PMPL ने प्रवास का करावा?
PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे :
१. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू
२. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो
आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल :
१. बजाज डिस्कवर सारखी चांगले मायलेज देणारी गाडी साधारण ५०००० रुपयांना पडते
२. पेट्रोल cost : ६५ च्या मायलेज ने १ रुपया प्रती किमी
३. देखभाल खर्च: साधारण ०. ३ रुपये प्रती किमी (३००० किमी नंतर servicing गृहीत धरून )
४. वाहन विमा ०. १ रुपये प्रती किमी (वार्षिक ८०० रुपये )
५. वाहनाची किंमत : ५ वर्षे साधारण ४०,००० किमी चालविल्या नंतर येणारी पुनर्विक्री किंमत २००००. म्हणजे ४०,००० किमी साठी रुपये ३०००० खर्च . व्याज गृहीत धरत हा खर्च किमी ला १ रुपया असा गृहीत धरायला हरकत नाही .
एकूण प्रती किमी खर्च (१+२+३+४+५): २.४ प्रती किमी
म्हणजे PMPL च्या सेवे साठी प्रती किमी २ रुपये तर स्वतःची दुचाकी वापरल्यास २.४ रुपये असे गणित आहे. म्हणजे दुचाकी वापरण्याचा खर्च PMPL च्या तुलनेत २०% जास्त आहे. त्यातून दोघांनी प्रवास केल्यास तो PMPL च्या तुलनेत स्वस्तच आहे. त्यातून वेळेची बचत, flexiblity हे इतर फायदे आहेतच. तसेच PMPL हि काही घराच्या दारात मिळत नाही म्हणजे ते चालणे अधिक वेळेवर न धावणाऱ्या स्वछ नसलेल्या कुठेही बंद पडू शकणाऱ्या गाड्या हे मुद्दे गृहीत धरता PMPL ने प्रवास का करावा ? असेच प्रश्न चिन्ह उभे राहते .
ह्यात जेष्ठ नागरिक, लहान मुले, किंवा दुचाकी विकत घेणे न परवडणारे लोक ह्यांची अवस्था बिकट होते. त्यांना PMPML वापरण्या वाचून दुसरा पर्याय नाही आणि PMPL चा दर्जा आणि खर्च ह्याचे कधीच न जुळणारे गणित, ह्या कात्रीत सापडायला होते.
टीप : ह्यातील गणित ढोबळ मानाने सध्याचे इंधन भाव लक्षात घेऊन मांडले आहे. गाडी चा प्रकार, नवीन / जुनी , वापर ह्यानुसार ह्यात थोडेफार फरक शकतात .
प्रतिक्रिया
मी टोर्टुगामधुन विकली असती तर
हा हा हा
आली रे आली आता PMPML ची बारी आली #SinghamPardeshi
दुसरा चांगला पर्याय नाही पण
मुंबईच्या बेस्टच्या
डॉ श्रीकर परदेशी
Pagination