✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 08/09/2015 - 12:49  ·  लेख
लेख
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा. मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्‍या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो. लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते. आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल. आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्‍यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66203 वाचन

💬 प्रतिसाद (211)

प्रतिक्रिया

काय हे, इतकी सगळी चर्चा झाली,

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/13/2015 - 23:13 नवीन
काय हे, इतकी सगळी चर्चा झाली, पण त्याअगोदर (किंवा आतापर्यंतही) कोणी तरी, कमीत कमी खालील शब्दांच्या "सर्वमान्य व्याख्या" ठरवल्या / दिल्या आहेत का ? १. इरोटिका २. पोर्न ३. संभोगविकृती (अननॅचरल सेक्स) यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनातल्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. या व्याख्या सुरुवातीलाच स्पष्ट केल्याशिवाय केलेल्या वादविवादात कोण नक्की कश्याबद्दल बोलत आहे हे कसे समजणार ?!
  • Log in or register to post comments

खरंय..

संदीप डांगे
गुरुवार, 08/13/2015 - 23:36 नवीन
खरंय.. संत्री आणि मोसंबीत गोंधळ आहे असं दिसतंय, डॉक्टरसाहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हल्ली प्रतिसाद लिहायला

प्यारे१
गुरुवार, 08/13/2015 - 23:44 नवीन
हल्ली प्रतिसाद लिहायला टंकनिका आहेत काय? की आमच्या गविंकडच्या टंचनिकेला 'हायर' केलंय? प्रबोधन खूप झालं असं वाटायला लागलं आहे. - पॉर्ननकोपणडिस्कशनआवर संघटनेचा सचिव प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

;-)

संदीप डांगे
Fri, 08/14/2015 - 00:34 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

छान

श्रीकृष्ण सामंत
Fri, 08/14/2015 - 06:52 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी अतिशय नाजूक विषयाला "तोंड फोडून" (मालवणी वाकप्रचार), अश्लिल विषयात जास्तीत जास्त शील ठेवून, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देतील ह्याचा, धोका पत्करून चर्चा घडवून आणली याबद्दल ते सर्वांच्या कौतूकास पात्र आहेत असं मला स्वतःला वाटतं. एकूण सर्व प्रतिसाद वाचून जून्या माहितीची उजळणी झाली आणि नवीन माहिती काही तरी शिकवून गेली असं मला वाटलं.सर्वांनी प्रतिसाद उत्तम दिले आहेत. त्यातल्यात्यात श्री.सुबोध खरे यांचे प्रतिसाद अतिशय उद्बोधक वाटले.हे वाखाणण्यासारखे आहे. धागाकर्त्याने विषयाचा समारोप केला असल्याने,यापुढे मला या विषयावर जास्त प्रतिसाद देणे नलगे.मात्र इतरांचे प्रतिसाद आल्यास जरूर वाचिन.
  • Log in or register to post comments

सहमत !

सामान्यनागरिक
Sun, 08/16/2015 - 17:12 नवीन
डांगे यांनी एकदम योग्य विचार मांडले आहेत. खासकरून शेवटचा विचार ! एकुणच दृकश्राव्य माध्यमे एवढी वाढली आहेत की मेंदूचा वापर कमी होत चालला आहे । जे काही दूरचित्रवाणी , संगणक ,आणि भ्रमण कवनीच्या पडदयावर दिसतं ते तसंच गिळंकृत करण्याची सवय लागत चालली आहे. पुढच्या पिढीत हे अजुनच वाढणार आहे कारण एकुणच शिक्षणाबिषयीचे धोरण . स्वतःचा विचार करणे,मांडणे हीच गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे
  • Log in or register to post comments

नि:शब्द

नमकिन
Sun, 08/16/2015 - 17:40 नवीन
परिपोर्न परिवारिक प्रहसन करु शकले जर हिरिरीचे समर्थक तर नक्कीच संपूर्ण समाज संभोगातून समाधीकडे पोहोचलाच म्हणून समजा. काय १-१ तारे चमकले, विचारु नका. मेक इन इंडिया सुरु झाले तर नक्कीच उत्कट शृंगारिक प्रणय सा-रा विश्वात तळपत राहिल याची खात्रीशीर चाचपणी व तज्ञ मंडळी शोधण्यासाठीच हे "बंदी" प्रकरण करण्यात आले आहे का असा वास येतोय. पुढे पुरेपुर पोर्नापूर- कामातुरं न भयं न लज्जा!
  • Log in or register to post comments

200 गाठण्यासाठी 'हात'भार.

जेपी
Mon, 08/17/2015 - 08:02 नवीन
200 गाठण्यासाठी 'हात'भार.
  • Log in or register to post comments

वाह रे व्वा!

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/17/2015 - 09:12 नवीन
वाह रे व्वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

व्वा व्वा व्वा! ;-)

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/17/2015 - 09:13 नवीन
व्वा व्वा व्वा! ;-) २०० :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

क्लासरूममध्ये पॉर्न पाहणाऱ्या

मदनबाण
Mon, 08/17/2015 - 09:47 नवीन
क्लासरूममध्ये पॉर्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Live: PM Narendra Modi interacts with Indian workers at ICAD PM Modi in UAE: Abu Dhabi has deep pockets, but will it loosen purse strings for India?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा