Skip to main content

अशी कशी ग तु...........

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 06/04/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस असतेस दिवसभर डोळ्यात अन रात्री स्वप्नांतही जागतेस........... मी पहातो तुझे प्रातिबिंब या चमचमणार्‍या नभात कधी भेटतेस होउनी चांदवा कधी चंदेरी चांदण्यात लपतेस.............. अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस सजतेस अल्लड सरींनी अलवार ओल्या मिठीत शहारतेस मी मागतो तुझा इशारा या चिंब भिजणार्‍या पावसात कधी वेढतेस तुझ्या आवेगाने कधी अलगद ओंजळीत साठतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस मोहरतेस आसमंत अस्तित्वाने हवा तुझ्या श्वासाने गंधाळतेस मी हरवतो तुझ्या असण्याने या तुझ्या मंतरलेल्या जगात कधी भुलवतेस हरएक अदेने कधी नुसत्या नजरेनेच नशावतेस...... अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस रहातेस गुपचुप हृद्यात सदा आठवणींच्या उंबर्‍यात रेंगाळतेस मी शोधतो तुझ्या सयेला या एकांती उरल्या शिवारात कधी हरवतेस मावळतीच्या रंगात कधी पापण्यांच्या किनारी अडतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस
लेखनविषय:

वाचने 1642
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सगळ्यांचे मनापासून आभार