मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आईशप्पथ.........!!!!

एक एकटा एकटाच · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अपरं नाक उडवून, गालाचा फुगा फुगवून वर फुकाचा राग धरून, जेव्हा तु माझ्यावर रुसुन बसतेस.. आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... मला काही सुचत नाही, काय कराव उमगत नाही. वर भोकाड पसरून, माझ्यावर इमोशनल अत्याचार करतेस.. आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... काही केल्या बोलत नाहीस, विनवण्या करुनही हसत नाहीस स्वतः अबोल राहुन, भांडयांची मात्र आदळाआपट करतेस..... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... "चालता हो!!!,मला तुझं थोबाडही बघायचे नाही" अशी माजोरडी धमकी मला माझ्याच तोंडावर देतेस..... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... नाही लावली कधी चार बोटं तुला,नाही वागलो मनाविरुध्द तरी "तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही" असं गावभर खोटं बोंबलत फिरतेस... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस.......... ओवाळून टाकतो जीव तुझ्यावर्,फिदा होतो तुझ्या एका अदेवर दिवसभर भांडुन ,जेव्हा संध्याकाळी कुशीत शिरुन खुदकन हसतेस....... आईशप्पथ....माझा सगळा लोच्या करून टाकतेस..........

वाचने 1311 वाचनखूण प्रतिक्रिया 3