तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
स्वप्नांत तुझ्या....
रात्र रंगुनी जाते,
एकएकट्या नभात तुझ्या
अनोळखी रंग भरुनी जाते,
दूर लुकलुकणाऱ्या चांदण्यात
मग स्वत:ला हरवताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
येण्याने तुझ्या....
आसमंत मोहरून येतो,
नुसत्या चाहुलीने तुझ्या
अलवार गंधाळुन जातो,
धुंद मदहोशणाऱ्या निशिगंधात
मग स्वत:ला विरघळवताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
ओढीने तुझ्या....
बेलगाम वहावत येतो,
हरएक अदेवर तुझ्या
बावरा खुळ्यागत होतो,
त्याच्या आसुसलेल्या आवेगात
मग स्वत:ला भिरकावताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
इशाऱ्यावर तुझ्या....
बेधुंद बरसत जातो,
नाजुक स्पर्शाने तुझ्या
चिंब शहारत जातो,
ओंजळीत साठलेल्या त्याच्यात
मग स्वत:ला पहाताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
आजही जेव्हा
क्षितिजावर तुझ्या....
सांज रेंगाळुनी जाते,
जाताना मागे आठवांच्या
सावल्या सोडुनी जाते,
आयुष्याच्या अश्या सांजरातीत
मग स्वत:ला शोधताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?
मस्त आहे कविता.
मस्त रे...
सुंदर आहे! पण ३र्या कडव्यात
मुद्दामून डायरेक्ट उल्लेख
वा! सही!
मस्तं! सुंदर लिहिलंय.
छान कविता.
डिट्टो. ;)
प्रेमात आणि युद्धात सारं काही
आँ...
भारीच प्रतिसाद ओ सर. काय पण
छान आहे पण सौमित्र यांच्या
सौमित्र ची ती कविता मला ही
छान आहे की कविता....!
छान कविता
सगळ्यांचे मनपुर्वक आभार.
टाळ्या! मस्त!
छान कविता
दोज वेअर द डेज.....
मस्त!
हं!!! खरंच!!! तितकेच रोमँटिक!
अरेरे,
अप्रतिम
क्या बात है !
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
जबरदस्त....
खूप आवडली कविता.