि माशांच्या जेवणाचे फोटो टाकून लोकांना जळवू.

यशोधरा's picture

28 Sep 2015 - 9:04 pm | यशोधरा

लैच भारी. :)

नाखु's picture

28 Sep 2015 - 10:26 am | नाखु

फक्त हळदीची पाने आहेत, जो वरील पातोळ्या करील त्यालाच देईन. (पातोळ्यारूपी दक्षीणा स्वीकारून.)

अति अवांतर : आम्हाला न जमणारी पा कृ टाकल्याबद्दल सौम्य निषेढ आणि खूप खूप अभिनंदन.

तळटीप:दर्पण सुंदरीचे उपनाम अस्मिता आहे काय?

शंकासुर नाखु

सौंदाळा's picture

28 Sep 2015 - 12:00 pm | सौंदाळा

खल्लास.
घरी पातोळ्या असल्या की मी आधी वरण-भात लिंबु जेवतो दुपारी ११/११.३० ला.
आणि नेहमीच्या जेवायच्या वेळी १/१.३० ला हळदीच्या पानात गुंडाळलेल्या पातोळ्या डायरेक्ट ताटात घेवुन हळदीच्या पानातुन एकेक पातोळी सोडवुन खाण्यात अशी मज्जा येते की बास.
काकडीचे पातोळे ऐकले नव्हते. आम्ही धोंडस म्हणतो ते तर नाही ना? पण त्याला हळदीचे पान वापरत नाही. तिखट आणि गोड दोन्ही करतो.

प्रचेतस's picture

28 Sep 2015 - 12:02 pm | प्रचेतस

बरा सापडलास जवळच्या जवळ.
बोलाव मला पातोळ्या केल्यास की. :)

सौंदाळा's picture

28 Sep 2015 - 3:19 pm | सौंदाळा

नक्की.
ऑक्टो एंड / नोव्हे सुरुवातीला करु

पैसा's picture

28 Sep 2015 - 12:05 pm | पैसा

त्याला कोकणात धणस म्हणतात बहुतेक. बेक/भाजून करतात ना? त्याच्यासारखे आम्ही सांदण करतो. पण ते उकडून.
काकडीच्या पातोळ्याची डिटेल पाकृ अनन्न्याने दिलीय बघ!

सस्नेह's picture

28 Sep 2015 - 12:12 pm | सस्नेह

कधी येऊ खायला ?

पैसा's picture

28 Sep 2015 - 12:18 pm | पैसा

कधीही ये! पण पातोळे/पातोळ्या हळदीची पाने आहेत तोपर्यंतच!

सानिकास्वप्निल's picture

28 Sep 2015 - 3:58 pm | सानिकास्वप्निल

पातोळे खावून आता किती वर्ष झाली, अतिशय आवडता प्रकार आहे हा आणि बाप्पासाठी हा नैवेद्य खास असतोच कोकणात.
आमच्याकडे काकडीचे पातोळे नाही करत पण अशीच कृती करुन त्यात तांदळाचे मावेल तितके पीठ घालून वडे करतो ते ही भन्नाट लागतात.
फोटो बघून आत्ताच्या आता खावेसे वाटत आहे :)

कृती करुन त्यात तांदळाचे मावेल तितके पीठ घालून वडे करतो ते ही भन्नाट लागतात.

अगदी, ते वडे आणि खीर, डेडली कॉम्बिनेशन!

मस्त पाकृ.खाऊन पहायला येतेच!

आधीचे काजू आणि आता पातोळ्या पेंडिंग आहेत हे लक्षात असु ध्या हो... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:38 pm | दिपक.कुवेत

ईथेहि म्हणतो. तोंपासू दिसत आहेत.