✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जय हो

अ
अमेयहसमनीस यांनी
Mon, 08/25/2008 - 12:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1521 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

पर्यावरणपूरक मूर्ती

दत्ता काळे
Mon, 08/25/2008 - 13:50 नवीन
अमेया हॉलंडची तशी अट असू शकते. आणि आपल्या पर्यावरणाबद्दलच्या नियमांची पायमल्ली देखील देशमुखांनीच केलेली आहे. उदा. कालच्या दहीहंडीला प्रचंड आवाजाच्या स्पीकर्सच्या मोठ्याला अनेक भिंती उभारुन लोकांच्या छातीमध्ये धडकी भरवली. कारण विलासरावांना ते ऐकुच येत नव्हते. हा कार्यकर्त्याना सांभाळून घेण्याचा खेळ आहे.
  • Log in or register to post comments

ते देशमुख वेगळे आहेत.

कुंदन
Mon, 08/25/2008 - 14:08 नवीन
मुळ बातमी खालील प्रमाणे आहे , "सकाळ" मध्ये...... पुणे, ता. २४ - लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली आणि बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सव परदेशातही साजरा होऊ लागला. यंदा प्रथमच हॉलंडच्या हेग शहरात गणेशोत्सव साजरा होणार असून, यासाठी सोमवारी पुण्यातून गणेशमूर्ती रवाना करण्यात येत आहेत. दगडूशेठ गणपती मूर्तीची प्रतिकृती असलेली ही मूर्ती "नटराज आर्ट'चे मूर्तिकार भालचंद्र देशमुख यांनी तयार केली आहे. या मूर्तीचे वजन २१ किलो असून, उंची २ फूट आहे. निनाद संस्थेच्या सहकार्याने आज विमानाने मूर्ती हॉलंडला जाणार आहे. लंडनच्या "हिंदू हेरिटेज ऍण्ड कल्चरल सोसायटी'तर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ही संस्था गेल्या चार वर्षांपासून लंडनमध्ये उत्सव आयोजित करत असून, यंदा प्रथमच हॉलंडमध्येही साजरा होणार आहे. यात २९ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता हेग शहरातील "श्रीकृष्ण मंदिरा'त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या वेळी २५ देशांतील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ३० ऑगस्टला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, ३१ ऑगस्टला भव्य शोभा यात्रेने मिरवणूक काढून हेगच्या समुद्रात मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी संस्थेच्या बॅंकॉक, सिंगापूर, पटाया येथील सदस्यांच्या सहकार्याने थायलंडमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. मूर्तीबाबत देशमुख म्हणाले, ""मूर्ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करून निर्माण केली आहे. मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला असून, ती पर्यावरणपूरक आहे. ही मूर्ती १५ दिवसांत पूर्ण करण्यात आली. पुण्यात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात झाल्यामुळे मूर्ती पुण्यातून मागविण्यात आली आहे.'' रविवारी दुपारी सदाशिव पेठेतील सुभाषनगरमध्ये या गणेशमूर्तीची पूजा करण्यात आली. या वेळी नगरसेविका शुभदा जोशी, उदय जोशी, निनाद संस्थेचे चंद्रकांत सणस, रामलिंग सणस, अनिल शिदोरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय जोशी म्हणाले, ""रविवारी संध्याकाळी ही मूर्ती मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. उद्या सकाळी ती "केएमएल' एअरवेज या विमानाने ती हॉलंड येथे रवाना होईल.''
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा