Skip to main content

'कविता' म्हणजे काय वेगळे

लेखक विदेश यांनी मंगळवार, 26/05/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
खोल दरीतले वाहते पाणी उंच डोंगरावर पक्षी प्राणी कानावर घोंघावणारे वादळ नितळ दिसणारा सागरतळ फांदीवर हळूच फूल डुलणारे वाऱ्यावरून पान तरंगणारे नभात चांदणी चमचमणारी सागरात बोट हेलकावणारी झाडावरून खार तुरुतरुणारी रोपट्यावर कळी मोहावणारी सशाचा डोळा लुकलुकणारा वाळूतला शिंपला चमकणारा कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे एका झुरळाचे सहस्र डोळे शब्दात रंगवणे हेच सगळे "कविता" म्हणजे काय वेगळे ..! .
लेखनविषय:

वाचने 4191
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पैसा.. आभारी आहे !

साधी, सरळ कविता आवडली.

स्पा , स्वॅप्स .. प्रतिसादाबद्दल आभार !