कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा
वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला
गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग
हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग
पण वृन्दावनचा राणा
..... तो कृष्ण 'एकटा' होता !
चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा
चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला
ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या
अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया
विश्व डोलते ज्या मुरलीवर..
...... तो कृष्ण 'एकटा' होता !
धुर्त शकुनी, विषयी कौरव, षंढ सभागृह ठरले
सर्वस्व हरवून बसले पांडव पतीधर्मही विसरले
भीष्म, विदुर ते स्तब्ध, शापदग्ध हस्तिनापुरी
सखी द्रौपदी त्रस्त मंडपी, त्राता झाला श्रीहरी
कृष्णेसाठी स्वये धावला ,
...... तो कृष्ण 'एकटा' होता !
कुरुक्षेत्रावर डाव मांडूनी उद्धरीले कुरु कुल सारे
गतीमुढ पार्था बोध, जगाला सांगितली त्वां गीता
कर्तव्यबोध तो होता सरली शामसख्याची माया
व्याधाने धरीला नेम, सोडला बाण, छेदली काया
संपले पर्व सुटला देह...
..... तो कृष्ण 'एकटा' होता !
विशाल कुलकर्णी
१८-०९-२०१५
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5384
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे! कृष्णाचा संपूर्ण
लेखकाला अलिप्त म्हणायचे असते तर त्याने अलिप्त म्हटले असते
In reply to छान आहे! कृष्णाचा संपूर्ण by मांत्रिक
यस्स ज्ञानोबा, अगदी हेच
In reply to लेखकाला अलिप्त म्हणायचे असते तर त्याने अलिप्त म्हटले असते by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद मांत्रिकभाऊ _/\_
In reply to छान आहे! कृष्णाचा संपूर्ण by मांत्रिक
खरचं
अप्रतिम विकु
नाही, ही कविता खुप आधी
In reply to अप्रतिम विकु by बोका-ए-आझम
विशाल जी कविता आवडली
असेलही कदाचित... ग्रेसचं वेड
In reply to विशाल जी कविता आवडली by मारवा
आवडली.
+१
+१ टू ( यावेळी ;) )- ना खून
In reply to +१ by नाखु
धन्यवाद देवानू _/\_
सुरेख...
वा!
हम्म.. एक एकटा एकटाच...!
बोलवलत का मला? :-)
In reply to हम्म.. एक एकटा एकटाच...! by द-बाहुबली
फारच सुंदर.
सुरेख
धन्यवाद मंडळी _/\_
अतिशय
सुंदर !
अप्रतिम कविता!