थांबली मुंबई सारी

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
20 Jun 2015 - 5:57 pm

गेला पाऊस बरसुनी
रस्त्यांचे झाले नाले
थांबली मुंबई सारी
पाण्याखाली रेल्वे जाळे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०१५

९८९२५६७२६४

चारोळ्या

प्रतिक्रिया

vijaykharde's picture

22 Jun 2015 - 3:38 pm | vijaykharde

झालं इतकच! एवढी तरी कशाला मेमरी वाया घालवायची सर्वर ची

काळा पहाड's picture

22 Jun 2015 - 3:45 pm | काळा पहाड

कवितेच्या चारच ओळी
यल्लप्पा लिहुनी गेले
प्रतिसाद धपाधप येती
धाग्यांचे पसरे जाळे

बबिता बा's picture

22 Jun 2015 - 4:32 pm | बबिता बा

.

मिपावर धोधो कविता ओतणार्‍या पण इतरांच्या धाग्यांवर अजिबात न फिरकणार्‍या समग्र कवींना सरळ ब्लॉक करून टाकावे निदान काही दिवसांसाठी तरी.

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2015 - 4:43 pm | टवाळ कार्टा

चायला हा कस्ला नियम??? म्हणजे "तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))

बॅटमॅन's picture

22 Jun 2015 - 5:49 pm | बॅटमॅन

टकाशेठशी सहमत.

"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))

अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्‍या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2015 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

+++++++++++++++११११११११११११११११११११११११११११

prasadnene's picture

22 Jun 2015 - 6:05 pm | prasadnene

प्रतिसाद देतच नसतील तर ते धाग्यावर फिरकत असतात हे कसे सिद्ध होणार ?

नेनेकाका, काय लिहीलंय ते नीट वाचा. नाही कळलं तर आपण तुमच्यासाठी मराठीच्या शिकवणीची सोय करु.

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2015 - 7:42 pm | टवाळ कार्टा

तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले....दुसर्यांच्या कवीता वाचल्याच नैत हे सिध्ध क्करता येणार नै...प्रतीसाद देत नै म्हणून काही दिवस बॅन करणे जरा अतीच होईल

उगा काहितरीच's picture

22 Jun 2015 - 7:08 pm | उगा काहितरीच

वा ! कै लिव्हलय , कै लिव्हलै .

काळा पहाड's picture

22 Jun 2015 - 7:22 pm | काळा पहाड

प्रतिक्रियांचा 'टोन' पाहून
कवीचे आशादीप निमाले
शब्दच देती आशा
कै लिव्ह्लै कै लिव्हलै

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2015 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा

पाक किती(?) बिनतारी! ;)

गेला तांब्या फिरुनी
पीठची कढंईत आले
थिजली कढई सारी
जिलब्यांचे जाहले जाळे

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2015 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार

स्वॅप्ससरांबरोबर सहमत,
त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत,
कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी.

म्हणतो लाल तुझी अन,
तू ही म्हणावे माझी लाल
आडवे जे अपल्याला जाती
रंगवू त्यांचे दोन्ही गाल,

रेकता तू गदर्भापरी,
मी म्हणावे कोकीळ गान,
असशी जरी तू कितीही हलकट
मी म्हणावे चान चान

पाडिल्या मी जरी तांबिय कविता,
त्यां तू म्हणशी भगवतगीता,
वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा
तू डिवचून उठवी अनाहिता,

कौतूक करता कोणी माझे,
चुंबावा तू त्याचा माथा,
टीका करी जो तुझीया वरती,
मी घालाव्या त्याला लाथा,

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2015 - 1:06 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

नाखु's picture

24 Jun 2015 - 9:35 am | नाखु

गाथा आवडली.