✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व

अ — अश्विनि कोल्हे, Tue, 04/14/2015 - 12:11
आजपर्यंत बर्याच कविंनी, आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर अनन्य साधारण कविता रचल्या आहेत पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय? कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय? अरे,असतील तुम्हाला खर्या भावना तर रचवा सासुवर कविता आणि समजू द्या या जगाला सासुच्याही मनातल्या यातना. आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय पण कधी तिलाही सुनेने छळले असेल याची कल्पना तरी कोणी केलीय? प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते तिलादेखील भावना असतात,मन असते तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय. तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ती तिच्याही आकांक्षा चिरडल्या गेल्या असतात. जेव्हा हीच सुन आता होणार असते सासु तेव्हा हळुच तिच्या चेहर्यावर उमलतं हसु ठरवते ती मनातल्या मनात स्वःताशीच की, मी माञ होइल एक चांगली सासु. तिनेही तिचा संसार फुलवलेला असतो तिनेही सासरची मनं सांभाळलेली असतात तिचाही कोणी आदर करावा, प्रेम करावं अशीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात. तिचे हे स्वप्न समजुन घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही तिच्याही आपल्याप्रति अपेक्षा असतील याचा काडीमाञ ही विचार करत नाही. सुनेने आपली सेवा करावी,सुख द्यावं असेच तिला नेहमी वाटत असतं इतकेच नव्हे तर या समाजात फक्त आपल्याच सुनेचं कौतुक व्हावं असंही प्रत्येक सासुला वाटत असतं. पुर्वीची सासु "बोलकी" होती पण स्वभावाने नव्हती मनमोकळी कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात होती एक असाधारण पोकळी. आजची सासु पुर्वीसारखी राहीली नाहीय ती आता सुनेशी मैञी करायला लागलीय वाटुन घेतेय सुनांसोबत स्वःताचे सुखदुःख त्यांच्याही भावनांचा विचार करायला लागलीय. आपणही एक पाऊल पुढे जाऊया आपल्या पुढे आलेला तिचा हात कायमचा आपल्या हातात घेऊया करुया कधीतरी तिच्याही मनाजोगं तिच्या नाजुक मनाला अलगद जपुया.

प्रतिक्रिया द्या
32374 वाचन

💬 प्रतिसाद (85)

हत्तीने मोठ्या डौलात दुसरे पाउल उचलले आहे...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/14/2015 - 12:19 नवीन
हत्ती असाच चालत राहूद्या, भुंकणार्‍यांची पर्वा न करता. आता सासरे, अजेसासरे, अजेसासुबाई, दिर, भावजय, नणंद, जावई, साडु, सवती- सवती, सवते- सवते, यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देणारी अशी एक काव्य माला होउन जाउदे असे नम्रपणे सुचवू इच्छीतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

त्याचबरोबर गल्ली आणि

यसवायजी
Tue, 04/14/2015 - 12:45 नवीन
त्याचबरोबर गल्ली आणि दिल्लीतल्या काऊ-माऊ-चिऊ,भुब्बू,घोदा,दुक्कर,बगला वगैरेवर कविता बरसूद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र

प्रचेतस
Tue, 04/14/2015 - 12:20 नवीन
सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र. अतिशय सहज सुंदर कविता. सासूची बाजू घेणारी कविता येईल असं आमच्या मनीही नव्हतं. अजूनही अशाच काही हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता येऊ दया.
  • Log in or register to post comments

आगोबाच्या निर् मळ मणानी

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/14/2015 - 12:22 नवीन
आगोबाच्या निर् मळ मणानी दिलेल्या या प्रतिसादाशी मी ही तितुक्याच निर् मळ मणाणे सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+1

जेपी
Tue, 04/14/2015 - 12:22 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली आपल्या प्रोत्साहान द्यायच्या धोरणाचं काय झालं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/14/2015 - 14:04 नवीन
>>>> सासूची बाजू घेणारी कविता येईल असं आमच्या मनीही नव्हतं. सासु आणि सुनबै यांचं अतिशय प्राचीन आणि गुंतागुंतीचं असं नातं आहे. वल्ली, एखाद्या शिल्पकलेत यांची कुठे शिल्प दिसलीत का तुम्हाला ? भग्वदगीतेत भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन करण्याऐवजी एखाद्या सासु-सुनेच्या समुहाला मार्गदर्शन केलं असतं तर...अनेक प्रश्न सुटले असते, असं मला वाटतं. मन की बाते : प्रा.डॉ. आजचा सुटीचा दिवस सासु-सुनेतच जाईल असं वाटतं. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सासू - सून नै पण सासू आणि

प्रचेतस
Tue, 04/14/2015 - 15:27 नवीन
सासू - सून नै पण सासू आणि जावई अशी शिल्पे पाहिली आहेत मी बरीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जावयाच्या

चाणक्य
Tue, 04/14/2015 - 21:42 नवीन
शिल्पांचे हातपाय तुटलेले असतील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

कवितानागेश
Tue, 04/14/2015 - 21:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान कविता

खंडेराव
Tue, 04/14/2015 - 12:56 नवीन
काही यमके खुप आवडली कविता-यातना, हसु-सासु, मनमो़कळी-पोकळी, जाउया-घेउया अभिनंदन..
  • Log in or register to post comments

प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते

होबासराव
Tue, 04/14/2015 - 13:02 नवीन
सांस भी कभि बहु थि
  • Log in or register to post comments

मग आम्ही तर दुसरं काय म्हणतो

सस्नेह
Tue, 04/14/2015 - 22:18 नवीन
मग आम्ही तर दुसरं काय म्हणतो ? हवे तर हे पहा http://www.misalpav.com/node/21458
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

चान चान

कपिलमुनी
Tue, 04/14/2015 - 13:10 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

त्र त्र त्र त्र त्र त्र त्र

संदीप डांगे
Tue, 04/14/2015 - 13:27 नवीन
त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र पाहिजे तितके घ्या आणि वापरा, फुकट आहेत.
  • Log in or register to post comments

अरे,असतील तुम्हाला खर्या

अन्या दातार
Tue, 04/14/2015 - 13:34 नवीन
अरे,असतील तुम्हाला खर्या भावना तर रचवा सासुवर कविता
रचवा हा शब्द लै म्हन्जे लैच आवडल्या गेला आहे. =)) काय एकेक भारी शब्द शोधून काढतात राव लोक! कम्माल आहे नुसती.
  • Log in or register to post comments

ज्जे बात क्रांन्तीकारी लळीत

नाखु
Tue, 04/14/2015 - 16:31 नवीन
सासू =सारख्या सूचना सुना =सूचना नको अखिल मिपा भावी-आजी-माजी(पाजी)हाजी-राजी-ताजी सास्वांच्या सामसूमजावई संघातर्फे सासूंच्या लेकी हितार्थ प्रसारीत.
  • Log in or register to post comments

मिपावरच्या एका प्रसिद्ध

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/14/2015 - 14:11 नवीन
मिपावरच्या एका प्रसिद्ध सासुबैंच्या प्रतिसादाच्या परतिकशेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त्यांची बालीका सुन्बै पण

टवाळ कार्टा
Tue, 04/14/2015 - 14:32 नवीन
त्यांची बालीका सुन्बै पण फिरकली नैयै बरेच दिवस...कै माहीत आलीपण असेल दुसर्या रुपात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळे भरून आल्याने अक्षरे पुसट

मनीषा
Tue, 04/14/2015 - 13:46 नवीन
डोळे भरून आल्याने अक्षरे पुसट दिसत आहेत .. जरा वेळाने (डोळे कोरडे झाले की ) वाचीन
  • Log in or register to post comments

ह्म्म!

खेडूत
Tue, 04/14/2015 - 13:51 नवीन
म्हणजेच तुम्ही डायरेक पर्तिसाद वाचलेत ! त्याशिवाय का डोळे भरून येणारेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

नाही हो ... नाही वाचले

मनीषा
Wed, 04/15/2015 - 06:56 नवीन
नाही हो ... नाही वाचले प्रतिसाद . नुस्ता लेखाचा मथळा वाचला .. (हेडींग .. हेडींग) .... आणि असं झालं .. :( :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

मस्त !

खेडूत
Tue, 04/14/2015 - 13:47 नवीन
यावेळी माञ आम्हाला अहंकार रुपी ठसका बसला नाही. कारण आपल्या लेखनातील आशय आम्ही समजुन घेतला आहे!
  • Log in or register to post comments

पुसटसं व्यक्तिमत्व ???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/14/2015 - 13:51 नवीन
कविता मुक्तछंदात असली तरी तिलाही एक ताल हवा असे वाटले. बाकी, तुम्ही लिहित राहा. एकाच दिवसात सर्व कविता टाकु नका. कुठे तरी कोणाच्या तरी कवितेचं कौतुक करा. प्रतिसादही लिहा. बाकी, अजून चांगला विषय येऊ देत कवितेत. दाद आतुन आली पाहिजे. दत्ता हलसगीकर यांच्या चार ओळी... कविता रस्त्यांच्या येतात कुठुन हे रस्ते जातात कोणत्या गावा. भेटतात कोठे रस्ते अन त्यांचा कुठे दुरावा ? रस्त्यांना रस्त्याचीही असते का ओळख सांगा ? का रस्त्यांच्याही मनातुन चालतो दिशांचा दंगा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाव्वा.किती सांभाळून घेतात ना

यसवायजी
Tue, 04/14/2015 - 15:50 नवीन
वाव्वा.किती सांभाळून घेतात ना प्राडॉ नव्या लोकांना. अशेच आस्ते सपोर्टीव, स्पोर्टीव्ह आम्चेही गुरजी। आमीबी शाने झालो अस्तो वदले यसवायजी।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठ्ठो =)) एकच नंबर रे. =))

बॅटमॅन
Tue, 04/14/2015 - 16:17 नवीन
ठ्ठो =)) एकच नंबर रे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

खतरनाक..:)

शलभ
Tue, 04/14/2015 - 19:42 नवीन
खतरनाक..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

लै मंजे लैच भारी. +१००००

पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 22:51 नवीन
लै मंजे लैच भारी. +१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@ आमीबी शाने झालो अस्तो वदले

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/15/2015 - 01:10 नवीन
@ आमीबी शाने झालो अस्तो वदले यसवायजी।>> ह्ह़ा ह्ह़ा ह्हा! SYG! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

खूप छान ओळी

स्वधर्म
Tue, 04/14/2015 - 14:16 नवीन
बिरूटे सर, ईथे डकवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जबरदस्त. सासुविषयी एवढा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/14/2015 - 14:22 नवीन
जबरदस्त. सासुविषयी एवढा चांगला विचार करणारे लोक हल्ली विरळेचं असतात. एक विनंती आहे, एक कवी किंवा कवियत्रीचं फक्त आपल्या कवितांना सुरेल चाल लावु शकते. तुम्हीही तसा प्रयत्न करा नं. चाल लावुन, स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करुन इथे शेअर करा. मिपाकरांना कविता वाचण्यापेक्षा सुरेल आवाजात ऐकायला आवडतात असं निरि़क्षण आहे. शिवाय तिथल्या तिथे कवितेचे शब्दही वाचायला मिळाल्यावर कवितेचा परिणाम अजुन गहिरा होईल असं वाटतं. आपलं मत जरुर कळवा. रेकॉर्डिंग आणि एंबेड साठी मदत लागल्यास इथेचं एक गद्य धागा काढा लोकं मदत नक्की करतील.
  • Log in or register to post comments

कॅप्ट्न, त्यो संदिप खरे का

पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 15:41 नवीन
कॅप्ट्न, त्यो संदिप खरे का कोन हाय , तेला जमल काय चाल लावायला हितं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

दमलेल्या सासूची कहानी

संदीप डांगे
Tue, 04/14/2015 - 16:10 नवीन
दमलेल्या सासूची कहानी 'दमलेल्या...'ची चाल जगातल्या कुठल्याही गद्याला लागू शकते. तस्मात वरील कवितेस ती चाल लावून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

देवा

नाखु
Tue, 04/14/2015 - 16:12 नवीन
दमलेल्या असे नाही तर दम(न)लेल्या असे ठेवले तर चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

चालेल काय पळल!

पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 16:39 नवीन
चालेल काय पळल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

@नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/14/2015 - 17:31 नवीन
@नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक मी शिर्यसली सांगत होतो. माझ्या प्रतिसादामधे शप्पथ सांगतो एकही शब्द खवचटपणाचा नव्हता. :( तुम्हीचं सांगा तुम्हाला कविता वाचायला आवडेल का नीट चाल लावलेली ऐकायला आवडेल? आता कवियत्री तैंनी वाचलं तर परत त्या हत्ती आणि कुत्र्यावर घसरणार. परत वाद विवाद होणार. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

सहमत.

पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 17:41 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मी बी

नाखु
Tue, 04/14/2015 - 17:42 नवीन
मी शिर्यसली सांगतोय वर्षानू वर्षे सासवांचे दमन झाल्येय आत्ता कुठं त्याला वाचा फोड्ली जातेय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पुर्वीची सासु "बोलकी" होती

काळा पहाड
Tue, 04/14/2015 - 14:37 नवीन
पुर्वीची सासु "बोलकी" होती पण स्वभावाने नव्हती मनमोकळी कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात होती एक असाधारण पोकळी.
आजकालची सून आहे मोकळी ढाकळी सासू चालू ठेवते सतत टकळी फूल ना फुलाची पाकळी रेल्वेत कधी ओढू नका साखळी
  • Log in or register to post comments

सासूच्या कोवळ्या, निरागस

सूड
Tue, 04/14/2015 - 14:57 नवीन
सासूच्या कोवळ्या, निरागस भावना मांडणारं काव्य आवडलं. तुमच्या सारख्या कवयि'ञी' आहेत म्हणून आम्ही मिपावर येतो.
  • Log in or register to post comments

आवरा

स्पा
Tue, 04/14/2015 - 15:25 नवीन
आवरा
  • Log in or register to post comments

स्पा, असं अर्धवट लिवून गोंधळ

पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 15:43 नवीन
स्पा, असं अर्धवट लिवून गोंधळ नई घालायचा. कुणी कशाला आवरायचे ते सपष्ट करणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

यावर...

जेपी
Tue, 04/14/2015 - 16:13 नवीन
यावर... "सासरा -एक धुरकट व्यक्तिमत्व " . . असा लेख आला पायजे आता.
  • Log in or register to post comments

धुरकट नको-

खेडूत
Tue, 04/14/2015 - 16:22 नवीन
धुरकट नको- बिड्या वडनारा वाटतो! धुक्यात हरवलेलं कसं वाटेल? का मीटरमधे बसत नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जेपी भाऊ

नाखु
Tue, 04/14/2015 - 16:24 नवीन
खालील शिर्षके राखीव आहेत. "सासरा -एक तुरगट व्यक्तिमत्व " "नणंद -एक खुस्पट व्यक्तिमत्व " "जाऊ -एक जळकट व्यक्तिमत्व " "दीर थोरला -एक कळकट व्यक्तिमत्व " "दीर धाकला -एक पोरकट व्यक्तिमत्व " "नवरा -एक मेंगळट व्यक्तिमत्व " अखिल मिपामापंकाढे मंडळ संचालीत दिसेल तिथे आरक्षण ! खड्ड्यात गेले संरक्षण !! समिती तर्फे नवजिल्बीकर हितार्थ प्रसारीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अच्रत आणि बव्लत यांना

बॅटमॅन
Tue, 04/14/2015 - 16:25 नवीन
अच्रत आणि बव्लत यांना वगळल्याचा निशेद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त्ये

नाखु
Tue, 04/14/2015 - 16:30 नवीन
(मिपा)पोरांसाठी आणि सोत्तासाठी राखून ठेवल्य बर कां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एक नंबर!! आव्डलं!!

पिलीयन रायडर
Tue, 04/14/2015 - 16:42 नवीन
एक नंबर!! आव्डलं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

प्रत्येक सासु सुद्धा कधी एक

वेल्लाभट
Tue, 04/14/2015 - 17:14 नवीन
प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते
हे क्लासच !
  • Log in or register to post comments

प्रेरणास्थान एकता कपूर अन

बॅटमॅन
Tue, 04/14/2015 - 17:21 नवीन
प्रेरणास्थान एकता कपूर अन स्मृती इराणी असाव्यात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हं... आठवतंय बुवा असं काहीतरी

वेल्लाभट
Tue, 04/14/2015 - 17:25 नवीन
हं... आठवतंय बुवा असं काहीतरी ऐकलेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा