Skip to main content

तरीसुद्धा ...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 13/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सारं तसं ठीक आहे संथ जीवन चालले आहे तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे । तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …। दूर तू गेलीस त्याला एक तप उलटून गेले पाण्यासारखे क्षण सुद्धा इकडे तिकडे वहात गेले तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे । तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …। लग्न संसार मुलं-बाळं दोघं गुंतून गेलो आहोत रुळलेल्या वाटेवरुन खड्डे टाळत चालत आहोत तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे । तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …। मेघ कधी बरसत नाही , दूर ही निघून जात नाही सावली देणं टाळत नाही, साथ देणं विसरत नाही मनाच्या आभाळात होतीस तिथेच तू आहेस तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
लेखनविषय:

वाचने 933
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुरेख रचना!

सुरेख रचना, पण तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे :-) .