✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

( स्टार्कची लेकरे )

प
पगला गजोधर यांनी
गुरुवार, 07/23/2015 - 12:32  ·  लेख
लेख
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो. (*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत ) जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. त्याच्या लेकरांबद्दल एकुणात गोंधळच आहे, विशेषतः ब्रान व रीकॉन बद्दल (पण ते पुन्हा कधीतरी ). एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की जॉन स्नोचा जन्म हा लायेनाच्या (एडार्डची बहिण) पोटचा. असे का ?... यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता राजसिंहासन-क्रिडा* वर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर एडार्ड स्टार्कच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही जॉन स्नोवर आहे) :). जॉन लौकिकार्थाने एडार्डचा अनौरस पुत्र, म्हणुन मग ही सगळी स्टार्कची लेकरे :) जॉन स्वतः राजसिंहासन-क्रिडा*तल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. जॉनभवतालचे वलय खरे सांगायचे तर टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अश्या इतर पात्रांमुळे झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अशी पात्रे मिळुन राजसिंहासन-क्रिडा*वर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते, असे नाही पण या पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. कृष्णकिल्ल्याचा जुना किल्लेदार सेर आलीसरच्या वलयातुन बाहेर पडुन जॉनने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही शेवटी आपल्याला , 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. रॉबसुद्धा त्याच्या साहसी मोहिमातील शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या ४-५ माजली उंचीच्या बुरूजावरून पडल्यामुळे अपंगत्व आलेला ब्रान किंवा त्यासोबतचा रीकॉन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात. त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या स्टार्कपुत्रांसाठी हा लेख. हिम अग्नी सुगमगीतानुसार एडार्डला ५ औरसमुले: १.रॉब २.सांन्सा ३.आर्या ४. ब्रान ५. रीकॉन (६. जॉन स्नो अनौरस पुत्र) हिम अग्नी सुगमगीतामध्ये जॉन स्नो रॉबपेक्षा काही वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझे एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला असावा असा तर्क करुन कदाचित, जॉन स्नो हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा. अजुन एका मुलाचा उल्लेख काही दृष्टांतामध्ये येतो. नेमक्या दृष्टांताचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा पहिल्या दुसर्या पर्वात रीकॉनचा उल्लेख येतो. हा एडार्डचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. यापर्वानुसार रीकॉन ब्रानबरोबर प्राणरक्षणार्थ पलायनामध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. हिमभिल्लां बरोबर त्यांचे छोटेखानी चकमक झाली त्यात होडॉरबरोबर ब्रानदेखील बेपत्ता झाला. मात्र नंतर पुढीलकाळात त्यांचे काय झाले आणि विंटरफेलचे राज्य त्याला मिळते का सांन्साला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. पुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करु नये, विशेषतः ज्याच्या संरक्षणात इतकी वर्षे आपण लाहानाचे मोठे झालो . या नियमाला थिऑन ग्रेजॉयकडून तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे नंतर करत असत. एडार्ड व कँटलीनची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की एडार्डच्या उपस्थितीत फार कमी कुटुंबियांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन विद्रोह करून तरी कधी मागुन राजहस्तपद स्वीकारून. कँटलीन मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकली किंवा कदाचित तिला तितकीशी संधी नाही मिळाली. तिच्या दोन मुलांवर तर शत्रूने तिच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ले केले. सर्वप्रथम बळी गेला रॉबचा. त्याला बोल्टनने मारले. त्याच्यापूर्वी ब्रानचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी पाळलेल्या कोल्ह्याने हल्लेखोरापासुन त्याला वाचवले आणी स्वतः हल्लेखोराशी युद्ध सुरु केले. एडार्ड व कँटलीन स्वतः मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही शत्रूने मारले. जॉन स्नोच्या मरणोत्तर संदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर त्याच्याच सहकार्यांनी पाठीत वार केले असे एकेठिकाणी दृष्टांतात दाखवतात, तर दुसरीकडे हेच म्हणतात की त्याला अग्निपूजक चेटकीण मेलीसांद्रे पुनर्जीवित करते. कोणी म्हणतो तो श्वेतचलवादी बनतो, नक्की काय कळत नाही. पण तो जिवंत असताना हिमभिल्लीण यीग्रीट (त्याची एकेकाळची प्रेमी), ऐमनऋषी, सँमवेलं टारली ही लोकं म्हणजे जॉनचे कवच होते. जोपर्यंत हे आजूबाजूला होते तोपर्यंत जॉन सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मृत्यू पावले किंवा दूर गेले. रानटी हिमभिल्लांना, महाभिंती आड येऊ देणे म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे असे वाटून, रात्रप्रहरी दलातले इतर सर्व कृष्णयौद्धे, मनाने जॉन स्नोपासून दुरावले, त्याच्या अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या विश्वासू लोकांनी वार केले. तिथे सँमवेलं टारली असता तरीही फारसा फरक पडला नसता. इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांच्या विश्वासघातासमोर जॉन थोडासा किरकोळीत गेला आहे. परंतु हिम अग्नी सुगमगीताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. एडार्ड स्टार्कचा सर्वात निष्णात शूर पुत्र दगाफटक्याने पडला. सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की ५ व्या पर्वाच्या शेवटी, जॉन स्नोच्या मृत्युसरशी एडार्ड स्टार्कचा वंश पुर्णपणे संपला. मंगल सिध्यर्थम्, अमंगलता नाशार्थम्, निंदाबूध्दी नाशार्थम्, मिपाआचार्य वचनात .............. कर्म अहं करिष्ये II सुचना --- मिपासमस्त ब्रम्हवृंदांच्या सेवेस्तव अल्पज्ञानात लिहीलेले आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
15913 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

पण सामान्य सैनिकाला हे कुठे

sagarpdy
गुरुवार, 06/23/2016 - 20:29 नवीन
पण सामान्य सैनिकाला हे कुठे माहिती आहे? त्याच्या नजरेस ऐन वेळेला "सान्सा घेऊन आलेले सैन्यच" आहे व सोबत आलेला धुतलेला तांदूळ लिटलफिंगर. पण शोवाले एवढा विचार करतात का ते काय माहिती!?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

अग्रीड, त्यांच्या नजरेत

अंतु बर्वा
गुरुवार, 06/23/2016 - 20:49 नवीन
अग्रीड, त्यांच्या नजरेत सांसानेच जिंकवलेल युद्ध आहे हे. जे काही अंशी खरही आहे म्हणा. सांसाच्या पात्रात झालेला खुप मोठा बदल आहे हा. कुठे परिस्थितीपुढे हतबल होउन रडणारी सांसा आणि कुठे ऐन वेळी बेलिश तर बेलिश पण वेळ पडल्यावर शत्रुलाही मित्र बनवावे लागते हे समज्लेली, किंवा राम्झी माईंड गेम खेळणार्च याची ग्वाही देणारी सांसा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

ओ काकू, शिरेस होऊ नका

पगला गजोधर
गुरुवार, 06/23/2016 - 13:22 नवीन
ओ काकू, शिरेस होऊ नका, "ल्लूल्लूल्लूल्लू ;)" स्मायली पण ध्यानात घ्या ... चेष्टा केली होती ... अवांतर : नै तरी ती पोरगी (सांसा) अंमळशी मंदच आहे..... त्याऐवजी आर्या पहा ... सुऱ्याने २-३ वार होऊनही, चेहऱ्यावरच्या वेदना पहा, जसकही अजीर्णामुळे थोडंसं पोटांत दुखतंय... असे ... अति अवांतर : मुलीं मध्ये पहा थिऑन ची बहीण, डीनेरिस, आर्या, ब्रियेन पहा कश्या ऍक्टिव्ह आहेत ..... नै तर ही ... http://www.theverge.com/2016/6/20/11974424/game-of-thrones-recap-season-6-episode-9-battle-of-the-bastards
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

+1

sagarpdy
Wed, 06/22/2016 - 18:11 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

सान्सा...लय भारी

sagarpdy
Mon, 06/27/2016 - 12:12 नवीन
सान्सा...लय भारी हिवाळा आलाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

हिवाळा आलाय... :)

पिशी अबोली
Tue, 06/28/2016 - 19:09 नवीन
हिवाळा आलाय... :) शेवटचा एपिसोड काय काय धक्के देऊन गेला.. पण त्या बॅकग्राऊंड स्कोरने वेड लावलंय. काटा उभा केला अंगावर. एरवी मारामारीच्या बाबतीत जीओटीकडे सटल्टी म्हणतात ती नसते असं मला वाटतं. एकदम डायरेक्ट कत्तल. पण या म्यूझिकने असली काही वातावरण निर्मिती केली, की कायतरी महाभयंकर होतंय याची जाणीव होत राहिली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अगदी अगदी, बाप निघाली ती

स्रुजा
Tue, 06/28/2016 - 20:35 नवीन
अगदी अगदी, बाप निघाली ती सरसे सगळ्यांचा. म हा न एपिसोड !!! आर्या पण भन्नाट. मला तो ब्राव्होस चा ट्रॅक थोडा वेळ वाया घालवणारा वाटला होता पण तो शेवटी योग्य मार्गाला लागला. जेमी ची प्रतिक्रिया बघायची आहे आता, त्याचा शेवटचा मुलगा ही मेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

पुढच्या सीजनमध्ये सरसेई मरतीये बहुतेक...

पगला गजोधर
गुरुवार, 06/30/2016 - 16:16 नवीन
टीरियन/ जेमी / आर्या अथवा इलारिया सॅण्ड (इंदिरा वर्मा) यांच्यापैकी कोणाच्यातरी हातून यातील टीरियन/ जेमी हे लहान भाऊ आहेत, (जेमी जरी जुळा असला तरी काही क्षण नंतर जन्मलेला) आणि सरसेई च्या लहानपणी (सीजन ५) चेटकिणीचं भाकीत असतं ... तुझी तिन्ही मुलं तुझ्या हयातीत मरतील व तुझा मृत्यू कोणीतरी जवळच्याच्या हातून येईल .... किंवा आर्या बदला घेईल किंवा इलारिया ही ओबेरायन च्या मृत्यूचा बदला घेईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

सरसी नक्की शत्रूच्या हातून

sagarpdy
गुरुवार, 06/30/2016 - 16:34 नवीन
सरसी नक्की शत्रूच्या हातून मरत नाही. एकतर जेमी नाहीतर स्वतःच सुरू केलेल्या आगीत मरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

सरसे जेमी किंवा टिरियन च्या

स्रुजा
गुरुवार, 06/30/2016 - 18:51 नवीन
सरसे जेमी किंवा टिरियन च्या हातुन च मरणार नक्की ! जेमी च्या हाताने मेली तर जेमी चा केटलीन ने सोडल्यापासून आणि हात गमावल्यामुळे जो सद्सदविवेक बुद्धी जागी होण्याचा प्रवास सुरु झालाय तो पूर्ण होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

सर्सी इतक्या लवकर मरेल असं

पिशी अबोली
Fri, 07/01/2016 - 16:51 नवीन
सर्सी इतक्या लवकर मरेल असं वाटत नाही. आता टॉमेन गेल्यावर माणुसकीशी शेवटचा संबंध संपलाय तिचा. स्वतःचंच भूत जिवंतपणी कसं छळेल तिला ते नक्कीच दाखवतील ते. 'इन द गेम ऑफ थ्रोन्स आयदर यू विन ऑर यू डाय' हे तिचं तत्वज्ञान होतं. पण ते तसं नाही हे हा तिच्या पात्रामार्फत शो पुरेपूर दाखवेल असं वाटतंय. मार्जरी गेली याचं फारफार वाईट वाटलं. तिच्या हातात काहीच नव्हतं..तिने सर्सीला हाय स्पॅरोइतकं कमी लेखलं नसतं. पण ती कधी ना कधी जाणार हे माहीतच होतं.. तरी.. :( या सीजनने बोल्टन, फ्रे, बराथियन(नावापुरता तरी शिल्लक असणारा), आणि टायरेल असे हाऊस संपवून टाकले डायरेक्ट! आणि सान्सा..माझी आवडती सान्सा.. सत्तेसोबत येणार्‍या गोष्टी माहीत आहेत तिला. सत्ता नको असं नाही, पण या क्षणी मिळवणं किती धोक्याचं आहे हे ओळखून आहे ही बया. 'मी तुझं प्यादं नाही' हा संदेश लिटलफिंगरला अगदी स्पष्ट दिला तिने.. मरेल ती नक्की लवकरच.पण मार्जरीसारख्याच बारीक बारीक गोष्टी कळतात तिला सत्तेच्या राजकारणातल्या असं दिसतंय आत्तातरी. बाकी मला व्यक्तिशः देनिरीस, आर्या, ब्रियेन यांच्यासारख्या स्त्री पात्रांना फक्त स्ट्राँग म्हणणं आवडत नाही. ओलेना, मार्जरी आणि सान्सा यांच्यासारख्या माईंड गेम्स खेळणार्‍या बाया जास्त आवडतात. युद्धं फक्त युद्धभूमीवर खेळली जात नाहीत हे दाखवणारा शो म्हणून तर हा शो आवडतो इतका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

लवकर मरेल...

पगला गजोधर
Fri, 07/01/2016 - 18:08 नवीन
सर्सी पुढच्या सीजन मधेच मरणार, पण त्याआधी तिचा अंगरक्षक सर ग्रेगोर क्लिगेनला मरावे लागेल बहुदा. मग त्याचा तोडीच्या नाही पण निदान जवळपास जाणारा हाऊंड (सुधारित आवृत्ती) सॅन्डोर क्लिगेन हा कदाचित ग्रेगोर क्लिगेनला मारेल काय ? म्हणजेच सर्सीला मारण्यात आर्या आघाडी घेती का काय ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

?

चंपाबाई
Wed, 06/22/2016 - 21:54 नवीन
?
  • Log in or register to post comments

बेलिश आणी वेरिस

एनिग्मा
Fri, 06/24/2016 - 02:43 नवीन
बेलिश आणी वेरिस ही दोन पात्र थोडी मनोरंजक आहेत. एक पुर्वेला तर दुसरा पश्चिमेला आहे. दोघे वेस्टोरस पासून लाम्ब राहून वेस्टोरसला कमजोर करत आहेत. येणार्‍या भागान्मधे ह्या दोघाना पाहाण्यात मजा येइल.
  • Log in or register to post comments

ट्रेलर आले ! नवीन ट्रेलर आले !

हर्मायनी
गुरुवार, 06/22/2017 - 12:32 नवीन
आणि शेवटचं सान्साचं वाक्य .. "When the snows fall and the white winds blow, the lone wolf dies but the pack survives." आता तर्क-वितर्कांना उधाण.. आय होप इट्स नॉट जॉन स्नो शी इस टॉकिंग अबाऊट..
  • Log in or register to post comments

लॉर्ड बेलिशला खतम करून टाकणार

पगला गजोधर
गुरुवार, 06/22/2017 - 14:05 नवीन
लॉर्ड बेलिशला खतम करून टाकणार आहे बहुदा ..... आर्या किंवा सांसा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्मायनी

हो ... तसेच होवो .

हर्मायनी
गुरुवार, 06/22/2017 - 15:45 नवीन
आधीच्या ट्रेलर मध्ये आर्याच्या हातात बेलीश चा Dagger होता म्हणे !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा