✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गर्भपातल्या रानी .....!

ग — गंगाधर मुटे, Mon, 03/16/2015 - 09:24
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे ‘अभय’ गेले
गेले दाणापाणी

         -  गंगाधर मुटे ‘अभय’
==0=^=0=^=0=^=0=^=0==


प्रतिक्रिया द्या
4969 वाचन

💬 प्रतिसाद (16)

परवाच्या गारपिटीनं खरोखर

मितान
Mon, 03/16/2015 - 09:32 नवीन
परवाच्या गारपिटीनं खरोखर हवालदिल झालाय शेतकरी ! कविता चांगली तरी कसं म्हणू ! :(
  • Log in or register to post comments

++११

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/18/2015 - 09:50 नवीन
++११ :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

पोचली.. :(

यशोधरा
Mon, 03/16/2015 - 09:37 नवीन
पोचली.. :(
  • Log in or register to post comments

हवालदिल

ब़जरबट्टू
Mon, 03/16/2015 - 09:50 नवीन
... आता निसर्ग पण कोपला... :(
  • Log in or register to post comments

चांगली नाही म्हणवत

एक एकटा एकटाच
Mon, 03/16/2015 - 10:42 नवीन
खरच ज्याच्यावर विसंबून सगळा जगण्याचा प्रपंच मांडायचा तोच जर का जीवावर उठला तर दाद तरी कुणाकडे मागायची?
  • Log in or register to post comments

वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन

ऊध्दव गावंडे
Mon, 03/16/2015 - 13:50 नवीन
वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन नुकसान कसं होईल .त्यामुळे पीक नाही . जे थोडं बहुत पीकलं त्याला भाव नाही . माय बाप सरकार असं आलं ज्याला शेती मातीशी काही घेणं देणं नाही . शेतकऱ्याने कोणा कडे पाहावे ?
  • Log in or register to post comments

:(

अजया
Mon, 03/16/2015 - 14:02 नवीन
:(
  • Log in or register to post comments

...

एस
Mon, 03/16/2015 - 14:58 नवीन
कविता पोहोचली.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

गंगाधर मुटे
Wed, 03/18/2015 - 04:39 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच व्यथा नेमकी

चुकलामाकला
Wed, 03/18/2015 - 13:51 नवीन
नेहमीप्रमाणेच व्यथा नेमकी मांडलीत .
  • Log in or register to post comments

कविता आवडली!

नगरीनिरंजन
Wed, 03/18/2015 - 18:58 नवीन
कविता आवडली! पण ज्या ठिकाणी आज शेतं आहेत तिथेच कधीकाळी एका जंगलाचा गर्भ पाडला गेला असेल; त्याचाच शाप आहे हा आपल्या सगळ्यांना असं वाटल्याशिवाय राहात नाही.
  • Log in or register to post comments

गारपिटीचे फोटो

विवेकपटाईत
Wed, 03/18/2015 - 19:53 नवीन
गारपिटीचे फोटो मेलेल्या पक्ष्यांचे फोटो झोपलेल्या शेतांचे फोटो सर्वच काही फेसबुक वर मित्रांसोबत शेयर केले सांयकाळी टीवी वर घूँट घूँट पीत चहा शेकऱ्यांच्या व्यथा गटकण्या शिवाय मी काहीही केले नाही.
  • Log in or register to post comments

हातामधला हात सुटूनी

खटपट्या
Wed, 03/18/2015 - 22:38 नवीन
हातामधला हात सुटूनी घरटे विच्छिन्न झाले बुंध्याभवती जमीन नहाली रक्ताळल्या पिलांनी
सून्न
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

गंगाधर मुटे
Tue, 03/31/2015 - 14:48 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

छान कविता! आवडली!

अनुप ढेरे
Tue, 07/19/2016 - 22:37 नवीन
छान कविता! आवडली!
  • Log in or register to post comments

अंगावर काटा आला..

शि बि आय
Tue, 07/19/2016 - 23:51 नवीन
अंगावर काटा आला..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा