सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...
लेखनविषय:
खोल मी आहे किती पाहून घेतो
मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो
सावल्यांनी पोळलो आहे कधी मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो
बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो
मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो
तू किती भिनलीस माझ्या आत राणी-
ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो
डॉ.सुनील अहिरराव
वाचन
2153
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह!!!!!!
कविता छान, फक्त शेवटच्या दोन
कडक
मी उद्या होईनही काफर कदाचित
In reply to मी उद्या होईनही काफर कदाचित by कानडाऊ योगेशु
+ १
In reply to मी उद्या होईनही काफर कदाचित by कानडाऊ योगेशु
अनुमोदन
मी उद्या होईनही काफर कदाचित
चांगलाच प्रयत्न आहे.
In reply to चांगलाच प्रयत्न आहे. by खटासि खट
+१
छान
सरस!
मस्त
@अमोल परब,सौंदर्य,चाणक्य,