भजन - भक्तीचा डिज्जे (विडंबन - फेविकॉल से)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
16 Mar 2015 - 3:00 pm

काव्याची मूळ प्रेरणा ही

डीज्जे बिज्जे विषय चालू केले, तर त्यावर एक भजन कम गाणं सुचलंय. बघा कसं वाटतं. चाल तीच; चिपकाले फेविकॉलसे वाली. हसत घ्या. संदर्भ लागण्यासाठी मूळ ओळी कंसात दिल्या आहेत.

रस्त्यावर ज्या त्या बघा मंडप उभारले (अंगडाईया...)
रुपात देणगीच्या किती पैसे काढले (उह आह...)
आता आला तो दिवस (मै तो चलू...)
फेडू सारे हो नवस (की मच जाए...)
भक्तांच्या भेटीला बाप्पा बघा आले (होश वाले भी...)
आले आले रे..... (२) आले गणराज (मेरे फोटो को...)
भक्तीचा आता डीज्जे वाजूदे (चिपकाले सय्या....)
त्यांच्या कृपेच्या तालावरी (मै तो कब से....)
हरपून भान भक्त नाचूदे (पटाले सय्या....) ||धृ||

चला चला बाप्पाच्या दर्शनाला जाऊया (२) (प्यार करले तू आज...)
हर दुर्वा नि लाल फुले त्याला वाहूया (नसियत भूल....)
मोदकांचा हो त्याला देऊनिया नैवेद्य (पीनेवाले को भी...)
मिळुनी सारे आपण आरतीही गाऊया (ये वो दारू है...)

बाप्पाला सांगू तुझी कृपा रे राहूदे (आजा मेरे राजा तुझे...)
संकटं अमुची पळून जाऊदे (बर्फीले पानी मे...)

सा-या भक्तांना (सारे इंडिया.......)
सा-या भक्तांना तुझी माया रे लागूदे (सारे इंडिया को तूने गु़लाम किया.....)

सुख समृद्धी... (मै तो तंदूरी)
सुख समृद्धी राहो सदा, भरपूर हेल्थ वेल्थ लाभूदे ||१|| (मै तो तंदूरी मुर्गी हूं....)

देवांचा देव तू काहीही करू शकणारा (लोग कहते है...)
मागलेले तू सर्व काही असा देणारा (काट दूंगी....)
तुझी महती कुणास कळणारी नाही रे (मेरा जलवा जो देख...)
सर्वांना तू हवा हवासा रे असणारा (क्लोज करके...)

दरवर्शी येण्याची चाहूल लावतोस (पब्लिक शहर की....)
जाताना मनाला हुरहूर लावतोस (अरे ठुमके जो कमरिया....)

कृपादृष्टी.... (पर कहानी.....)
कृपादृष्टी तुझी रे अपार राहूदे.... (पर कहानी ओ रानी....)

तुझी सेवा करायची सदा (माय जिप्सी विथ सायरन तय्यार)
बाप्पा आम्हाला बुद्धी लाभूदे ||२||| (भगाले इसे पॅटरॉल से)

- अपूर्व ओक.
सदर काव्याचे सर्व हक्क सुरक्षित.
ब्लॉग वर प्रकाशित काव्याचा दुवा हा

भावकविताकविता

प्रतिक्रिया

सूड's picture

16 Mar 2015 - 3:03 pm | सूड

अर्र!! लैच !!

महिमा हा शब्द हिंदीत स्त्रीलिंगी तर मराठीत पुल्लिंगी आहे. बाकी काव्य छान. मूळ काव्य गटारगंगा आहे असे मत असल्याने त्यावर काय भाष्य करणार!

स्पा's picture

16 Mar 2015 - 3:47 pm | स्पा

ओके

वेल्लाभट's picture

16 Mar 2015 - 3:55 pm | वेल्लाभट

व्हाय सो सिरियस?

आदूबाळ's picture

16 Mar 2015 - 3:55 pm | आदूबाळ

=))

जबरदस्त!

वेल्लाभट's picture

16 Mar 2015 - 3:56 pm | वेल्लाभट

सूड स्वॅप्स आदूबाळ - आभार्स !

माझे कोणीतरी आभार मानले? आता मी डोळे मिटायला मोकळा!!

वेल्लाभट's picture

16 Mar 2015 - 4:03 pm | वेल्लाभट

आता तू 'सूड' घ्यायचा.

एक एकटा एकटाच's picture

16 Mar 2015 - 6:46 pm | एक एकटा एकटाच

हा हा हा

खतरनाक .....

विडंबनहक्क सुरक्षित करण्याची टपरी कुठल्या गल्लीत आहे?

वेल्लाभट's picture

16 Mar 2015 - 9:58 pm | वेल्लाभट

या माझ्याकडे

निनाद जोशी's picture

17 Mar 2015 - 10:42 am | निनाद जोशी

;-) ;-) ;-) अहो काय हे वेल्लाभट...... फारच मस्त......

विजुभाऊ's picture

17 Mar 2015 - 6:01 pm | विजुभाऊ

आत्ता बप्पानी काय करायचे?

वेल्लाभट's picture

18 Mar 2015 - 11:02 am | वेल्लाभट

धन्यवाद निनाद, अमोल