बाप्पाचा नैवेद्य : पातोळ्या आणि पातोळे
पातोळ्या आणि पातोळे हा कोंकणातला आवडता प्रकार आहे. साधारण नागपंचमीला, गौरीच्या नैवेद्यात, दसर्याला म्हणजे जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात तेव्हा पातोळ्या हौसेने केल्या जातात. गोव्यातले कॅथॉलिक ख्रिश्चन लोकही त्यांच्या सांजाव सणाला आवर्जून पातोळ्या करतात. सुकूर पर्वरीला १५ ऑगस्टला पातोळ्यांचे फेस्त (जत्रा) भरते.
पातोळ्या प्रकार १)
साहित्यः
१ वाटी तांदूळ
नारळाच्या एका वाटीचे ओले खोबरे
खोबर्याच्या अर्धा गूळ
किंचित मीठ
पाणी
वेलची पूड/जायफळ पूड आवडीप्रमाणे
हळदीची पाने
कृती:
तांदूळ सुमारे ४/५ तास भिजत घालावेत. मग किंचित मीठ घालून बारीक वाटावेत. भज्याच्या पिठाहून दाट पण भाकरीच्या पिठाहून सैल ठेवावे.
ओले खोबरे व गूळ एकत्र करून शिजवून मोदकाच्या पुरणासारखे पुरण तयार करून घ्यावे.
हळदीची पाने धुवून पुसून घ्यावीत. तयार पीठ हळदीच्या पानावर पसरावे. त्यावर थोडेसे पुरण घालून उभी किंवा आडवी आवडीप्रमाणे घडी करावी. पिठामुळे पानाच्या कडा चिकटून रहातात. अशी सर्व पाने तयार करून घ्यावीत. या पातोळ्या एका चाळणीत किंवा डब्यात ठेवून मग कूकरची शिटी काढून त्यात किंवा इडलीच्या कूकरमधे किंवा मोदकपात्रात ठेवून १५ मिनिटे उकडून घ्याव्यात. झाकण उघडून जरा थंड होऊ द्याव्यात. हळदीचे पान सोडवून तुपाबरोबर खाव्यात.
काही कॅथॉलिक ख्रिश्चन लोक या पातोळ्यांचे पीठ तयार करताना वाटलेले पीठ मंद विस्तवावर ठेवून थोडे शिजवून उकडीप्रमाणे मळून घेतात. ख्रिश्चन लोकांचा पातोळ्यांचा दुसरा आवडता प्रकार म्हणजे फणसाच्या पानाचे कोन तयार करून त्यात उकडलेल्या पातोळ्या. त्यांना अर्थातच वेगळा वास येतो.
प्रकार २) अशाच हरभर्याच्या डाळीचे पुरण घालून किंवा तांदुळासोबत फणसाचे पिकलेले गरे वाटूनही पातोळ्या करतात.
प्रकार ३) तांदूळ भिजत घालून वाटण्याऐवजी तांदुळाच्या पिठीची मोदकाप्रमाणे उकड काढून त्याच्या पातोळ्या करतात.
पातोळे: रत्नागिरीकडे काकडीचे पातोळे करतात.
साहित्य :
मध्यम काकडी
१ वाटी तांदुळाचे पीठ
२ चमचे रवा
१/२ वाटी चिरलेला गूळ
थोडेसे ओले खोबरे
१ चमचा तूप
किंचित मीठ
आवडीप्रमाणे वेलची पूड/जायफळ पूड
हळदीची पाने
कृती:
काकडी किसून घेऊन (हळदीची पाने वगळून) इतर साहित्य त्या किसात घालावे आणि एकत्र करून शिजत ठेवावे. २ वाफा काढाव्यात. मग हे मिश्रण थंड होऊ द्यावे. हळदीच्या पानात गोलसर आकारात थापून पानाच्या उरलेल्या अर्ध्या भागाने झाकावे आणि कूकरची शिटी काढून किंवा इडली कूकरमधे किंवा मोदकपात्रात चाळणीवर/डब्यात ठेवून १५ मिनिटे उकडून घ्यावेत.
हळदीची पाने सोडवून तुपाबरोबर खावेत.
(पातोळ्यांची डिटेल पाककृती अनन्न्याच्या या धाग्यात बघा.)
याद्या
22592
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह छानच
मस्तच आहे!!! झक्कास रेसिपी!!!
बेळगावकडे काकडीच्या तिखट
In reply to मस्तच आहे!!! झक्कास रेसिपी!!! by मांत्रिक
रासोळ्या: तांदुळ पीठ + मिरची,
In reply to बेळगावकडे काकडीच्या तिखट by मांत्रिक
वोक्के!
In reply to रासोळ्या: तांदुळ पीठ + मिरची, by मांत्रिक
अरे वा! मस्तच!
हो
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
मस्त मस्त मस्त !
अरे वाह, मस्तं. गरमागरम
वॉव!
अस्सल कोंकणी पाककृती.
तांदळाच्या उकडलेल्या
मोदकाची उरलेली उकड
In reply to तांदळाच्या उकडलेल्या by प्रचेतस
जबरी.
In reply to मोदकाची उरलेली उकड by पैसा
नक्की!
In reply to जबरी. by प्रचेतस
मस्त..
छान
वाह वाह... झक्कास एकदम !!
छान आहे पाककृती
फणसाची किंवा केळीची पाने
In reply to छान आहे पाककृती by मनीषा
ऐकून आहे पण कधीच खाल्ले नाही.
हेहेहे!
In reply to ऐकून आहे पण कधीच खाल्ले नाही. by डॉ सुहास म्हात्रे
अगदी खरंय.
In reply to हेहेहे! by पैसा
हे काय!
In reply to अगदी खरंय. by प्रचेतस
ती आहेच की ओ इथेच.
In reply to हे काय! by पैसा
=))
In reply to ती आहेच की ओ इथेच. by प्रचेतस
ते कै माहीत नै ब्वा. पण डु
In reply to =)) by पैसा
एक अस्मिता आहे की
In reply to ते कै माहीत नै ब्वा. पण डु by प्रचेतस
असेना का कोणीही. पिंचिंची
In reply to एक अस्मिता आहे की by पैसा
आगोबा आणि अस्मिता .. जुळतय ,
In reply to एक अस्मिता आहे की by पैसा
आपण
In reply to आगोबा आणि अस्मिता .. जुळतय , by अत्रुप्त आत्मा
नुसते ठरवणारच? पुण्यतले लोक
In reply to हेहेहे! by पैसा
डन!
In reply to नुसते ठरवणारच? पुण्यतले लोक by यशोधरा
हौ. मी येणार.
In reply to डन! by पैसा
वोक्के!
In reply to हौ. मी येणार. by यशोधरा
लैच भारी. :)
In reply to वोक्के! by पैसा
मजकडे
खल्लास.
बरा सापडलास जवळच्या जवळ.
In reply to खल्लास. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नक्की.
In reply to बरा सापडलास जवळच्या जवळ. by प्रचेतस
धोंडस
In reply to खल्लास. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अनवट पाकृ !
कधीही ये!
In reply to अनवट पाकृ ! by सस्नेह
पातोळे खावून आता किती वर्ष
कृती करुन त्यात तांदळाचे
In reply to पातोळे खावून आता किती वर्ष by सानिकास्वप्निल
मस्त पाकृ.खाऊन पहायला येतेच!
आधीचे काजू आणि आता पातोळ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)चेपू वर लाईक केलेच आहे