✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

क
किणकिनाट यांनी
Fri, 08/28/2015 - 14:47  ·  लेख
लेख
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.
ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
58709 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

मिशेलिन सिराक?

तुषार काळभोर
Sat, 10/24/2015 - 13:54 नवीन
भौतेक त्यात ट्युबलेस नै येत. ट्युब टाईप १८-२.७५ (फ्रंट) १६००-१७०० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५० ट्युब टाईप १८-१००/९० (रिअर) १९००-२००० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५०. सध्या झॅपर आहेत गाडीला. मला त्याची रस्त्यावरची ग्रिप तितकी पक्की नाही वाटली. गाडी ओलसर रस्त्यावर/वळणावर सहजासहजी स्किड होऊ नये, अशी अपेक्षा आहे. घासाघीस+व्हील बॅलन्सिंगचं माहिती नव्हतं. हे नक्की करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मिशेलिन ची ट्रीड डिझाईन

तुषार काळभोर
Sat, 10/24/2015 - 13:56 नवीन
मस्त वाटतिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

ट्यूबलेस नाहीये पण टायर

एस
Sat, 10/24/2015 - 14:20 नवीन
ट्यूबलेस नाहीये पण टायर गुणवत्ता जबरदस्त आहे. स्किड होऊ नये हेच तर महत्त्वाचं असतं. त्यासाठीच मिशेलिन सिराज चे ट्रीड डिझाइन भारी आहे. जो डीलर व्हील बॅलन्सिंग करून देईल त्याच्याचकडे टायर बसवून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

वोक्के!!

तुषार काळभोर
Sat, 10/24/2015 - 14:24 नवीन
एकदा प्रत्यक्ष जाऊन बघतो आणि फायनल करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लाइट बिल.

नाव आडनाव
Sat, 10/24/2015 - 12:00 नवीन
~६ महिन्याआधी मी जिथं राहतो त्या सोसायटीतले सगळे सीएफएल बल्ब (पार्किंग, पॅसेज, कंपाऊंड वॉल आणि लिफ्ट) बदलून एलइडी बल्ब लावले तेंव्हा खरडफळ्यावर लिहिलं होतं. आता सहा महिन्यांचं बिल बघितल्यानंतर बिल २०% - २२% कमी झालं म्हणून इथं लिहित आहे. बल्ब बदलतांना एलइडीचं वॅटेज सीएफएल च्या (जवळपास तितक्याच ऊजेडासाठी) ~१/३ आहे. कंपाऊंड वॉल चे ४५ वॅटचे बल्ब बदलून त्या ऐवजी १४ वॅटचे एलइडी बल्ब लावले. तसंच, लिफ्ट च्या १५ वॅट ऐवजी २.७ वॅट, पार्किंग आणि पॅसेजचे १५ वॅट सीएफएल ऐवजी ४ वॅट लावले. ऊजेड जवळपास सारखा आहे, पण बिल ५३००० वरून ४२००० वर आलं आहे. जर घरी लावयचे असतील तर मात्र एलइडी बल्ब ऐवजी ट्यूब लावा. ४० वॅट च्या जुन्या ट्यूब ऐवजी २० वॅट ची एलइडी ट्यूब मला तेव्हढीच ऊजेड देणारी वाटली. किचेन आणि बाकिच्या रूम मधे ९ वॅटचे एलइडी बल्ब लावले आहेत. बल्ब चा ऊजेड ठीक ठीक आहे पण वाचण्यासाठी ट्यूब चांगली असं वाटतं. एलइडी घेतांना चांगल्या कंपनीचा घ्या. तुलना करतांना चायनामेड बल्ब आणि एक क्षक्षक्ष कंपनी याची किंमत अजिबात तुलना होणारी नव्हती पण ऊजेडाचं पण तसंच होतं :) आम्ही कंपनीकडे काँटॅक्ट केला होता त्यामुळे डिस्काऊंट मिळाला. नंतर माझा एक मित्र बोलला पेयू / अशीच एक साइट वर कंपनीपेक्षा कमी किंमतीत मिळाले असते. एलइडी वर २ वर्षांची वॉरंटी आहे आणि त्याची लाईफ पण सीएफएल च्या तिप्प्ट आहे (असं कंपनीने क्लेम केलंय). टीप - माझ्या ओळखीतला, नात्यातला किंवा मित्र यापैकी कोणी बल्ब च्या कंपनी / एजेंसीशी संबंधित नाही आणि ही जाहिरात नाही :) फक्त एक चांगला अनुभव म्हणून शेअर केला आहे.
  • Log in or register to post comments

DIGIPASS Mobile Enterprise

नाव आडनाव
Sat, 10/24/2015 - 12:36 नवीन
DIGIPASS Mobile Enterprise Sec हे अँड्रॉइड अ‍ॅप विंडोज ७ वर चालवण्यासाठी एखादा इम्युलेटर आहे का?
  • Log in or register to post comments

परत

प्रदीप
Sat, 10/24/2015 - 20:24 नवीन
आमच्या मेक्सिकोच्या पश्चिम किनार्‍यावर काल एक मोठ्ठे वादळ आले व त्याने येथे बरीच हानी केली.-- अगदी जगबुडीच आली होती, म्हणा ना! ह्याअगोदर चारपाच दिवस टी. व्ही. वर सर्व हवामानाच्या बातम्यात सदर वादळाचे चित्र शेंदरी रंगात दाखवत होते. ह्या वादळाने आणलेल्या जगबुडीच्या निषेर्धाथ मला कुठेतरी, काहीतरी परत करावेसे वाटते आहे. अनुभव्यांनी अथवा जाणकारांनी काय व कोठे परत करावी, ह्याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिपाच्या संपादकांना व्यनि

एस
Sat, 10/24/2015 - 21:28 नवीन
मिपाच्या संपादकांना व्यनि करून निषेध नोंदवा. हे काय चालवलंय म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सालासकटचे अक्रोड घरी फोडताना

भिंगरी
गुरुवार, 10/29/2015 - 09:43 नवीन
सालासकटचे अक्रोड घरी फोडताना चुरा होतो. चुरा न होता आख्खे मगज निघण्यासाठी काही उपाय आहे का? (दुकानातून विकतचे मगज आणावेत असा सल्ला नको आहे.)
  • Log in or register to post comments

अक्रोडाच्या सिललाईनवर ठोका.

तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 09:58 नवीन
अक्रोडाच्या सिललाईनवर ठोका. शकले व्यवस्थित निघतात. आवरणाचे तुकडे न होऊ देता फोडले तर मगजही नीट मिळतो. कधी वेळ मिळाला की फोटो टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

शा० खा० आणि ट्वि० ख० चा

आदूबाळ
Fri, 10/30/2015 - 19:35 नवीन
शा० खा० आणि ट्वि० ख० चा "बादशहा" शिणुमा बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

लैच कठीण असले तर मगज निघणार

काळा पहाड
गुरुवार, 11/05/2015 - 01:15 नवीन
लैच कठीण असले तर मगज निघणार नै लौकर. तेव्हा रा० गो० व० चा रा० गो० व० की आग ची सी० डी० मिळाली तर आणून ठेवा. १० मिन्टात मगज निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

विको वज्रदंती

मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/29/2015 - 09:59 नवीन
विको वज्रदंती वापरा. अक्रोड दाताने फोडा, बरोबर दोन भाग होतात, चूरा होत नाही. https://www.youtube.com/watch?v=coNJY1lqkLg
  • Log in or register to post comments

सिल लाइनवर ठोकूनही चुरा झाला.

भिंगरी
गुरुवार, 10/29/2015 - 10:00 नवीन
सिल लाइनवर ठोकूनही चुरा झाला. दुसरा प्रयत्न म्हणून गरम करूनही फोडले पण चुराच झाला.
  • Log in or register to post comments

अक्रोड ला स्रू ड्राइवर ने भोक

kulpras
Fri, 11/27/2015 - 12:18 नवीन
अक्रोड ला स्रू ड्राइवर ने भोक पाडा, जिथे अक्रोड चे देठ असते त्या ठीकाणी आणि मग अक्रोडला आपटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

सेनापती बापटांबद्दल नेटवर फार

असंका
Fri, 10/30/2015 - 09:46 नवीन
सेनापती बापटांबद्दल नेटवर फार काही सापडत नाही. गुग्ल तर सेनापती बापट रोड वरच अडकून पडतं. य दि फडकेंनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलेलं दिसतंय. ते वाचायचं तर ऑनलाइन आहे का हे मला शोधायचंय. हे कसं शोधायचं कुणी सांगेल का? किंवा इतर काही ऑनलाइन साहित्य त्यांच्याबद्दलचं असेल तर कसं शोधायचं हेही सांगेल का कुणी?
  • Log in or register to post comments

असं करून बघा

तुषार काळभोर
Fri, 10/30/2015 - 11:28 नवीन
"senapati bapat" -road -marg हे गुगला. "senapati bapat" हे असं दुहेरी अवतरणात टाकल्याने senapati आणि bapat हे वेगळे शब्द असलेले रिजल्ट्स गुगल देत नाही. केवळ senapati bapat शब्द असेच्य असे एखाद्य वेबपेज वर असतील तर ते पेज रिजल्ट्स मध्ये येईल. -road -marg यामुळे road आणि marg हे शब्द रिजल्ट्स मधून वगळले जातील. "senapati bapat" -road -marg असं सर्च केलं तर सेनापती बापट हे शब्द याच क्रमात असलेली वेबपेजेस ज्यात road आणि marg हे शब्द नाहियेत, ती वेबपेजेस गुगल तुम्हाला शोधून देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वा! काय सुरेख मार्गदर्शन!!

असंका
Fri, 10/30/2015 - 21:45 नवीन
वा! काय सुरेख मार्गदर्शन!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सेनापती बापट

मार्मिक गोडसे
Fri, 10/30/2015 - 10:23 नवीन
सेनापती बापट http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2954365.cms http://www.loksatta.com/daily/20070508/mv04.htm https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F http://www.ahmednagarpride.com/senapati_bapat
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

असंका
Fri, 10/30/2015 - 21:44 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

ईटिव्ही वरिल भुमिका

उपयोजक
Fri, 10/30/2015 - 19:21 नवीन
असाच कोठे जन्म लाभतो अशीच नियती ठरते.
  • Log in or register to post comments

अरे वा!

असंका
Fri, 10/30/2015 - 21:42 नवीन
अरे वा! खरं सांगू का, क्लिक होइना अजून. पण अनेक धन्यवाद या माहितीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

काही वर्षापुर्वी ई टीव्ही

भिंगरी
Wed, 11/04/2015 - 23:35 नवीन
काही वर्षापुर्वी ई टीव्ही मराठीवर एक मालीका होती,'तीन तेरा पिंपळपान'नावाची.मजा यायची पहायला. पण आता ती तु नळीवर सापडत नाही.खुप वेळा शोधले पण नाही सापडली. कुणाला आठवते का ती मालीका?आणि तिची लिंक देऊ शकेल का कोणी?
  • Log in or register to post comments

कुणालाच ती मालिका आठवत नाही

भिंगरी
Fri, 11/06/2015 - 23:25 नवीन
कुणालाच ती मालिका आठवत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

काळी जादू असते का

टवाळ कार्टा
Wed, 11/04/2015 - 23:41 नवीन
काळी जादू असते का
  • Log in or register to post comments

असते की. ती चालते का हा खरा

आदूबाळ
Wed, 11/04/2015 - 23:46 नवीन
असते की. ती चालते का हा खरा प्रश्न आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

निळा जादू 'रोशन' होताना

शब्दबम्बाळ
गुरुवार, 11/05/2015 - 00:11 नवीन
निळा जादू 'रोशन' होताना पाहण्यात आहे, काय सांगावे त्याची "ती" असू शकेल... काळी जादू! (टीप: हि वर्ण द्वेषी प्रतिक्रिया नाही!! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुळेला

बासुंदी
Sun, 11/15/2015 - 20:00 नवीन
सध्या तुळेला साडेसातीचा शेवटचा चरण सुरू आहे म्हणतात पण नक्की कधी संपतेय साडेसाती कुणी सांगु शकेल काय?
  • Log in or register to post comments

जानेवारी २०१७

अमित मुंबईचा
Sun, 11/15/2015 - 20:11 नवीन
आजाच भविष्यवेध या कार्यक्रमात ऐकले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बासुंदी

आता क्लिक होतय का पहा

उपयोजक
Mon, 11/16/2015 - 13:35 नवीन
कधी सुखद वाटले बंध ,हे रक्ताचे संबंध धागा धागा जुळवीत जाता आनंदा ये भरते किती भुमिका करते
  • Log in or register to post comments

