Skip to main content

असतेस घरी तू जेव्हा...(विडंबन )

लेखक Vimodak यांनी शुक्रवार, 15/05/2015 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
असतेस घरी तू जेव्हा, जीव घाबरा-घुबरा होतो, तुज तणाव सहता सहता,मी सोशिक बुजरा होतो. तुज हु की चूं चालेना,मज ब्र सुद्धा निघवेना. मुग गिळूनिया गप्प बसावे, मज तैसेही बसवेना. ना अजुन झालो मोठा, मी लहानही ना उरलो, मी अबोधतेच्या शहरी, तुज मर्जीखातर फिरलो. ऐरावती अंकुश जैसा, मजवरी तुझा गे धाक, गुपचूप निघावे घरासी, तुझी ऐकू येता हाक. तव सत्तेने साम्राज्ञी, मज पूरते केले गुलाम. तुझ नजरेआड़ तरी मी, ठोकतोच लाल सलाम !!!
लेखनविषय:

वाचने 1338
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

=)) =))

मूळ कविता करणारे कवी अन त्याला चाली लावणारे संगीतकार या दोहोंच्या रचना व गीते फारशी रुचत नाहीत. पण विडंबन झकास जमलंय.