Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अभिदेश on Tue, 07/21/2015 - 06:12
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?
  • Log in or register to post comments
  • 27393 views

प्रतिक्रिया

Submitted by तळ्यात मळ्यात on Tue, 07/21/2015 - 07:23

Permalink

मराठी चित्रपटांबद्दल आपल्याला

मराठी चित्रपटांबद्दल आपल्याला सहानुभूती असते, पण बरेचसे चित्रपट त्याच त्याच चावून चोथा झालेल्या विषयांवर असतात. वैचारिक झेप घ्यायचं सुचतच नाही कोणाला! गरीब चित्रपट आणि प्रेक्षकांची वानवा हे दुष्टचक्र चित्रपट तयार करणारेच मोडू शकतील. कारण नुसतंच प्रमोशन करुन चार टकली जास्त येतीलही पण डोंगर पोखरून उंदीर निघतो ना! टीपी२ चं काय वेगळं झालं?! आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारे विषय घेऊन ते डोकेबाजपणे हाताळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 07/21/2015 - 07:51

Permalink

बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय,

बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय, चांगले आणि वाईट दोन्ही. म्हणून बघण्याआधी बोलता येणार नाही. टीपी २ भंगार होता. पहिल्या भागाच्या यशामुळे दुसर्‍यांदा लोक्स पहायला गेले असतील तर प्रेक्षकांची फसवणूक केली गेलीये. काहीही म्हणजे काहीही दाखवलय. आमच्या घरातील सगळी मेंब्रं शिनेमा बघताना धाव्व्या मिंटाला झोपली. मीच जरा भक्तीभावाने ७५ टक्के बघितला. मोठ्या प्रमाणावर खर्च करून कायतरी केले म्हणजे ग्रेटच असते असे नाही. त्याला काही ष्टोरी नसली तर असले शिनेमे तयार करून पैसे व वेळ वाया गेले असेच वाटेल. आता तो अगंबाई अरेच्च्या २ आलाय. हिंमतच होत नाही वेळ खर्च करण्याची!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 07/21/2015 - 08:04

In reply to बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय, by रेवती

Permalink

नको बघुस अग बाई अरेच्च्या.

नको बघुस अग बाई अरेच्च्या. सगळी ओवर अ‍ॅक्टींग आहे सोनालीची. बाहुबली छान आहे, पण मगधीराच बेस्ट होता. हे मा वै म
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 07/21/2015 - 22:24

In reply to नको बघुस अग बाई अरेच्च्या. by प्रीत-मोहर

Permalink

बरं झालं सांगितलस, आता नाहीच

बरं झालं सांगितलस, आता नाहीच बघणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Tue, 07/21/2015 - 15:56

In reply to बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय, by रेवती

Permalink

बाहूबली अजिबात आवडला नाही

बाहूबली अजिबात आवडला नाही कदाचित हिंदी डब्ड असेल म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 07/21/2015 - 16:28

In reply to बाहूबली अजिबात आवडला नाही by सानिकास्वप्निल

Permalink

+१

बाहुबली अजिबात आवडला नाही. कथानकाचा नीट पत्ता नाही. दोन तीन तुकडे एकत्र चिटकवले आहेत. युद्धाची भव्य दिव्यता आवडली. बाकी, आता २०१६ मधे रिटर्न बाहुबली पाहणं आलं. सालं पब्लिक इतकी चित्रपटावर तुटून कशी पडली ते मला काही कळेना. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 07/21/2015 - 16:00

In reply to बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय, by रेवती

Permalink

'टीपी 2' हा अत्यंत भिकार आणि टुकार चित्रपट होता

हेच मी माझ्या परीक्षणात लिहिले तर काय गहजब झाला होता मिपावर. काही सदस्यांनी तर रवि जाधवचे स्वीय सहायक असल्यासारखे वैयक्तिक टीकेचे वार केले होते. तसं मिपा अशा प्रकारच्या निरर्थक हुज्जतीला नवं नाही. या लेखावरील प्रतिक्रिया बघून डोळे पाणावले. 'टीपी 2' हा अत्यंत भिकार आणि टुकार चित्रपट होता हे त्रिवार सत्य आहे. प्रियदर्शन जाधवने नायक म्हणून कधीच काम करू नये. त्याचा अभिनय भयंकर होता. रवि जाधवसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकाने इतका सुमार दर्जाचा आणि भिक्कार चित्रपट काढावा हे खरेच आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on गुरुवार, 07/23/2015 - 00:00

