✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भूकंपामागची कारणे

ह
हुप्प्या यांनी
Tue, 04/28/2015 - 22:29  ·  लेख
लेख
भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही. ८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल. पण आजच्या घडीलाही विविध मंडळी भूकंपामागची कारणमीमांसा सांगत आहेत ते मोठे मनोरंजक आहे. कुणी बाब म्हणतात की बीफ खाल्ल्यामुळे देवाने ही शिक्षा दिली आहे. आता उरलेले जग हजारो वर्षे बीफ चापत आहे त्यांना शिक्षा का बरे नाही? कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का? असो. हिंदू वगैरे धर्म आहेतच रानटी. पण ख्रिस्ती लोकांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून तातडीने १ लाख कागदी बांधणीतील बायबले पाठवली आहेत. बहुधा थंडीत सरपण म्हणून वापरता येतील! असो. कधीतरी विज्ञान भूकंप ओळखण्यात प्रवीण होईल अशी आशा. पण तोपर्यंत अशा लोकांच्या अकलेचे तारे ऐकून वाचून मनोरंजन करून घ्यावे. http://www.mkgandhi.org/articles/mg_causation.htm http://thenortheasttoday.com/vhp-leader-links-nepal-earthquake-to-beef-eating/ http://www.firstpost.com/politics/rahuls-impure-visit-to-kedarnath-caused-nepal-earthquake-says-sakshi-maharaj-2215456.html
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14374 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

फक्त स्वतःचेच कौतुक्

लॉर्ड फॉकलन्ड
गुरुवार, 04/30/2015 - 20:30 नवीन
फक्त स्वतःचेच कौतुक्.पाकिस्ताननेहि बिफ मसाल्याची पाकिटे पाठविलि आहेत्.त्यांचे पण कौतुक करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

..पाकिस्ताननेहि बिफ मसाल्याची पाकिटे पाठविलि आहेत्.

विनोद१८
Fri, 05/01/2015 - 17:53 नवीन
..Te aamchyaa 'Naanyaane' dilelyaa 'PAK' Sallyaamule, ase eikale, he Khare ka 'Maai' ??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा