Skip to main content

सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 05/03/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
खोल मी आहे किती पाहून घेतो मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो सावल्यांनी पोळलो आहे कधी मी ऊनही आता जरा फुंकून घेतो बेगडी आहे तुझी दुनियाच सारी मी अता रानीवनी भटकून घेतो मी उद्या होईनही काफर कदाचित ये, तुला थोडी फुले वाहून घेतो तू किती भिनलीस माझ्या आत राणी- ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो डॉ.सुनील अहिरराव
लेखनविषय:

वाचने 2155
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त गझल. एकदम कडक....आवडली

चांगलाच प्रयत्न आहे. सावल्यांनी पोळलो आहे कधी ऊनही आता जरा फुंकून घेतो या शेरातली पहिली ओळ "इथे सावल्यांनी पोळलो" यात कल्पनाचमत्कृती विरोधाभास अलंकार दर्शवते. पण मग दुस-या ओळीला त्या अपेक्षेने ऊन फुंकून पिणे यात तो कंटीन्यू नाही होत. गालगागा सांभाळून उन्हाने पोळलो म्हणून सावली फुंकून पितो असं जमलं असतं.

एकाहून एक सरस कविता येऊ लागल्यात!!

मस्त!

@अमोल परब,सौंदर्य,चाणक्य, कानडाऊ योगेशु,चुकलामाकला,यशोधरा,खटासिखट,तिमा,रुपी.शब्दबम्बाळ,मिसळलेला काव्यप्रेमी सर्व मित्रांचे मनापासून आभार ! आदरणीय खटासिखट, मी आपाल्या मताशी सहमत आहे. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद.