द्वारकाधीश

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
22 Apr 2015 - 5:13 pm

मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर
मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर
मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा
मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा

मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ
मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ
मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला
मन मोरपंख केसात जुना रुजलेला

मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ
मन सांज केशरी, मन वेळूची शीळ
मन अथांग सागर, मन तुटलेले पाश
मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश...

अदिती जोशी

भावकविताकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2015 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा

@मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश...>> हेच अवघड... बाकि सर्व सोपं.

कवितानागेश's picture

22 Apr 2015 - 6:50 pm | कवितानागेश

:)

आदूबाळ's picture

22 Apr 2015 - 6:58 pm | आदूबाळ

ये बात! छान आहे.

आत्मूजींशी सहमत. निर्मोही + निश्चयी होणं कठीण आहे.

प्राची अश्विनी's picture

22 Apr 2015 - 9:59 pm | प्राची अश्विनी

सुंदर!!!!

सन्जय गन्धे's picture

10 Jun 2015 - 1:36 pm | सन्जय गन्धे

द्वारकाधीशाचा विषय निघाला आहे तर दोन कविता /गाणी शेअर केल्याशिवाय राहावत नाही.
एक म्हणजे "सांज ये गोकुळि". यातील शेवटच्या कडव्यातील श्रीकृष्णाचा ओझरता उल्लेख.
"माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी
वाहते बांसरी
अमृताच्या जणू ओंजळी"

आणि दुसरे तसे आत्ताचे,
'मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो' मधील
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही
त्या श्यामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!

द-बाहुबली's picture

10 Jun 2015 - 1:43 pm | द-बाहुबली

बरच मनन झालयं.

कविता आवडली, पण वर गुर्जी म्हणतायेत त्याच्याशीही सहमत!!

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2020 - 1:17 pm | चौथा कोनाडा

मन अथांग सागर, मन तुटलेले पाश
मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश...

वाह, सुरेख !