रसपोळी आणि आभार !!
सर्वप्रथम मिसळपाव या संकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादकांचे मनापासून आभार.
मिपाने आम्हा संगणक कामगार लोकांचे रोजचे यांत्रिकी जगणे खूपच सुसह्य केले आहे.
कामे आटोपून थोडा निवांत वेळ मिळाला की लगेच आम्ही मिपाच्या आसऱ्याला (किंवा आश्रयाला) येतो.
इथले लेख, कथा, कविता, भटकंती, पाककला, छायाचित्रण इ. विविध सदरं मनापासून आवडतात,
खास करून लेखांवरील खुसखुशित प्रतिक्रिया, ज्यासाठीच बहुतांश जनता इथे वारंवार भेट देत असते !
आता पाककृति कडे वळूया,
ही आहे रसपोळी किंवा आंबापोळी.
कृति सोपी असल्यामुळे आणि निमित्त मिळाल्यामुळे करून पाहिली.
निमित्त: घरी आंबाबर्फी जास्त असल्यामुळे :P
हो... ऐकायला कितीही असत्य वा अतर्क्य वाटले तरी हेच खरं आहे :)
घरात आम्ही सगळे गोडघाशे असूनही ती चि_ _ स्पेशल आंबाबर्फी
( खास पाहुण्यांसाठी जास्त आणलेली ) संपवायला जड जात होती,
मग म्हटलं चला आंबापोळी करून बघू आणि ही पोळी झाली पण सुरेख,
दिसायला आणि खायलाही !!
ही पाककृती आमरस आटवून त्याचे सारण भरूनही करतात पण मी
आंबाबर्फी कुस्करून घेतली. ( ह्या कल्पनेचे श्रेय तरी द्या हो आम्हाला ! )
पाककृति मिपावर टाकायची असे आधी ठरवले नसल्यामुळे पायरी दर पायरी
छायाचित्र काढले नाहीत, शेवटी पोळी झाल्यावरच काढले.
साहित्य:
कणिक व मैदा, आंबा बर्फी गरजेनुसार.
साधारणपणे बर्फीच्या ३ तुकड्यांमध्ये ४ पोळया होतात.
कृति:
१. जास्त गव्हाचे पीठ आणि थोडा मैदा घेऊन नेहमी प्रमाणे कणीक मळावी.(मी नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या त्याही छान झाल्या.)
२. आंबाबर्फी कुस्करुन किंचित तूप घालून मऊ मळून घ्यावी. सारणासाठी छोटे गोळे करून ठेवावे.
३. कणकेचा उंडा (ह्याला पर्यायी शब्द आहे का ) घेऊन त्यात पुरणपोळी प्रमाणे सारण भरून पोळी लाटावी, नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून छान खरपूस भाजून घ्यावी, जास्त वेळ तव्यावर ठेवू नये.
४. पोळी खायला देतांना वरुन पातळ तूप घालून द्यावी.
आज अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर मिपावर लिखाणाचा हा प्रथम प्रयत्न आहे तरी
चूक-भूल सांभाळून घ्यावी, लोभ असावा ही नम्र विनंती !!

वाचने
16874
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एकही फोटू दिसला नाही :(
व्वा!!
In reply to मला एकही फोटू दिसला नाही :( by पियुशा
फोटो मात्र चिकटलेले दिसतायेत
धन्यवाद
वॉव !
मस्त दिसतायत.
आंबा बर्फी कधी उरेल असं वाटत
छान रंग आलाय रसपोळीला :)
.
एक आवाज:- अतृप्त.. आपण कुठे
फोटोला आंबा बर्फीचा हार
In reply to एक आवाज:- अतृप्त.. आपण कुठे by अत्रुप्त आत्मा
सर्वांचे मनापासून आभार !!
सुरेख.....
अरे वा !
मूळ कृती मायबोलीवर आहे. तिथेच
हो..
मूळ पाककृती http://www
तर एकूण..
रोचक पाककृती
फार सुरेख दिसत आहेत पोळ्या!
छान.वेगळी पोळी...
मस्त
का हो का तेवढ्यात आमच्या
बाकरवडी कडक???
In reply to का हो का तेवढ्यात आमच्या by स्रुजा
निर्यात करण्यासाठी वेगळी चव
In reply to बाकरवडी कडक??? by तळ्यात मळ्यात
बे एरियामध्ये मिळणारी मात्र
In reply to बाकरवडी कडक??? by तळ्यात मळ्यात
नाही हो नाही !!
मुद्दाम हो ते!
In reply to नाही हो नाही !! by नीलमोहर
रसपोळीचं माहित नाही पण मला
उत्तम!!
वाह डिश अगदी मॅचिंग घेतल्ये
मस्त!
सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद !!
रसपोळी आणि आभार