रसपोळी आणि आभार

नीलमोहर's picture
नीलमोहर in पाककृती
21 Apr 2015 - 10:36 am

रसपोळी आणि आभार !!

सर्वप्रथम मिसळपाव या संकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादकांचे मनापासून आभार.

मिपाने आम्हा संगणक कामगार लोकांचे रोजचे यांत्रिकी जगणे खूपच सुसह्य केले आहे.
कामे आटोपून थोडा निवांत वेळ मिळाला की लगेच आम्ही मिपाच्या आसऱ्याला (किंवा आश्रयाला) येतो.
इथले लेख, कथा, कविता, भटकंती, पाककला, छायाचित्रण इ. विविध सदरं मनापासून आवडतात,
खास करून लेखांवरील खुसखुशित प्रतिक्रिया, ज्यासाठीच बहुतांश जनता इथे वारंवार भेट देत असते !

आता पाककृति कडे वळूया,
ही आहे रसपोळी किंवा आंबापोळी.

a

कृति सोपी असल्यामुळे आणि निमित्त मिळाल्यामुळे करून पाहिली.
निमित्त: घरी आंबाबर्फी जास्त असल्यामुळे :P
हो... ऐकायला कितीही असत्य वा अतर्क्य वाटले तरी हेच खरं आहे :)
घरात आम्ही सगळे गोडघाशे असूनही ती चि_ _ स्पेशल आंबाबर्फी
( खास पाहुण्यांसाठी जास्त आणलेली ) संपवायला जड जात होती,
मग म्हटलं चला आंबापोळी करून बघू आणि ही पोळी झाली पण सुरेख,
दिसायला आणि खायलाही !!

ही पाककृती आमरस आटवून त्याचे सारण भरूनही करतात पण मी
आंबाबर्फी कुस्करून घेतली. ( ह्या कल्पनेचे श्रेय तरी द्या हो आम्हाला ! )
पाककृति मिपावर टाकायची असे आधी ठरवले नसल्यामुळे पायरी दर पायरी
छायाचित्र काढले नाहीत, शेवटी पोळी झाल्यावरच काढले.

साहित्य:
कणिक व मैदा, आंबा बर्फी गरजेनुसार.
साधारणपणे बर्फीच्या ३ तुकड्यांमध्ये ४ पोळया होतात.

कृति:
१. जास्त गव्हाचे पीठ आणि थोडा मैदा घेऊन नेहमी प्रमाणे कणीक मळावी.(मी नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या त्याही छान झाल्या.)

२. आंबाबर्फी कुस्करुन किंचित तूप घालून मऊ मळून घ्यावी. सारणासाठी छोटे गोळे करून ठेवावे.

३. कणकेचा उंडा (ह्याला पर्यायी शब्द आहे का ) घेऊन त्यात पुरणपोळी प्रमाणे सारण भरून पोळी लाटावी, नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून छान खरपूस भाजून घ्यावी, जास्त वेळ तव्यावर ठेवू नये.

४. पोळी खायला देतांना वरुन पातळ तूप घालून द्यावी.

a

आज अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर मिपावर लिखाणाचा हा प्रथम प्रयत्न आहे तरी
चूक-भूल सांभाळून घ्यावी, लोभ असावा ही नम्र विनंती !!

प्रतिक्रिया

पियुशा's picture

21 Apr 2015 - 12:24 pm | पियुशा

दिसले दिसले फटू दिसले :)

मस्त मस्त

किरु's picture

23 Apr 2015 - 8:17 pm | किरु

व्वा!!

नितिन५८८'s picture

21 Apr 2015 - 11:02 am | नितिन५८८

पोळया तव्यावरून काढुन सुट्या ठेवल्यात पण फोटो मात्र चिकटलेले दिसतायेत.

नितिन५८८'s picture

21 Apr 2015 - 11:21 am | नितिन५८८

पोळी बरोबर बाकीचे पण फोटो आलेत

सस्नेह's picture

21 Apr 2015 - 12:05 pm | सस्नेह

एकदम टेम्प्टिंग दिसते आहे रसपोळी !

कविता१९७८'s picture

21 Apr 2015 - 12:15 pm | कविता१९७८

मस्त दिसतायत.

उमा @ मिपा's picture

21 Apr 2015 - 12:40 pm | उमा @ मिपा

आंबा बर्फी कधी उरेल असं वाटत नाही पण तरी मुद्दाम दोन-तीन बाजूला ठेवून करून पाहीन. छान दिसतेय रसपोळी!

सानिकास्वप्निल's picture

21 Apr 2015 - 12:48 pm | सानिकास्वप्निल

छान रंग आलाय रसपोळीला :) स्वाद ही छानचं असणार.
खव्याच्या पोळ्यांसारखेच वाटत आहे (पेढे उरले की कुस्करुन करतात तसे)

hitesh's picture

21 Apr 2015 - 1:34 pm | hitesh

छान

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2015 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा

एक आवाज:- अतृप्त.. आपण कुठे आहात?

आम्ही:- मी मिपावरच्या रसपोळिच्या लेखात शेवटच्या फ़ोटुत जाऊन बसलोय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2015 - 2:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटोला आंबा बर्फीचा हार घालायचा का बर्क्या गर्‍यांचा? ;)

नीलमोहर's picture

21 Apr 2015 - 2:41 pm | नीलमोहर

सर्वांचे मनापासून आभार !!
स्नेहांकिता यांचे खासकरून फोटो लोड करून दिल्याबद्दल :)

कोकण कन्या's picture

21 Apr 2015 - 3:15 pm | कोकण कन्या

खूप चांगली पाककृती ... आणि रंग फार छान आहे ..

मितान's picture

21 Apr 2015 - 3:20 pm | मितान

अरे वा !

आंबाबर्फी पोळी फारच छान दिसतेय. खुसखुशीतपणा फोटोतही उतरलाय. करून बघेन.

मूळ कृती मायबोलीवर आहे. तिथेच आंबा बर्फी सारण म्हणून वापरण्याविषयी चर्चा झालेली आहे.

नीलमोहर's picture

21 Apr 2015 - 4:35 pm | नीलमोहर

वर लेखात दिल्याप्रमाणे माझ्या लक्षात नव्ह्ते पाककृती नक्की कुठे वाचली ते,
लेख मात्र फक्त मिपावर आहे, मायबोलीवर नाही :)

स्वाती२'s picture

21 Apr 2015 - 5:52 pm | स्वाती२

मूळ पाककृती http://www.maayboli.com/node/53186

नीलमोहर's picture

21 Apr 2015 - 8:30 pm | नीलमोहर

माझं ' जाना था जापान पहुँच गए चीन' असं झालंय,
असो, चायनीज ही सर्वांना आवडतं :)

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 8:35 pm | श्रीरंग_जोशी

रोचक दिसत आहे पाककृती.

मिपावर स्वागत अन चवदार सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

फार सुरेख दिसत आहेत पोळ्या!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Apr 2015 - 11:14 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान.वेगळी पोळी...

सविता००१'s picture

22 Apr 2015 - 12:08 am | सविता००१

रंग छान आलाय अगदी.
पण ही मला कुणीतरी आयती द्या. ;) आंबा बर्फी उरायचा चुकुनही प्रश्न येतच नाही घरी.

स्रुजा's picture

22 Apr 2015 - 1:38 am | स्रुजा

का हो का तेवढ्यात आमच्या आवडत्या ठिकाणाच्या आंबा बर्फीला अति गोड म्हणून घेतलंत? उद्या म्हणाल त्यांची बाकरवडी फार कडक आणि तिखट असते :P मुंबईचे दिसताय (ह. घ्या)

( ईथे साध्या पोळ्यांची मारामार हे स्वगत मनातल्या मनात आयत्या पोळ्यांबरोबर गिळून) बाकी कल्पकता छान हो ;)

तळ्यात मळ्यात's picture

24 Apr 2015 - 1:00 am | तळ्यात मळ्यात

बाकरवडी कडक??? (रत्नांग्रीच्या तिसऱ्या आळीतल्या आवाजात बरं का!) अहो इथे न्यूयॉर्कात मिळणारी चि_ _ची बा वडी चक्क मऊ की हो. आता तीच एक मिळते म्हणून खातो बापडी तशीच. जरा निरोप पोचवा की प्लीज्ज

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2015 - 1:08 am | श्रीरंग_जोशी

अमेरिकेतील भारतीय दुकानांत जी चितळेची बाकरवडी मिळते ती मुद्दाम जरा कमी तिखट बनवली असते. तिच्या चवीत अन भारतात मिळणार्‍या चितळेंच्या बाकरवडीचा चवीत सहजपणे जाणवण्याइतपत फरक असतो.

चितळेंनी दोन्ही प्रकारच्या बाकरवड्या अमेरिकेत उपलब्ध करून दिल्यास मजा येईल.

बे एरियामध्ये मिळणारी मात्र हमखास आतल्या दोन वळ्या जरा जास्तच कडक असलेली असते. भारतातून आणलेल्या आणि इथे मिळणार्यामध्ये हा फरक नक्कीच जाणवतो.

पण मिळतात हेच काय कमी आहे?

नीलमोहर's picture

22 Apr 2015 - 10:33 am | नीलमोहर

मीही पुणेकरच आहे..
चि_ _ यांच्या पदार्थांना तर तोडच नाहीये, फक्त ते थोडे जास्त गोड असतात.
आम्ही त्यांचे कायमस्वरुपी फॅन आहोत, बाकी चि_ _ आणि पुणे विरुद्ध आम्हीही काही ऐकून घेत नाही :)

यशोधरा's picture

24 Apr 2015 - 4:00 am | यशोधरा

, फक्त ते थोडे जास्त गोड असतात >> मुद्दामच असतात ते, निदान इतके गोड पदार्थ खाऊन अपुणेकर पुण्याबद्दल आणि स्वतः पदार्थकारांबद्दल दोन शब्द तरी गोड बोलतील अशी सुप्त इच्छा बाळगून असतात ते. :P

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 1:38 pm | स्पंदना

रसपोळीचं माहित नाही पण मला तुमच आयडी नाव अतिशय आवडलं आहे.
सुरेख नावं.

मिपावर स्वागत!

मोहनराव's picture

22 Apr 2015 - 5:10 pm | मोहनराव

उत्तम!!

तळ्यात मळ्यात's picture

24 Apr 2015 - 12:55 am | तळ्यात मळ्यात

वाह डिश अगदी मॅचिंग घेतल्ये रसपोळीला! रेसिपी आणि फोटो बाकी भारीच हो. आवड्या

पैसा's picture

24 Apr 2015 - 8:20 am | पैसा

डायरेक्ट आटवलेला आमरस घालून पोळ्या करायच्या! कारण आंबाबर्फी जास्त गोड आली तरी आमच्याकडे शिल्लक रहायची सुतराम शक्यता नाही!

वर 'तळयात मळयात' यांनी डिशचे कौतुक केलंय म्हणून..
माझ्या आठ वर्षीय भाचीला मी हा लेख दाखवून सांगितलं मी लिहिला आहे, तर तिला खरं वाटेना :(
पण माझ्याकडेही पुरावा होता.. तिला लेखातील डिश दाखवून विचारलं या आपल्या घरातल्याच आहेत ना ;)
तिला जे हसायला आलं, मला म्हटलीे,
"आपली डिश तर मशहूर झाली !! "
हिंदी मिश्र मराठी बोलण्याची तिची खूप गोड स्टाइल आहे :)

नूतन सावंत's picture

25 Apr 2015 - 10:43 pm | नूतन सावंत

अतिशय सुरेख दिसतेय.पटकन तुकडा तोडूनतोंडात टाकावासा वाटतोय.