Skip to main content

पिंपळ

लेखक पथिक यांनी सोमवार, 01/06/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा! एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो. पिंपळ पिवळ्या उन्हात मनाचा पिंपळ सळसळत राहतो पिवळ्या उन्हासोबत येतात काही पाखरं नाव-गाव नसलेली आणि फांदी फांदीत खेळतात गातात एखादं घरट बांधतात उन्हं पानापानात भिनून जातात स्वप्न बनून आनंद बनून हुरहूर बनून वारा पानांच्या कानी सांगतो दूर देशीच्या कहाण्या धूसर क्षितिजाच्या पलीकडले सांगावे रात्री चांदण्या चमचमतात पानं सळसळतात एकमेकाला गुपितं सांगतात स्वप्नांची देव-घेव करतात उन आणि वारा आकाश आणि चांदण्या पिंपळाशी बोलत राहतात आणि पिंपळ सळसळत राहतो
लेखनविषय:

वाचने 1650
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

'पिवळ्या उन्हा' ऐवजी 'सोनेरी उन्हा' असा बदल केल्यावर कविता अजून छान होईल असे वाटते. बाकी कविता मस्त आहे. आवडेश. पुलेशु.

In reply to by एस

धन्यवाद! 'पिवळ्या' ऐवजी 'सोनेरी' शब्द वापरावा का असं मलाही वाटलं होतं… तुम्ही त्यावर शिक्कामोर्तब केलंत.

मस्त आवडली कविता. मिपावर स्वागत आहे. लिहित राहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे