Skip to main content

मौनाला फुटली वाणी!..

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 19/08/2008 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
मौनाला फुटली वाणी!.. . एक ना स्फुरला शब्द.. एक ना ओळ सुचली.. हसले रडले ओठांनी..! एक ना कविता रचली. शब्द पाखरे भवताली, सुर गुंफून भिरभिरली.. तार तार झंकारुनी... कंपने कंपनांत विरली..!!! अनाहतसा नाद छेडूनी.. मौनाला फुटली वाणी!.. अगम्य अशा बोलांची.. नकळत जुळली गाणी..!!! हसले रडले ओठांनी... नकळत जुळली गाणी..!!! ================== स्वाती फडणीस....... १७-०८-२००८
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1808
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हसले रडले ओठांनी... नकळत जुळली गाणी.. येउ द्यात अशीच छान छान गाणी !!! कीप इट अप !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

खुपच छान !!! चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते, उंच भरारी घेणा-याला आभाळाचे ओझे नसते.