बाटलीचखणा घेऊन पिण्यासाठी या : नवसागरी भडका
बाटलीचखणा घेऊन पिण्यासाठी या : नवसागरी भडका
या हो सारे भराभर, इथे डुलते व्हा
कुठं बसू पुसू नका, अडडयामंधी जा
गरीब तुम्ही कामकरी, ध्यानी धरा पक्के
आयुर्हित जाणतो आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
पिल्याबिगर जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
विदेशी महाग वाटते? तर चपटी मारुन घ्या ...॥
मधूशालेची पाने, सारी वाचून पहा
कामकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, मस्तीत्त राहा
सोयीनुसार करुन घेऊ, तुमचा हिसाब सगळा
समजूतीनं देऊ तुम्हाला, सोमरस चांगला
तुमचे शेंगदाणे घेऊन, पिण्यासाठी या ...॥
पगाराच्या टायमाले, खिसा तुमचा कोरतो
भरपूर नफा कमवण्यासाठी, मालक तुम्हा मारतो
तवा कुठं मालक, बीयमडब्लू घेत असते
घोटाबिगर कोणालेच, 'कायबाय' होत नसते
काढा तिथं त्या चपला, अन बसते व्हा ...॥
माताय.
तरीच!
नाही...
आधी विडंबन वाचले. आता मूळ
:-D
तू ये, तुला फुकट देईन...
आवडले विडंबन !!
व्वा :)