आता जरी का त्यागिले
तिने मजला भेटणे
रोज माझ्या स्वप्नी येते
घेऊन सोबत चांदणे
बैसतो काठी नदीच्या
घेउनि हातात हात
पाहतो डोळे भरुनी
साठवतो तिजला मनात
चाहूल त्या सूर्योदयाची
लागते जेव्हा तिला
विरुनी जाते दवामध्ये
सोडून मजला एकला
का कळेना सुर्य का
इतक्या सकाळी उगवतो
का कळेना मी सुद्धा
असा अचानक उठतो
पाहतो तिजला मनी अन
स्वप्न हि पाहतो तिचे
म्हणून वाटे लागले मज
वेड तिच्या प्रीतीचे……
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1272
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता, भावूक.
धन्यवाद.....
In reply to छान कविता, भावूक. by सौन्दर्य
छान, आवडली .