Skip to main content

पाऊस पडून गेल्यावर

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 20/06/2015 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ खेळते ऊन सावली पाऊस पडून गेल्यावर गवतावरचा थेंब चमकतो किरणांची भेट झाल्यावर पाऊस पडून गेल्यावर पाखरांची किलबिल झाली नव्या नवरी सारखी धरती हिरवळ लेवून सजली मन भारावून गेले पाऊस पडून गेल्यावर सुखावून मी जातो गारव्याचा स्पर्श झाल्यावर हरवून जातो शब्दात पाऊस पडून गेल्यावर नकळत सुचतात शब्द कविता सजते कागदावर यल्लप्पा सटवाजी कोकणे १८ जून २०१५ ९८९२५६७२६४
लेखनविषय:

वाचने 1101
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया