किडा वळवळला अन …
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
* सत्यघटनेवर आधारित, अत्यंत काल्पनिक कथा.
हवेत सकाळच्यावेळीही उकाडा जाणवत होता, गुन्हा-अन्वेशनच्या कचेरीसमोर पोलिस व्हँन उभी होती, नुकतेच बाहेरून आत आलेला इंस्पेक्टर, कचेरीत जमलेल्या सर्वांवरून नजर फिरवत होता, सगळे आपापसात एकमेकांकडे पाहत होते, चालू फ्याशनप्रमाणे त्या पोरसवदा युवकांची, मानेवर रूळणारी व कान झाकणारी अशी, सिनेमातल्या अँन्ग्रीयंगमँन हिरोसारखी हिप्पी केशरचना होती, लांब कॉलर शर्ट अन बेलबॉटम पँट वेश. गावात अफवांचा पूर आला होता. भीतीचे सावट अधिक गडद झालेले. सायंकाळनंतर अंधार पडताच रस्ते निर्मनुष्य होऊ लागलेले. आजकाल अमावास्या आली कि आज काहीतरी विपरीत घडणार असे समजून लोक घराबाहेर पडत नसत. पोलिसांची निरनिराळी पथके खुन्यांच्या मागावर होती. मनावर दडपण घेऊनच लोकं रोजचे वर्तमानपत्र उघडत होते. या साखळी खूनसत्राच्या काळात, शहराच्या मनातील दहशत कमी होण्याची नितांत जरुरी असल्याने तो इंस्पेक्टर आपले काम, कितीही शुल्लक का दिसेना, अतीचोखपणे बजावू पाहत होता. म्हणून त्याने घोळक्यातल्या, मधे उभा असलेल्या आणि, रडून सुजलेले वाटावे अश्या डोळ्याच्या मुलाकडे, नजर रोखत म्हणाले 'बोला काय ?'
युवकाने आपली कैफियत कहाणी सुरु केली 'साहेब माझा भाऊ, अनिल गोखले, अजून तपास लागत नाही, काहीच कळवलं जातंय नाही हो अजून, साहेब काही तरी करा !'
'तपास लागेल, तुम्ही धीर धरा, मी नीट तपास लावतो, तुम्ही घाबरून जाऊ नका, आम्ही आजूबाजूला आहोत, पोलिसांना आपले काम करू द्या !' असे सर्वांना पुन्हापुन्हा सांगून इंस्पेक्टर माणिकराव दमामे खुर्चीवर बसले. त्यांना केस लगेचंच लक्षात आली, अशा प्रकारे तरुण मुलगा घरातून नाहीसा होण्याची घटना शहरात दुर्मिळ होती. त्यामुळे या प्रकरणाची गावात चर्चा होणे स्वाभाविकच होते.
'मोठी आशा ठेवून येतो साहेब आम्ही, जरा प्लीज समजून घ्या, आमच्या मित्राची स्थिती प्लीज', घोळक्यातला चष्मा लावलेला गोखलेचा मित्र कमालीच्या संयमी सुरात म्हणाला.
'बाकीचे तुम्ही कोण ?' इंस्पेक्टरने विचारले
'सर, आम्ही याचे वर्गमित्र', गोखलेच्या खांदयावर हात ठेवत तो म्हणाला, पुढे तो काहीच बोलला नाही, गोखलेच्या चेहेर्याकडे बघवत नव्हते, सगळ्यांचीही तोंडे उतरून गेलेली. खरंतर सहाय्यक आयुक्त मधुसूदन हुल्याळकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मागचे कित्येक दिवस कसोशीने तपास चालला होता, तरीही समोरच्या पार्टीला बर वाटावं म्हणून, इंस्पेक्टरने परत समजावून सांगितलं की, 'तुम्ही कुठं काही पाहिलं ऐकलं की ज्याची आम्हाला तपासात मदत होईल तर जरूर कळवा'. सर्वजण परत फिरून बाहेर गेले तरी तो घुटमळत उभा होता,
'अनिल गोखले हा फार उमद्या व उदार स्वभावाचा आहे हो, आणि वर्तनाने सुद्धा निर्मळ' थोडं थांबून तो थंड चेहेर्याच्या चाश्मीस पुढे बोलू लागला, 'पण राहून राहून मनात कुशंका येत आहेत की अनिलचा, प्रकाश हेगडेसारखा मर्डर झाला नसेल ना...?'
'तपास चालू आहे' असे त्रोटकपणे सांगताना इंस्पेक्टरने त्याला 'आता निरोप घ्या' अश्या अर्थाने केबिनच्या दरवाज्याच्या दिशेन हात केला. तो निघून गेला आणि त्याच्या बोलण्यात त्याक्षणी इंस्पेक्टर काहीच आक्षेपार्ह वाटले नव्हते, पण तरीही आतून काहीतरी खटकले होते, पण नक्की काय, ते त्याच्या जागृत मनाला अजून उमगत नव्हते. त्याला माहिती होतं की, अंतर्मन जास्त संवेदनाशील असते, म्हणूनच आता, ते जागृत मेंदूला, काहीतरी खटकल्याच्या भावनेतूनच, धोक्याची सूचना देतं असावं काय ? ऑफिसरच्या डोक्यात 'किडा' वळवलला, त्यांना कशाचीतरी अचानक आठवण आली व त्यांनी टेबला जवळच्या शेल्फमधील मागच्या वर्षीची फाईल चाळायाला लागले, त्यांना हवे ते पान मिळाले, त्याच्यावर नोंद होती प्रकाश हेगडे केसची……… दफ्तरात तिची मिसिंग-केस अशी नोंद होती……….. तर मग तो मगाचचा ढापण्या, मर्डर झाला असं का म्हणाला ...????
इंस्पेक्टरने कॉन्सटेबल किसनला हाक मारून बोलावून घेतलं, विचारलं 'आता जी पोरं गेली त्यांची नावं तू विचारलेली ना ? ते जेव्हा चौकीत आलेले तेव्हा ?'
'हो साहेब' किसन उत्तरला.
'त्या हिप्पीकटवाल्या ढापण्याचं नाव काय होतं ?'
'साहेब त्याचं नाव होत ….अं …. राजेंद्र … हा… आठवलं …. राजेंद्र जक्कल' किसन उत्तरला
आता तपास व्हायचा होता ह्याच गोष्टीचा, आणि ह्याच नावाचा….
प्रतिक्रिया
जोशी अभ्यंकर हत्या....???
होय बरोब्बर !
हम्म.. लोकांची ***** कॅश
+१.
कपिलमुनींचे या फोटोसाठी मनःपूर्वक धन्यवाद
बापरे..जबरदस्त.
अनुराग कश्यपने पांच सिनेमाची
माफीचा साक्षीदार आणी पांच हे दोन्ही चित्रपट
मस्त
हा य ला !!
काहीही हाॅ मा.प.
मस्त!
पु भा प्र . क्रमश: असेल ना
बस उताच क्रमशः नै होना.
मुनावर शहाच्या "येस आय अॅम गिल्टी" ....