In reply to 'टीपी 2' हा अत्यंत भिकार आणि टुकार चित्रपट होता by समीरसूर

Permalink

प्रियदर्शन जाधवचा अभिनय भिकार

प्रियदर्शन जाधवचा अभिनय भिकार होता म्हणून छोट्या दगडू ला परत आणावे लागले
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on Tue, 07/21/2015 - 08:55

Permalink

थोडा गृहपाठ आवश्यक आहे.

काही प्रश्नांची उत्तरं मिळालीत तर सोप्पं जाईल १. तेलूगू व मराठी चित्रपटस्रूष्टीची वार्षिक उलाढाल किती २. आंध्रा/तेलंगाना व महाराष्ट्रात चित्रपट बघण्याचा क्रेझ कसा आहे? ३. तेलुगू व हिंदी आणि मराठी व हिंदी भाषेतील साम्य? ४. किती तेलुगू लोकं हिंदी चित्रपट बघतात व तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात? ५. मराठी माणूस मराठी चित्रपटाचं तिकीट ब्लॅक मधे खरेदी करेल काय? ( बाहूबलीचं तिकीट १०००० रूपयाला गेल्याचं वाचण्यात आलय) प्रश्न अजुन आहेत पण असो. मराठीचं दुर्दैव एकच -हिंदी भाषेसोबतचं साम्यं ज्याचा थेट परीणाम मराठी माणसाच्या चित्रपट आवडीवर होतो. एका मराठी माणसानेच सिनेमा भारतात आणला पण तरी इतर पुढे निघुन गेलेत हा आपलाच करंटेपणा म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 07/21/2015 - 09:55

In reply to थोडा गृहपाठ आवश्यक आहे. by अमृत

Permalink

तसेच किती मराठी मंडळी हिंदी

तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात? हा प्रश्न खरेतर किती मराठी मंडळी मराठी चित्रपट बघतात? असा हवा आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on गुरुवार, 07/23/2015 - 15:45

In reply to तसेच किती मराठी मंडळी हिंदी by विशाल कुलकर्णी

Permalink

गहन आणि अर्थपुर्ण....??? व्हॉदफ...

मराठी चित्रपट आधी पण कमीच बघीतलेत. पण किल्ला (वट्ट पैसे घालून थेट्रात) आणि वास्तूपुरूष (घरात , आंतरजालावर, पायरेटेड) पाहील्यावर हाय खाल्लीय!! चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खरं म्हणजे काहितरी वेगळाच अर्थ सांगतेय, जो मला अजिबात कळत नाही आणि समिक्षकांच वाचूनच जर मला चित्रपट कळणार असेल तर असा भिषण , गहन अर्थपुर्ण पिक्चर मी विशिष्ट प्राण्याच्या विशिष्ट ठिकाणी घालीन. (हे दोन्ही अत्युच्च चित्रपट पाहुन मला मिस्टर बीन्स हॉलीडे मधला कार्सन क्ले चा अत्युच्च मुल्यं वगैरे असलेला चित्रपट आठवला...) त्यापेक्षा बजरंगी भाईजान आवडला कारण तो माझ्या अल्पमतीला व्यवस्थित कळला....
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/23/2015 - 18:46

In reply to गहन आणि अर्थपुर्ण....??? व्हॉदफ... by स्वप्नांची राणी

Permalink

वास्तूपुरुष म्हणजे सुमित्रा

वास्तूपुरुष म्हणजे सुमित्रा भावेबाईंचा सिनेमा आहे ना? मी एका बैठकीत बघितला होता. खूप चांगला वाटला. बजरंगी भाईजान लोकांनी बराच जयजयकार करून पाहिलाय पण सलमान खान मला आवडत नाही म्हणून थेट्रात जाऊन पाहणार नाही. जालावर आल्यानंतर व मला लक्षात राहिल्यास पाहीन बहुतेक!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on गुरुवार, 07/23/2015 - 18:54

In reply to वास्तूपुरुष म्हणजे सुमित्रा by रेवती

Permalink

हो तोच, पण मला त्यात काहि

हो तोच, पण मला त्यात काहि घडलय असं वाटलच नाही ग.. निरर्थक गुढरम्यपणा वाटला, ओढून-ताणून आणलेला!!
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on Tue, 07/28/2015 - 02:38

In reply to वास्तूपुरुष म्हणजे सुमित्रा by रेवती

Permalink

वास्तुपुरुष

वास्तुपुरुष DVD विकत घेऊन अनेकदा पहिला आणि दर वेळी प्रचंड आवडला. अत्यंत सशक्त व्यक्तिचित्रणे, उच्च दर्जाचा अभिनय आणि एका संक्रमणशील कालखंडाचा पट मांडणारे प्रभावी दिग्दर्शन.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 07/28/2015 - 02:57

In reply to वास्तुपुरुष by अगम्य

Permalink

वास्तुपुरुष

वास्तुपुरुष हा बहुधा २००३ सालचा चित्रपट आहे नं? मी पाहिला आहे. मुख्य भूमिका कोणी केली ते आठवत नाही. पण. स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी नायकाच्या वडिलांची भूमिका केली होती व अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या भावाची. बहुधा रविंद्र मंकणी यांनी नायकाच्या काकाची भूमिका केली होती. आमच्या कॉलेजमध्ये नवे सभागृह बनले होते. तेथील प्रोजेक्टरवर हा चित्रपट दाखवला होता. ₹१० तिकिट होते. मला चित्रपट आवडला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on Tue, 07/28/2015 - 08:18

In reply to वास्तुपुरुष by श्रीरंग_जोशी

Permalink

बरोबर

टीनेजर नायकाचे काम सिध्दार्थ दफ्तरदार ह्याने केले होते. आणि उत्तरा बावकर ह्यांनी नायकाच्या आईची भूमिका केली होती. इतर काही नाही तरी प्रत्येक व्यक्तिरेखेचे जे कंगोरे, मर्यादा, आणि काळे पांढरे रंग त्या त्या अभिनेत्यांनी जिवंत करून दाखवले आहेत त्यासाठी बघावा असा चित्रपट.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 07/28/2015 - 08:25

In reply to बरोबर by अगम्य

Permalink

सहमत

मी अकरा वर्षांपूर्वी एकदाच पाहिला आहे तरीही संपूर्ण चित्रपट व्यवस्थित लक्षात आहे इतका तो मला भावला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/24/2015 - 03:08

In reply to गहन आणि अर्थपुर्ण....??? व्हॉदफ... by स्वप्नांची राणी

Permalink

प्रतिसाद लैच आवडला!

प्रतिसाद लैच आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 07/21/2015 - 09:37

Permalink

तुम्ही आंतरजालावर बाहुबली

तुम्ही आंतरजालावर बाहुबली बघीतला म्हणताय, म्हणजे फुकट. अप्रत्यक्ष रीत्या पायरसीला प्रोत्साहन देताय.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 07/21/2015 - 09:46

In reply to तुम्ही आंतरजालावर बाहुबली by खटपट्या

Permalink

सहमत आहे.

सहमत आहे. काही अपरिहार्य परिस्थितीत चित्रपट आंजावर पाहिला असल्यास समजण्यासारखे आहे अन्यथा या विषयावर गळा काढण्यात काय अर्थ आहे. हा आंजावर पाहण्याचा चित्रपट नाही. भव्य कलाकृती काय असते हे अनुभवायचे असेल तर चित्रपटगृहातच जाऊन पाहायला हवा हा चित्रपट. अक्षरश: चांदोबातील गोष्ट जिवंत केलीय त्यांनी पडद्यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Tue, 07/21/2015 - 09:51

In reply to सहमत आहे. by सतिश गावडे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 07/21/2015 - 14:18

In reply to सहमत आहे. by सतिश गावडे

Permalink

काही अपरिहार्य परिस्थितीत

काही अपरिहार्य परिस्थितीत चित्रपट आंजावर पाहिला असल्यास
यात कसली आलीय अपरिहार्य परिस्थिती? ज्याला पटत नाही त्याने पाहू नये - पहायचा आणि नंतर आपद्धर्म म्हणून बोंबलायचं याला काय अर्थ?
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Tue, 07/21/2015 - 09:50

Permalink

मला बाहुबली बघण्याआधीच एका

मला बाहुबली बघण्याआधीच एका गोष्टीमुळे प्रचंड आवडला कारण तो 3D मधे आणला नाही!! हल्ली हॉलिवूड वाले आणि त्यामुळे इतरही चित्रपटकर्ते 3Dच्या नादाने काहीच्या काही बघायला लावतात! तर, बाहुबली बोरिंग आहे, स्टोरी काहीच नाही अशा ब-याच नकारात्मक प्रतिक्रिया ऐकल्यावर मी तो चित्रपट बघितला आणि मला तो प्रचंड आवडला. स्क्रीनवर दिसणारी ती भव्य-दिव्यता खरंच भारावून टाकणारी आहे. खरं तर कथा पहिल्या भागाच्या शेवटी चालू झाली आहे आणि पुढच्या वर्षी येणा-या चित्रपटामधे कळणार आहे.तोवर जे समोर आहे ते पण बघण्यात मजा येईल ह्याची काळजी नक्कीच चित्रपटकर्त्याने घेतली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Tue, 07/21/2015 - 09:55

Permalink

मराठी चित्रपट…

आयपीएल संपल्यावर दर आठवडयाला २-३ या हिशोबाने महिन्याला किमान १२-१५ चित्रपट प्रदर्शित झाले. हिंदी चित्रपट निर्माते आपसात तारखा ठरवुन दोन चित्रपटांमध्ये योग्य अंतर ठेवतात. इथे मराठी निर्माते मात्र एकमेकांचे चित्रपट पाडायला पुढे सरसावतात. हल्ली एक चित्रपट जास्तीत जास्त दोन आठवडे टिकतो. महिन्याला १२-१५ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वेळ आणि पैसा खर्च करून कोण इतके चित्रपट पहाणार आहे? त्यातले एक दोन चित्रपट चालतात आणि बाकीचे डब्यात जातात. मग हेच लोक मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पहात नाहित म्हणुन बोंबा मारतात. टीपी२ पध्दल शनिवारी सुट्टी असल्याने घरीच तुनळी वर टीपी२ बघितला. बकवास. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची मारे जोरात घोषणा केली. चित्रपट बघताना जाणवत होते कि दिग्दर्शकासहित सगळ्या कलाकारांना चित्रपटाविषयी शंका होती. कथानक, संवाद, कलाकार आणि अभिनय (?) या सर्वच बाबतीत मार खाल्ला. पण आधी गाजावाजा करून घोषणा केलेला चित्रपट अर्धवट गुंडाळुन डब्यात जाऊ नये म्हणुन तो तसाच पुढे रेटला गेला. पहिल्या भागात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांच्या अभिनयात ताजेपणा होता. दुसऱ्या भागात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट अक्षरश: पाट्ट्या टाकत आहेत असे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 07/21/2015 - 10:52

Permalink

Containt = Content

Containt = Content Promot = Promote बाहुबली बघायचाच आहे. मराठी चित्रपट इतक्या मोठ्या बजेटवर जायला वेळ आहे अजुन. हाच बाहुबली जरी तमिळ तेलुगु मध्ये आला असता तर त्याने इतका पैसा कमावला असता का? नाही ना? त्यांनादेखील हिंदीच्या कुबड्या लागल्या म्हणजे हा चित्रपट एवढा धो धो चालतो आहे तो हिंदी असल्यानेच. प्रादेशिक चित्रपट कधीच २५० कोटींचा टप्पा गाठणार नाही. मुख्य म्हणजे चित्रपटावर किती पैसे ओतले यापेक्षा चित्रपटातुन किती समाधान मिळाले हे महत्वाचे. जर ते छोट्याश्या श्वास, शाळा किंवा किल्ला मध्ये मिळत असेल तर उगाच बिग बजेटचा सोस कशाला? त्यातुन आनंद फक्त निर्मात्यांना आणि कलाकारांना मिळतो (कारण त्यांना पैसा जास्त मिळतो). सामान्य माणसाला नाही. त्यामुळे माझ्यासाठी तरी बजेट पेक्षा कंटेट जास्त महत्वाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 07/21/2015 - 13:32

In reply to Containt = Content by मृत्युन्जय

Permalink

हिंदीच्या कुबड्या ?

प्रादेशिक चित्रपट कधीच २५० कोटींचा टप्पा गाठणार नाही.
#Baahubali [dubbed Hindi version; Week 2] crosses ₹ 60 cr mark: Fri 3.25 cr, Sat 4.70 cr, Sun 5.40 cr. Total: ₹ 60.12 cr Bahubali's multiple versions made Rs 100 crore in 2 days, and its total earnings stood at Rs. 300 crore after eight days, reports Forbes magazine. it looks like baahubali cross 250 crore figure in telugu + tamil version.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 07/21/2015 - 14:45

In reply to Containt = Content by मृत्युन्जय

Permalink

बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनचा

बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनचा वाटा अल्प आहे मृत्युंजयसाहेब. जरा विदा बघा की.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 07/21/2015 - 22:45

In reply to बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनचा by बॅटमॅन

Permalink

वोक्के. पहिला प्यारा खोडुन

वोक्के. पहिला प्यारा खोडुन टाकावा. हाकानाका :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on Tue, 07/21/2015 - 11:10

Permalink

आंतरजालावर ??

अरेरे
  • Log in or register to post comments

Submitted by यमगर्निकर on Tue, 07/21/2015 - 12:43

Permalink

मोठ्या स्केल च्या गोष्टि

हाच फरक आहे मरठि प्रेक्षक आणी साउथ चे प्रेक्षकां मध्ये, तिथे लोक स्वतःहुन पायरसि ला थारा देत नाहित, पायरसि सीडि कुठे विकत असतिल तर तेथिल लोकच त्याला मज्जाव करतात. त्यामुळे तेथिल निर्माते सिनेमावर मोठ्याप्रमानावर पैसा लावण्यास तयार होतात म्हणुनच बाहुबलि सारख्या कलाकृति आपनास बघायला मिळतात, कृपया कुठलाहि सिनेमा हा बनवट सीडि किंवा आंतरजालावर पाहु नये. सिनेमा हा थियेटर मध्येच किंवा ओरिजनल सीडि वर पहावा. अधिच २जी आणि ३जी इंटर्नेट मुळे संगीत क्षेत्राचि काय अवस्था झालि आहे ति पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by देश on Tue, 07/21/2015 - 13:36

In reply to मोठ्या स्केल च्या गोष्टि by यमगर्निकर

Permalink

साउथ मध्ये पायरसि होत नाहि ???

हे तुम्ही कुठे बघितले हे सांगु शकाल काय? मी बेंगलोर मध्ये रहिलो आहे आणि पायरसि होत असलेली सर्रास बघितली आहे (अगदि कन्नड चित्रपटांची सुद्धा ). अर्थात फक्त बेंगलोर म्हणजे साउथ नव्हे पण बेंगलोर साउथमध्येच धरले जाते देश
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 07/21/2015 - 15:12

In reply to साउथ मध्ये पायरसि होत नाहि ??? by देश

Permalink

हा खरा

हा खरा आंतर"देशी"य प्रतीसाद !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by देश on Tue, 07/21/2015 - 21:41

In reply to हा खरा by नाखु

Permalink

संस्था....

आभारी आहे :-) देश
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 07/21/2015 - 15:07

Permalink

आर्र.. छोट्या पडद्यावर पाहिला

आर्र.. छोट्या पडद्यावर पाहिला ? ... तुने तो पिइच... नै.. फिर काय को बाता करेला हय बाहुबली ह्यांव अन त्यांव... पयले बडॅ पर्दे पेदेखो फिर बांता करो... अहो छोट्या पदद्यावर मराठी चित्रपट खपुन जातात... बहुबली काय बघितला तिथे, वरुन धांगे काढता त्याचे ? कहर हय.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 07/21/2015 - 15:12

In reply to आर्र.. छोट्या पडद्यावर पाहिला by द-बाहुबली

Permalink

शमत!

शमत!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Tue, 07/21/2015 - 15:15

Permalink

मी बघितलेली एक गोष्ट तेलगु,

मी बघितलेली एक गोष्ट तेलगु, तमिळ लोकं आपल्या भाषेतला चित्रपट म्हणजे घरचं कार्य असल्याप्रमाणे वागतात. भक्तिभावाने स्वत: मूवी बघणे , नंतर तो मूवी त्यांच्या इतर भाषीय मित्रमंडळींनी सुद्धा बघावा म्हणून जोरदार लॉबिंग. त्यांच्या पार्टी, समारंभात सुद्धा त्यांच्याच भाषेतली गाणी वाजत असतात. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी इतकी मोठी असल्याचे मूळ कारण त्या लोकांचा हा भाषीक अभिमान असावा. अजुन एक म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे हा वाक्प्रचार त्या भागात नसल्यामुळे तेथील निर्माते पण दिलखुलास पणे चित्रपटावर खर्च करतात. बरं प्रेक्षक आपल्याला फार नुकसान होऊ देणार नाही ही खात्री असतेच कारण हिंदी चित्रपटांची स्पर्धा तिथे नसतेच. प्रेक्षक जाणार कुठे? मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग हिंदी मराठी मधे जरा वाटल्या गेला जातो. दाक्षिणात्य लोकं हे मुळातच चित्रपट-वेडे असतात, ते त्यांच्या genes मधेच आहे. या लोकांच्या तुलनेत मराठी लोकांना चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही. म्हणजे मोजके छान चित्रपट बघतातच आणि एन्जॉयही करतात. पण क्रेझ अशी कमीच. त्यातही मराठी चित्रपट म्हटले की अजुनच उत्साह मावळतो. म्हणून निर्माते सुद्धा खूप बिग बजेट चित्रपट निर्माण करतच नाहीत. रिस्क कोण घेणार?
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 07/21/2015 - 15:22

In reply to मी बघितलेली एक गोष्ट तेलगु, by पद्मावति

Permalink

या लोकांच्या तुलनेत मराठी

या लोकांच्या तुलनेत मराठी लोकांना चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही. म्हणजे मोजके छान चित्रपट बघतातच आणि एन्जॉयही करतात.
हे वाक्य मराठी लोकांना मराठी चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही असे हवें. कारण हीच मराठी लोके हिंदी, इंग्रजी व दाक्षीणात्य तसेच इतर चित्रपट फार हौसेने बघतात पण मराठी नाही कारण मराठी चित्रपट सालं चौकटीबाहेर मनोरंजक असे काही देतच नाही. मुळा मराठी लोकांना चौकटीत चौकटी करत बसायची फार हाउसच आहे तर त्यांचे कडून काय अपेक्षा ठेवणार ? मराठीचा नुसताच अभिमान उरलाय आता, प्रेंम केंव्हाचं आटाया लागलयं...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 07/21/2015 - 15:24

Permalink

जय माहिष्मती...

जय माहिष्मती... आताच बाहुबली बघून आलोय.... मोठ्या पडद्यावर. डोळ्याचे पारणे फिटले. अडीच तास वेगळ्याच जगात घेऊन गेला... पुढच्या भागाची प्रतिक्षा आहेच. एकच शंका होती ती म्हणजे कुठल्याही कलाकाराला तो किरी भव्य दिव्य चित्रपटात काम करतोय याची जणू माहितीच नव्हती. म्हणजे सर्वांची अ‍ॅक्टींग ए-वन पण कुठेतरी ५ टक्के राहून गेलंय. पण एकूण पैसे वसूल ... जमलं तर परिक्षण लिहणार.. अशा कलाकृतीचा छोट्या पडद्यावर तेही चोरून डाउनलोड करून बघून अपमान करू नये अशा मताचा मी आहे. (वैयक्तिक अपरिहार्यता समजू शकतो. पण ज्यासाठी इतर लोक बघा म्हणतात तो फील छोट्या पडद्यात येत नाही. वेळ वाया जाईल. मन खट्टू होईल.) मराठीला इतका खर्च करायला अजून वेळ आहे. असू दे. इतर लोक बनवतायत आपण बघूया. परत काही तरी ब्रेक-थ्रू मराठीलोक करतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 07/21/2015 - 15:35

In reply to जय माहिष्मती... by संदीप डांगे

Permalink

तर.. काय सात्वीक संताप येतो

तर.. काय सात्वीक संताप येतो राव... अहो चोरुन बघीतली तरी कुठे बघायची याचे तारतम्य नको काय ? छोट्या स्क्रीन ऐवजी थेटरात घुसुन फुकटात बाहुबली बघितला अन त्या निमीत्ताने काही प्रश्न निर्माण झाले असे जरी धागाकर्त्याकडून घडले असते ना तरी मन भरभरुन आलं असतं... चित्रपटाला स्टोरी नाही, म्हणजे स्टोरी आहे अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर दुसृया भागाची गरजच नसती असे मुळ पुस्तक वाचलेल्यांचे मत आहे तरीहे दुसर्‍या भागाची प्रतिक्षा आहे. चक्क वाहत्या पाण्यात रंग न फिस्कटता हिरो अचुक टॅटु काढतो अशी बिंडोक द्रुष्ये आहेत, काढु तितक्या चुकाच आहेत पण हा चित्रपट ज्या स्केलवर आहे तिथुन हे सगळे दोहेन दिसण्या इतपत खुजे आहेत.... आणी हा चित्रपट एखादा महात्मा छोट्या स्क्रिनवर काढुन त्यावर धागा टाकतो हा चित्रपटाच्या प्रेक्षकांचा अक्षम्य अपमान आहे... :(
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 07/21/2015 - 16:22

In reply to तर.. काय सात्वीक संताप येतो by द-बाहुबली

Permalink

अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर

अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर दुसृया भागाची गरजच नसती असे मुळ पुस्तक वाचलेल्यांचे मत आहे
कुठले मूळ पुस्तक?
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Wed, 07/22/2015 - 12:59

In reply to अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर by बॅटमॅन

Permalink

@बॅटमॅन बाहुबलीच्या

@बॅटमॅन बाहुबलीच्या पुस्तकाबाबत कॉमेंट एका कानडी मित्रासोबत सोबत ऑनलाइन चॅट करताना आलि आहे. अजुन माहिती त्याच्याशी संपर्क झाल्यावर डाकवतो. बाकी गुगलुनही फार काही हाती आले नाही, त्यामुळे त्याच्याशी बोलुनच अपडेट करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/22/2015 - 13:08

In reply to @बॅटमॅन बाहुबलीच्या by द-बाहुबली

Permalink

ओक्के सार, सांगा नक्की.

ओक्के सार, सांगा नक्की. जमल्यास विकतही घेईन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on Wed, 07/22/2015 - 20:09

In reply to अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर by बॅटमॅन

Permalink

महिष्मती संराज्याचा उल्लेख

महिष्मती संराज्याचा उल्लेख महाभारतात आहे. हि कथा अमर चित्रकथा (बहुतेक चांदोबा )ह्या मासिकातून घेतली असल्याचे "Quora.com" वर वाचले.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/22/2015 - 20:36

In reply to महिष्मती संराज्याचा उल्लेख by वगिश

Permalink

हे पाहिले पाहिजे. तदुपरि

हे पाहिले पाहिजे. तदुपरि शंकराचार्यांनी वादविवादात पराभव केलेले द्वैतमतानुयायी मंडनमिश्र हे माहिष्मती नगरीचे निवासी असे म्हणतात. ती माहिष्मती कुठे मध्यप्रदेश साईडला नर्मदेकाठी आहे असे सांगितल्या जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on गुरुवार, 07/23/2015 - 12:30

In reply to हे पाहिले पाहिजे. तदुपरि by बॅटमॅन

Permalink

नर्मदाकिनारचे महेश्वर म्हणजेच

नर्मदाकिनारचे महेश्वर म्हणजेच माहिष्मती.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/23/2015 - 12:35

In reply to नर्मदाकिनारचे महेश्वर म्हणजेच by द-बाहुबली

Permalink

अच्चा महेश्वर तर....धन्यवाद.

अच्चा महेश्वर तर....धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on गुरुवार, 07/23/2015 - 14:07

In reply to अच्चा महेश्वर तर....धन्यवाद. by बॅटमॅन

Permalink

अच्चा महेश्वर तर.

अच्चा महेश्वर तर.
आसं "अच्चा" बोलतुय की जणु मिरजेच्या पल्याडच हय महिष्मती.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/23/2015 - 14:52

In reply to अच्चा महेश्वर तर. by अस्वस्थामा

Permalink

हा हा हा ;)

हा हा हा ;) अहो जे जे भारतात आहे ते ते सगळे जवळच आहे...अहद लाहोर तहद चंदावर, अहद गुजरात तहद बंगाल...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 07/21/2015 - 22:20

In reply to तर.. काय सात्वीक संताप येतो by द-बाहुबली

Permalink

चित्रपटाला स्टोरी नाही? आहो

चित्रपटाला स्टोरी नाही? आहो आहेकी, द लायनकिंग नाही बघितला का? तीच कथा वेगवेगळ्या चित्तरपटांतून येत राहिली आहे.. अजून काय..? द लायनकिंगसुद्धा कुठूनतरी उचलला होता म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Wed, 07/22/2015 - 13:01

In reply to चित्रपटाला स्टोरी नाही? आहो by संदीप डांगे

Permalink

+१

मुळात जगात प्रमुख कथाबीज फक्त सात आहेत त्यामुळे कुठे ना कुठे साम्य असणारच ना :) अवांतरः- आणी साधारण साहस्/अ‍ॅक्शन चित्रपटाच्या घटनांचा फॉर्म्युला साधारण हा असतो १) हिरो एक सामान्य जिवन जगत आहे/ लागत आहे २) काही तरी घडते आणी साहसाला सामोरे जायची वेळ येते 3) हिरो ला साहसापासुन पराव्रूत्त व्हावेसे वाटणे अथवा अजुनच जोम येणे ४) कोणी तरी मेंटर भेटतो ५) हिरोचे साहसी मिशन कंटीन्यु ६) यात हिरोला नवीन मित्र /शत्रु वगैरे मिळतात ७) काही कारणाने सेटबॅक होतो व हिरो ला त्याची चाल(स्ट्रेटजी) बदलने भाग पडते ८) परिस्थीती अजुन बिकट बनते ९) हिरो त्यातुन हिरोपंती करुन यशस्वीपणे बाहेर येतो/झुंज जिंकतो ११) सर्व सुरळीत झाले वाटत असतानाच एक अल्टीमेट चॅलंज निर्माण होते जे जिंकयला हिरोला आतापर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावावा लागतो १२) द एंड. हिरोच्या हिरोपंतीने जग सगळ्यांसाठीच एक अतिसुरक्षीत व अतिशय चांगली गोष्ट बनली आहे (विलन मेला) सर्व काही मस्त मस्त मस्त... आणी मस्त. आता वरील मुद्दे (सगळेच घेतले पाहिजेत असे नाही) गुंफुन हवे तसे यशस्वी कथाबीज अ‍ॅक्शन चित्रपटासाठी गुंफता येते. मग तो फँटसी असो साय फाय असो अथवा दाक्षीणात्य मसाला असो :) टीप_- वरील मुद्दे हे द मॅट्रीक्स पार्ट पहिला याचे विवेचन आहे ज्याच्या कथा घटनाक्रमावर ओव्हर फॉर्म्युलॅटीक (तेच वर दिलेले मुद्दे व तसाच घटना क्रम रचणे) म्हणूण मान्यवरानी टिका केली होती... अर्थात तरीही चित्रपट यशस्वी ठरलाच. थोडक्यात एकदा चित्रपटाची थिम ठरली की साधारण त्यात काय घडणे अपेक्षीत आहे हे स्पष्ट होते :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com