✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नायागारा धबधब्याजवळील फोटो

ध
धनंजय यांनी
Sun, 08/31/2008 - 01:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10446 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Sun, 08/31/2008 - 03:54 नवीन

छान..

छान.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 08/31/2008 - 04:11 नवीन

छान!

छान फोटू आलेत. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही देखील नायगाराला गेलो होतो... जाताना न्यूयॉर्क राज्यात टोर्नेडोचा दिसतो तसा "फनेल क्लाऊड" समोर आला आणि काही कळायच्या आत दिड-दोन इंच व्यासाच्या गारा कोसळू लागल्या. किमान पाच एक मिनीटे बाजूला शांत बसून होतो (मनातून धास्तावलो होतो :) ) पण सुदैवाने काही झाले नाही. नंतर पाचच्या सुमारास पोचल्यावर लगेचच "मेड ऑफ दी मिस्ट" ची सहल घेतली. वेळ सुदैवाने जमल्यामुळे सूर्यप्रकाश होता आणि इंद्रधनुष्य छान दिसले! ते चित्रफितीत पण आले आहे. नंतर जमल्यास "तू नळी" वर घालेन...
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sun, 08/31/2008 - 06:27 नवीन

सर्व फोटो

सर्व फोटो सुरेख. आवडले. ईश्वरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रियाली Sun, 08/31/2008 - 05:53 नवीन

मस्त...आणि काही

Image removed. मेड ऑफ मिस्टचा पुढे जाण्याचा शेवटचा स्पॉट. यानंतर ती माघारी वळते. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 08/31/2008 - 06:05 नवीन

सर्व फोटो

सर्व फोटो छान. विकास यांचे पण आवडले. मेड ऑफ द मिस्ट ला धुंद कन्यका म्हणण्याऐवजी 'धुक्याची राणी ' कसे वाटेल ?
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sun, 08/31/2008 - 10:27 नवीन

भाषांतर

'धुक्याची सेविका' (मेड ऑफ दि मिस्ट) हे जास्त योग्य नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
स
सर्वसाक्षी Sun, 08/31/2008 - 06:34 नवीन

आवडले

चांगली चित्रे. पाकळ्यांचा पोत सुरेख टिपला आहे. मात्र इंद्रधनुष्य पूल संपूर्ण पाहायला आवडला असता, तसेच धबधब्याच्या चित्रात पाण्यापेक्षा भूभाग अधिक वाटला.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/31/2008 - 07:41 नवीन

सुंदर

सगळ्यांचे नायागारा फोटो खास! धनंजय यांचे वर्णन नेहमीसारखे भारी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/31/2008 - 08:47 नवीन

मस्त रे !!!

>>सगळ्यांचेच नायागारा फोटो खास! धनंजय यांचे वर्णन नेहमीसारखे भारी. >>कित्येक पर्यटक मात्र या रम्य वातावरणात मधुचंद्राकरिता येतात. वैराग्याची सुरुवात इथूनच होते वाटतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मनीषा Sun, 08/31/2008 - 08:02 नवीन

खूपच

सुंदर फोटो.. अमेरिकन धबधब्याच्या खाली जाण्यासाठीच्या पाय-या म्हणजेच "Cave of Winds " का? "मेड ऑफ दि मिस्ट" पण सुंदर संध्याकाळी तेथेअमेरिकेच्या बाजूच्या धबधब्यावर, कॅनडाच्या बाजूने रंगीत प्रकाश झोत टाकतात.. तो सुद्धा नजारा बघण्यासारखा असतो
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 08/31/2008 - 08:06 नवीन

मस्त फोटो.

नायागारा आहेच मस्त किती ही पाहिले तरी डोळ्याचे पारणे फिटत नाही. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/31/2008 - 08:51 नवीन

सर्व फोटो

सर्व फोटो एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/31/2008 - 09:00 नवीन

मस्त फोटो

मस्त फोटो ... आणि वर्णनही! (स्वगतः अमेरीकेत/कॅनडात कोणती काँन्फरंस आहे पाहिलं पाहिजे! ;-) )
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/31/2008 - 09:19 नवीन

सुरेख...

सर्व फोटो मस्ऽऽऽऽऽतच आहेत. कित्येक पर्यटक मात्र या रम्य वातावरणात मधुचंद्राकरिता येतात. म्हणजे 'नायग्रा' पाहायला जाताना खिशात 'व्हायग्रा' ठेवली पाहीजे.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 08/31/2008 - 09:57 नवीन

ब्रायडल फॉल

अमेरिकन फॉल आणि हॉर्स शू फॉलच्या मधे अजून एक धबधबा आहे त्याला ब्रायडल फॉल म्हणतात. खालील चित्रात तो उजवीकडे लहानसर दिसत आहे. Image removed. कॅनेडियन बाजूने हे धबधबे मस्त दिसतात. आम्ही रात्री पाहील्याने त्यावरील रोषणाई दिसली पण छायाचित्रे घेऊ शकलो नाही.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 08/31/2008 - 15:04 नवीन

मस्त

छायाचित्रे आणि वर्णन. हा मी 'केव्ह ऑफ द विंड्ज' च्या पायथ्याशी उभं राहून काढलेला फोटो - Image removed. बाकी, मेड ऑफ द मिस्टला पुलंनी 'धुक्याची पोर' असे जावे त्यांच्या देशा मध्ये म्हटल्याचे आठवते. हे नाव पडण्यामागची नेटिव्ह अमेरिकन दंतकथा येथे आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/31/2008 - 15:44 नवीन

वा! संपन्न

वा! संपन्न देश, संपन्न मंडळी! तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 08/31/2008 - 17:37 नवीन

धन्यवाद

तशी हे चित्रे छा.चि. टीकेसाठीही टाकली होती, सर्वसाक्षी यांनी त्या दृष्टीने प्रतिसाद दिलाच आहे. (अर्ध्या पुलाचा फोटो त्याच्या वरील वाक्याच्या वक्रोक्तीला चित्रित करतो. पूर्ण पुलाचा सुंदर फोटो विकास यांच्या चित्रसंचात आहे. धबधब्यांचा फोटो तर लेखात द्यायलाच नको होता...) धबधब्याच्या आजूबाजूच्या दृष्यांची कुठल्या वेगळ्याच कोनातून काढलेली चित्रे गुंफण्याचा प्रयत्न होता. (नंदन यांचे जिन्याच्या पायथ्याचे चित्र, जसे.) - माझे ते एक धबधब्याचे पॅनोरामा चित्र "वेगळ्याच कोनातले दृष्य" या चौकटीत बसत नाही, तरी मोह आवरला नाही. थोडा संयम पाळून ते चित्र मूळ लेखात द्यायला नको होते. प्रतिसादांमध्ये सर्वांची सुरेख चित्रे बघून डोळे सुखावले. फारच "फोटोजेनिक" प्रपात आहे. (तसा आमचा गोव्याचा दूधसागरही - अगदी भराभरा लक्ष न देताही क्लिकगणिक लोभस चित्रे उमटतात.) विकास यांच्या चित्रांत दिसते की अमेरिकन धबधब्याच्या 'या' बाजूचा जिनाही बंद केलेला नाही. त्यामुळे लेखातील कृष्णधवल चित्रावर मी दिलेला तपशील चुकलेला आहे. 'त्या'बाजूचा जिना विंड्स""केव्ह ऑफ द विंड्स"चा जिना - बरोबर आहे, मनीषा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/31/2008 - 22:49 नवीन

छान!

वा! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चांगले फोटो नायगरा हे माझं आतापर्यंतचं सर्वात आवडतं ठिकाण!! फोटो चांगले आहे आहेत. तुषारकन्यकेत बसला नाहितसे दिसते. नायगाराचं मला जमेल तसं केलेलं वर्णन इथे अमेरिकायण! मधे वाचता येईल. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/01/2008 - 15:25 नवीन

उदंड जाहले पाणी !

सगळेच फोटो परत परत पाहिले तरी मन भरले नाही..फार सुंदर.. आणि ऋषिकेशाचे अमेरिकायणही परत वाचले.प्रियालीच्याही नायाग्रावरच्या एका सुंदर जुन्या लेखाची आठवण झाली, स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/01/2008 - 15:35 नवीन

वा !

सर्वच चित्रे सुंदर.. मजा आली पहायला.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
राघव१ Mon, 09/01/2008 - 21:09 नवीन

छान फोटोज!

धनंजयराव, प्रियालीताई, विकास सगळ्यांचे फोटोज छान आहेत... येथे लिंकवल्याबद्दल धन्यवाद! ऋषिकेशरावांनी दिलेला दुवाही वाचनीय (अर्थात् सगळे वाचून नाही झालेले अजून!! :D ). हे सगळे वाचून-बघून येथे बसल्या-बसल्याच नायगारा फिरून आल्यासारखे वाटले :) शुभेच्छा! राघव
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/02/2008 - 13:10 नवीन

क्या बात

क्या बात है !! सर्व फोटो एकदम मस्त !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा