मॅगो कस्टर्ड पुडींग

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
27 May 2015 - 6:31 pm

या मोठ्या सुट्ट्या म्हणजे रोज आईने काहीतरी नविन बनवावे असे मुलांना वाटते.
आंब्याचा सिझन सुरुच आहे तर विचार केला आज पुडींगच बनवावे.

साहित्य- 6 स्लाईस ब्रेड, एक पारले जी छोटा पुडा, क्रीम बिस्कीट 10 वाला एक पॅक, मोसंबी एक, हापूस आंबे दोन, कस्टर्ड पावडर दोन चमचे, दूध अर्धा लिटर, काजू-बेदाणे आवडीनुसार,
-
-कॄती -- प्रथम थोड्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून गुठळी न होता शिजवुन घ्या ( मी व्हॅनीला फ्लेवर घेतलाय)..त्यामध्ये राहिलेले दुधही घालून गार होण्यासाठी बाजूला ठेवुन द्या.
ज्या भांड्यात पुडींग सेट करायचे आहे ते घ्या..मी कुकरमधील डबा घेतलाय.
त्या मध्ये सुरुवातीस ब्रेडचे छोटे छोटे तुकडे पसरवुन घ्या त्यावर काजुचे तुकडे थोडे घाला,, चार सहा बेदाणे पसरवा.
मोसंबी सोलुन त्याचे बारीक तुकडे करुन थोडे पसरवा.. आता त्यावर पारले जी व क्रीम बिस्कीटचे पण बारीक तुकडे करुन ठेवा. त्यातील थोडे पहिल्या लेयरवर पसरवुन घ्या. आता आपण जे कस्टर्ड शिजवुन बाजूला ठेवलेय त्यातील थोडे ह्या लेयरवर घाला. आता आपले आवडते काम आंब्यांच्या बारीक फोडी करुन घेणे... (हो हो उरलेले साली कोयी नंतर खावा ना)
आता त्यावर थोड्या आंब्याच्या फोडी पसरवुन घ्या.
पुन्हा वरील प्रमाणे दुसरा लेयर करुन घ्या त्यावर सर्व साहित्य व्यवस्थित पसरवुन घ्या....
आता पुन्हा तिसरा लेयर करुन घ्या ...
वरुन सजावटीसाठी काजू बेदाणे लावा.
आणी फ्रीज मधे फ्रीजरमधे सेट होण्यासाठी ठेवुन द्या.
येता जाता फ्रीज उघडून डोकावू नका.
तीन चार तास तरी ठेवा... ह आता बाहेर काढा आणी थंडगार पुडींगचा आनंद घ्या.
फोटो टाकायचा प्रयत्न चालू आहे.
ईतर सिझनला उपलब्ध फळे घेउनही हे पुडींग बनवता येते.

प्रतिक्रिया

फोटो चढवल्यावर पाहिनच पण ट्रायफल पुडींगचा आठवण झाली. कृती आवडली.

अजया's picture

28 May 2015 - 9:03 am | अजया

.

डब्याच्या कडा निदान पुसायच्या तरी, पास ब्वॉ!!

रुपी's picture

28 May 2015 - 12:52 am | रुपी

सोपी वाटत आहे पाकॄ. नक्की करुन पाहिन.

फोटो दिसत नाहियेत अजूनही.

सकाळी ऑफिसला येताना पुडिंग फ्रिझरमध्ये ठेवून आले आहे. संध्याकाळी जाउन कळेल जमलं की नाही ते...
एखादी पाकृ बघून इतक्या लवकर करण्याची ही माझी पहिलीच वेळ! अशी सोपी आणि छान पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद!

चैत्रबन's picture

28 May 2015 - 2:14 am | चैत्रबन

करून बघेन...

जुइ's picture

28 May 2015 - 3:53 am | जुइ

ते फटू अजुन दिसत नाहीत.

मदनबाण's picture

28 May 2015 - 7:04 am | मदनबाण

फोटो ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

अत्रुप्त आत्मा's picture

28 May 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

फ़ोटूsssssssss! :-\

त्रिवेणी's picture

28 May 2015 - 8:34 am | त्रिवेणी

काल कसकाय वर बघितला फोटो.
पण पुढ्च्यावेळी पुण्याला येतांना घेवुन ये.

श्रीरंग_जोशी's picture

28 May 2015 - 9:16 am | श्रीरंग_जोशी

रोचक आहे पाककृती अन करायला सोपी वाटत आहे.
धन्यवाद.

सोपी आहे कृती..करुन पाहीन..

निवेदिता-ताई's picture

28 May 2015 - 10:33 am | निवेदिता-ताई

अजया धन्यवाद

कविता१९७८'s picture

28 May 2015 - 12:02 pm | कविता१९७८

वाह, मस्तच

यशोधरा's picture

29 May 2015 - 7:05 am | यशोधरा

करुन पाहते. सोपे दिसतेय.

सोपि रेसेपि ताइ.करुन पाहिन.