बाप्पाचा नैवेद्य : ड्रायफ्रुट्स मोदक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
17 Sep 2015 - 2:26 am

.

साहित्यः

१.५ वाटी सीडलेस खजूर, तुकडे करुन घ्यावे.
१/२ वाटी बदाम
१/२ वाटी काजू
१/४ वाटी बेदाणे
१/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट
२ टेस्पून खसखस
१/२ टीस्पून वेलचीपूड

.

पाकृ:

काजू-बदाम बेताचे चॉप करुन घेणे.

.

पॅनमध्ये काजू-बदाम कोरडेच हलक्या तांबूस रंगावर भाजून घेणे.
भाजलेले काजू-बदाम प्लेटमध्ये काढावे.
त्याच पॅनमध्ये आता खोबरे + खसखस सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
हे सुद्धा वेगळ्या प्लेटमध्ये काढावे.
पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यात चिरलेला खजूर व बेदाणे घालावे.
सतत परतावे, खजुर-बेदाण्याचा गोळा होऊन लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
मिश्रण गार होऊ द्यावे.

.

काजू-बदामाची मिक्सरवर भरडसर पूड करुन घ्यावी.
खजूर-बेदाणेच्या मिश्रणात काजू-बदामाची पूड, खोबरे + खसखस व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे.

.

पेढे-मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
हे मोदक अतिशय चविष्ट बनतात व ह्यात खजूराचा, बेदाण्याचा गोडवा पुरेसा होतो.
हे मोदक तुम्ही गणपतीत प्रसादाला देऊ शकता.
ह्या प्रमाणात १५-१६ मोदक होतात, जास्तं प्रमाणात बनवयाचे असतील तर साहित्याचे प्रमाण वाढवावे.

.

गणपती बाप्पा मोरया !!
तुम्हा सर्वांना गणेशोत्सावाच्या हार्दिक शुभेच्छा !!

__/\__

प्रतिक्रिया

रेसिपी आवडली. फोटूही छान.

स्रुजा's picture

17 Sep 2015 - 2:44 am | स्रुजा

एक नंबर !! नेहमीप्रमाणेच .. :)

सुहास झेले's picture

17 Sep 2015 - 9:18 am | सुहास झेले

नेहमीप्रमाणेच.... झक्कास !!!

मुक्त विहारि's picture

17 Sep 2015 - 9:33 am | मुक्त विहारि

नेहमीचाच प्रतिसाद...

१. सुंदर फोटो

२. सुंदर लेखनशैली

पद्मावति's picture

17 Sep 2015 - 10:34 am | पद्मावति

वाह, आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पासाठी मस्तं नैवेद्य!
पाककृती, सादरीकरण सुंदरच.

पिंगू's picture

17 Sep 2015 - 11:29 am | पिंगू

एक नंबर.. पाककृती आणि फोटोसुद्धा..

मस्तच पाकृ सानि. बाप्पाला नक्कीच आवडतील हे मोदक. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!! :)

द-बाहुबली's picture

17 Sep 2015 - 1:42 pm | द-बाहुबली

गणपती बप्पा मोरया... छन चवदार पाकृ.

बाकी फक्त आकार दिला गेल्या की प्रत्येक गोष्टीचा मोदक बनतो का ?

प्यारे१'s picture

18 Sep 2015 - 3:03 pm | प्यारे१

खव्याचे मोदक म्हणतात की. पेढाच असतो.
बाकी खाण्याचे महान कार्य करावे.
इथे शंका विचारलेल्या चालत नाहीत.

दिपक.कुवेत's picture

17 Sep 2015 - 2:13 pm | दिपक.कुवेत

मस्त...नेहमीप्रमाणेच

मस्तच ग!मी असे लाडु करते.आता असा मोदक आकारात बनवुन नैवेद्य दाखवेन.

नंदन's picture

17 Sep 2015 - 2:18 pm | नंदन

साच्यातली असूनही साचेबद्ध नसणारी रेसिपी :)

सुंदर रेसिपीचे तसेच सादरीकरण!

स्वाती दिनेश's picture

17 Sep 2015 - 5:33 pm | स्वाती दिनेश

मोदक मोददायी आहेत, :)
स्वाती

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2015 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाहव्वा! एकच नंबर.

कविता१९७८'s picture

17 Sep 2015 - 9:01 pm | कविता१९७८

वाह मस्तच साने

विभावरी's picture

18 Sep 2015 - 10:49 am | विभावरी

छानच दिसताहेत , करुन पहाणार !!

मदनबाण's picture

18 Sep 2015 - 2:58 pm | मदनबाण

वाह्ह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani

नूतन सावंत's picture

19 Sep 2015 - 9:57 am | नूतन सावंत

सानिका,माझी आई असेच करून ताटाला तूप लावून वाड्या करीत असे.मधुमेही भक्तांसाठी खास प्रसाद असे. मोदकाची आयडिया पण भारीच आहे.गणपती खरेच सोंड लांबवून एक तरी खाईलच.

गणपती खरेच सोंड लांबवून एक तरी खाईलच

खरच किती गोडुले दिसताहेत ते मोदक!

वेल्लाभट's picture

19 Sep 2015 - 10:06 am | वेल्लाभट

चव भारी असेलच नक्की
पण फोटो ........
प्रेझेन्टेशन,........
क्या बात है

सुचिकांत's picture

21 Sep 2015 - 11:22 am | सुचिकांत

सानिका ताई, खूपच छान सादरीकरण, पाहूनच पोट आणि मत तृप्त झालं!

सुचिकांत's picture

21 Sep 2015 - 11:25 am | सुचिकांत

तुमचा ब्लॉग पाहिला, आणि पुन्हा पाक कृतींमध्ये रस येऊ लागला आहे. लवकरच मी देखील काहीतरी छान बनवून पोस्ट करीन!

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:11 pm | सानिकास्वप्निल

सगळ्या प्रतिसादकांचे आभार :)