वर्तुळ - शशक
लेखनविषय (Tags)
"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.."
पर्स मधील मोबाईल खणाणला.
तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले.
बंदुकीची नळी सरळ करत तिनं माझ्यावर रोखली.
धडाम्...
मी जागीच कोसळलो.
थरथरत्या हातातली बंदुक गळून पडली.
घाईघाईने ती निघाली.
मोबाईलबरोबर बंदुकही पर्समध्ये टाकायला विसरली नाही.
पिटुकल्या स्कुटीवर बसुन वाड्याकडे निघाली.
वाड्याजवळ येताच धुंद हसली.
करकरत दरवाजा उघडला.
धावतच वरच्या मजल्यावर आली.
एकटाच होतो.
मी निलाजरेपणानं बेधुंद प्रणयाची मागणी केली.
ती त्याच्यासाठीच आली होती.
शृंगारल्या डोळ्यांनी ती लाजुन चुर झाली.
तेवढ्यात,
"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.."
पर्स मधील मोबाईल खणाणला.
तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले.
प्रतिक्रिया
काही कळले नाही.
अहो ती प्रेमवेडी आहे.
धडामकरुन गोळी कोणाला मारली?
त्या शशक च्या नादात कथा नीट
हम्म
बदल केला आहे. :)
धन्यवाद,