अरे वा...तुमच्याकडे आहे का ही

असंका
Mon, 11/16/2015 - 14:05 नवीन
अरे वा...तुमच्याकडे आहे का ही कविता? लिंक असेल तर देता येइल का? कारण आपण दिलेले शब्द मी परत सर्च केले तरी फक्त एवढ्याच ओळी (आपण ज्या अगोदर दिल्या होत्या त्या) मिळत होत्या... आगाउ धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

शिर्डी वॉटर पार्क

B amol
Wed, 11/18/2015 - 13:24 नवीन
मित्रहो शिर्डी वॉटर पार्क बद्दल माहिती हवी होती.
  • Log in or register to post comments

हे कधी झाले

टवाळ कार्टा
Wed, 11/18/2015 - 13:28 नवीन
हे कधी झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: B amol

फुसके बार

राजेश कुलकर्णी
Sun, 11/22/2015 - 22:46 नवीन
. १) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. २) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते? ३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे. ४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा. ५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता. ६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. ७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे. ८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो? आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का? “काय पांडबा कसला इचार करतुयास?” “आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.” “अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?” “आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी." "आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू." दहा सेकंदांनी...... “काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?” “इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.” “हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही. “आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?” “अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”
  • Log in or register to post comments

जुने कपडे कुणाला द्यावेत?

पिलीयन रायडर
Fri, 11/27/2015 - 11:57 नवीन
जुने कपडे कुणाला द्यावेत? मध्ये कुठेतरी एका संस्थेची माहिती वाचली होती. ते जुने कपडे, वस्तु घेऊन पुढे गरजु लोकांना त्याचे वाटप करत असत. पुण्यात ठराविक दिवशी त्यांची मीटींग होते असंही काहीसं वाचल्म होतं. पुण्यातल्या अशा एखाद्या संस्थेची माहिती आहे का?
  • Log in or register to post comments

संस्थेचं नाव विसरलो. फोन नंबर

नाव आडनाव
Fri, 11/27/2015 - 12:21 नवीन
संस्थेचं नाव विसरलो. त्यांना फोन केला तर घरी येऊन घेऊन जातात. लहानांचे - मोठ्यांचे सगळ्यांचे कपडे देऊ शकता. त्यांच्या ऑफिस मधे जाऊन पण देऊ शकता. ऑफिस ब्रेमन सर्कल पासून सांगवीकडे येतांना (जेव्हढं मला आठवतंय पुलाच्या आधी ऊजवीकडे एका दुकानात) आहे. फोन केल्यावर ते सांगतीलंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

फोन लावला. राँग नंबर निघाला.

पिलीयन रायडर
Fri, 11/27/2015 - 12:52 नवीन
फोन लावला. राँग नंबर निघाला. :( ह्या निमित्ताने शोधता शोधता हा ही एक ग्रुप सापडला आहे:- JAGRITI CLOTHES COLLECTION DRIVE पण इथे फोन केला असता ते नेहमीच असे कपडे घेत नाहीत असं कळालं. त्यांनी मध्यंतरी एक कॅम्प केला होता. त्याचे हे पेज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

ओह... नंबर बदलला वाटतंय. मी

नाव आडनाव
Fri, 11/27/2015 - 13:46 नवीन
ओह... नंबर बदलला वाटतंय. मी फोन केला होता आत्ता. संपादक, जर शक्य असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकता येइल का? चुकिचा नंबर ठेवायला नको. मी शनिवारी / रविवारी त्या भागात गेलो तर नवा नंबर आणि संस्थेचं नाव अपडेट करतो इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

केसरीवाड्याच्या शेजारी अशा

आदूबाळ
Fri, 11/27/2015 - 12:29 नवीन
केसरीवाड्याच्या शेजारी अशा एका संस्थेचं दुकान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हो.. बहुदा केसरीवाड्यात

पिलीयन रायडर
Fri, 11/27/2015 - 12:38 नवीन
हो.. बहुदा केसरीवाड्यात त्यांची मीटींग व्हायची. कुठेतरी अगदी पेठांमधलाच पत्ता होता. एकंदरीत अशा संस्थाना कपडे देण्याचा अनुभव कसा आहे? कुणी कधी कपडे दिले आहेत का? मला फक्त दिलेल्या गोष्टींचा सदुपयोगच व्हावा इतकीच इच्छा आहे. नाव आडनाव धन्यवाद! लगेच फोन करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मी दिलेले आहेत पण ते मुंबैत

टवाळ कार्टा
Fri, 11/27/2015 - 13:25 नवीन
मी दिलेले आहेत पण ते मुंबैत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सहज म्हणुन लोक बिरादरी

पिलीयन रायडर
Fri, 11/27/2015 - 13:45 नवीन
सहज म्हणुन लोक बिरादरी प्रकल्पाची साईट पाहिली. ते ही अशा वतु घेतात असं लिहीलय आणि पुण्या मुंबईतले संपर्क दिले आहेत. पैकी पुण्यातल्या व्यक्तिने सांगितले की इथुन कपडे नेणे अवघड जात असल्याने सध्या ते काही घेत नाहीयेत, पण त्यांनी सुद्धा केसरीवाड्यातल्या कलेक्शन सेंटरचा नंबर दिलाय. स्नेहालय केसरी वाडा सचिन - ९०११०३३०११ वेळ - गुरुवार आणि रविवार - सकाळी ११-२ सर्व प्रकारचे कपडे, खेळणे घेतात. पुढे ह्या वतु २५ वेगवेगळ्या संस्थांना जातात. मी ह्या रविवारी जाण्याचा विचार करत आहे. अनुभव सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

जुने कपडे - केसरीवाड्यापर्यंत

पिलीयन रायडर
Mon, 11/30/2015 - 12:24 नवीन
जुने कपडे - केसरीवाड्यापर्यंत काही जाणे झाले नाही. तेव्हा वॉचमन, सफाईवाला, कामवाल्यामावशी.. अशा लोकांनाच कपडे वाटुन टाकले. खेळणी तेवढी आहेत. ती आजुबाजुलाच लहानमुलं बघणार आणी देऊन टाकणार. पुढचा प्रश्नः- पुण्यात चांगले फर्निचर कुठे मिळेल / चांगला सुतार कुणाला ठाऊक आहे का? १. एकबोटेसारखे नामवंत शोरुम्स - उत्तम डिझाईन्स पण महाग २. पेपरफ्राय - व्हरायटी आणि किफायतशीर , पण डायरेक्ट घरात आल्यावरच कळणार की प्रॉडक्ट कसे आहे. नाही आवडले तर परत पाठवा. पैसे परत मिळवा. ह्यात बराच वेळ जाण्याची शक्यता. ३. सुतार - हवे तसे घडवुन घेता येते पण मग एकदा घरात आले की ह्या मंडळींना बाहेर काढणे अवघड. शिवाय जसे ट्रेन्डी / एथनिक डिझाईन्स एकबोटे किंवा पेपरफ्राय सारख्या तत्सम साईट्स वर दिसतात तसे घडवुन घेता येतात का ते माहित नाही. (मला घराचा कोपरा न कोपरा लाकडाने मढवुन "इंटिरियर" करयाचे नाहीये. आवश्यक तेवढ्या गोष्टी करुन घ्यायच्या आहेत किंवा तयार आणायच्या आहेत. उत्तम लाकुड आणि अ‍ॅण्टीक/ वेगळे डिझाईन हे निष्कर्ष आहेत)
  • Log in or register to post comments

पेपरफ्राय वरच्या प्रॉडक्ट

प्रसाद१९७१
Mon, 11/30/2015 - 13:21 नवीन
पेपरफ्राय वरच्या प्रॉडक्ट बद्दल मला पण माहीती हवी होती. कोणाला काही अनुभव आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पेपर फ्राय भारी

अभ्या..
Mon, 11/30/2015 - 18:25 नवीन
पपर फ्रायवरुन मित्राने डबल बेड मागवला. तेच डिझाईन गोदरेज ईंटेरिओचे पाह्यले. ते २० के च्या वर जात होते डिस्कांऊट पकडून. पेपरफ्राय वर ११७०० ला मिळाला. सीओडी पण दिली. सोलापूरात फ्री डिलीव्हरी दिली ५ दिवसात. पीसेस मध्ये आला. पुण्यात असेल तर इन्स्टॉलेशन फ्री मिळते म्हणे. कंपनीच्या पोरीने संगितले लोकल कारागीराकडून करुन घ्या. बिल मेल करा. तेवढी अमाऊंट पेबॅक पण झाली. (आम्ही आमचा कारागीर लावून ८०० चे बिल पाठवले. ६०० सँक्शन झाले ;) ) क्वालिटी एक नंबर आहे. फिनेश ईंटरनॅशनल लेवल चे आहे. बेडवर मेड इन मलेशियाचा स्टॅम्प आहे. ऑलोव्हर बेस्ट प्रॉडक्ट अन बेस्ट सर्विस वाटली. व्हरायटी पण भारीपैकी आहे गोदरेज ईंटेरिओपेक्षा. अर्बन लॅडर ज्यादाच महाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

माझ्या मैत्रिणीने एक मोठा

पिलीयन रायडर
Tue, 12/01/2015 - 10:55 नवीन
माझ्या मैत्रिणीने एक मोठा वॉर्डरोब, बेड आणि शु रॅक मागवले. तिन्ही उत्तम आहेत. एकदा एका प्रॉड्क्ट मध्ये काही तरी मायनर प्रॉब्लेम होता तर त्यांनी परत नेला आणि नवीन आणुन दिला. आता तर म्हणे त्यांची सर्व्हिसही चांगली झाली आहे. आधी थोडेसे प्रॉब्लेम होते ट्रान्सपोर्ट मध्ये ज्यामुळे तुटलेले फर्निचर यायचे. मग ते परत पाठवा वगैरे भानगडी. काहीतरी मागवुन पहावे असे वाटत आहे खरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पेपरफ्रायच्या किचन ट्रॉली

नाव आडनाव
Tue, 12/01/2015 - 11:48 नवीन
पेपरफ्रायच्या किचन ट्रॉली (आणि बाकी किचन मधलं फर्निचर) आहेत का? कोणी ट्रॉलीचं काम त्यांच्याकडून केलंय का? त्यांच्या साईट वर काही दिसलं नाही. माझ्या घरी करायचंय, पण इथे लिहिलंय तसं पेपरफ्राय ची क्वालिटी चांगली आहे आणि किंमत गोदरेज पेक्षा कमी आहे, तर पेपरफ्राय चा ऑप्शन चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

किचन ट्रॉली आहेत पण कमी आहेत.

अभ्या..
गुरुवार, 12/03/2015 - 11:48 नवीन
किचन ट्रॉली आहेत पण कमी आहेत. इतर ओप्शन चेक करा. गोदरेजचे रेट जास्त आहेत पण चीज एक नंबर असते. ते आरएन्डी वर केलेले पैसे काढतात. थोड्या दिवसात त्याच्या कॉप्या लोकल मार्केटला येतात. गोदरेजचे फिनीश अन ऑपरेशन स्मूथ आहे प्रचंड. ते मात्र कॉप्यात मिळत नाही. इंटेरिओचे आता घेऊ नका. सध्या लग्नसराईचा पीक पिरिअड असतो त्यांचा. ऑफर नसतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल्ल ऑफर येतात. क्लीअरन्स सेल असतात. अगदी निम्म्या किमतीपर्यंत मिळू शकतात. मी स्वतः माझे कम्प्युटर टेबल असेच ऑफर मधून उचलले. लै परफेक्ट आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

अहो साहेब तुम्ही http://www

प्रमोद देर्देकर
Wed, 12/02/2015 - 09:36 नवीन
अहो साहेब तुम्ही http://www.pepperfry.com/ या साईटवर जा. भरपुर पर्याय आहेत तिथे. मी आपला पत्ता , फोन क्रमांक देवुन स्वत:ला नोंदणी करुन घेतयावर लगेच एक संदेश आलाय की तुम्हाला रु. १०,००० चे कुपन प्राप्त झाले आहे. आत हे खरे खोटे देव जाणे.
  • Log in or register to post comments

आमच्या घरच्या आंब्याला मोहोर

संदीप डांगे
गुरुवार, 12/03/2015 - 11:31 नवीन
आमच्या घरच्या आंब्याला मोहोर आलाय. डिसेंबरात मोहोर येतो काय? तसेच झाडाला अर्धशिशि झाल्यागत एकाच बाजूने मोहोर आलाय. असे का होते ते कुणाला काय म्हाइत है का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा