कां उगीच घाबरतोय आम्ही?
कां उगीच गळा काढून रडतोय?
कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय?
तो नरभक्षक चटावलाय
आपला क्रुस
आपल्याच खांद्यावरून वाहणार्या
महात्म्यांच्या रक्ताला
तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी
खांदे मजबूत लागतात
ख्रिस्तासारखे
गांधीबाबासारखे
दाभोलकरांसारखे
पानसरेंसारखे
आजन्म व्रतस्थ जनसेवेतून
बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन
अशा निर्धारी आचारातून
ऋशींनाही लाजवेल
अशा निर्मोही चारित्र्यातून
मजबूत होतात असे खांदे
आमची जनसेवा
सोयीची आणि सवडीची
थोडेसे दमल्यावर
कुणी लालूच दाखवल्यावर
कुणी धमकावल्यावर
क्रुस टाकून पळून जाणारे भेकड आम्ही
आमचे रक्त चालत नाही त्याला
भुकेला तरी
चवीचा रसज्ञ आहे तो
- देवदत्त परुळेकर
वाचने
1855
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरे ! रचना आवडली!
विचारांनी विचारांची शिकार
+++१११
In reply to विचारांनी विचारांची शिकार by मार्मिक गोडसे
खिक्
अंतर्मुख करणारी कविता...
सामान्य-मनुष्य असे म्हणाला तोच कोंबडा आरवला....................