Wrong Number
लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे
किस्सा 1.
सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो. फोन वाजला नंबर पाहून अंदाज आला अनओळखी नंबर आहे.
समोरील व्यक्ती ः कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
समोरील व्यक्ती ः परत कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
समोरील व्यक्ती ः आवाज वाढवून कोण बोलतय
मी ः आम्ही शिवाजी राजे भोसले बोलतोय, आपण
समोरील व्यक्ती ः तुम्ही शिवाजी राजे भोसले तर मी अफजलखान
मी ः मग शामयानात या तुमचा बदोबस्त करुन ठेवला आहे
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 2.
मी ः मी निलेश ह....बोलतोय. मला तुमचा नंबर आपल्या समाजाच्या कार्यालयातून भेटला. मी माझ स्थळ सुचवत आहे तुम्हीच्या मुलीसाठी.
मुलीचे वडिल ः तुम्ही आमच्या मुलीची प्रत्रिका पाहिली का?
मी ः अच्छा तुमच्या मुलीच लग्न झाले का
मुलीचे वडिल ः नाही हो मी जन्मप्रत्रिकाबददल बोलतोय
मी ः त्याचा लग्नाशी काय संबंध
मुलीचे वडिल ः तुमच्या प्रत्रिका जुळतात का ते तपासुन पाहवे लागेल.
मी ः आता हे कोण तपासतोे कोणी तज्ञ की कोणी सोम्या गोम्या चालतो आणि काय हमी देतो, नाही कारण माझया जन्माच्यावेळी आमच्या ज्योतिष्याने सांगितले होते की मी डाॅक्टर होईन पण मी तर साधा कपाउडरही झालो नाही म्हणून म्हटलं
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 3.
बॅंंक सेल्स ः सर तुमच A/c आमच्या बॅंंकेत आहे आणि तुमचा Track Record चांगला आहे म्हणून बॅंंक तुम्हाला क्रेडिट कार्ड आॅफर करत आहे
मी ः धन्यवाद, मला नकोय
बॅंंक सेल्स ः घ्या ना
मी ः विचार करुन सांगतो
काही दिवसानंतर................
बॅंंक सेल्स ः सर मग काय विचार केला
मी ः खरंच, मला नकोय
बॅंंक सेल्स ः सर घ्याना फुकट आहे.
मी ः खरंच, मग 500 क्रेडिट कार्ड पाठवून दया सर्व आॅफिसमध्ये वाटतो
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 4.
बॅंंक सेल्स ःसर, तुमच होम लोन आमच्या बॅंंकेत आहे आणि तुमचा Track Record चांगला आहे म्हणून बॅंंक तुम्हाला पर्सनल लोन आॅफर करत आहे
मी ः धन्यवाद, मला नकोय
बॅंंक सेल्स ः घ्या ना
मी ः विचार करुन सांगतो
काही दिवसानंतर................
बॅंंक सेल्स ः सर मग काय विचार केला
मी ः खरंच, मला नकोय
बॅंंक सेल्स ः सर घ्याना बॅंंक तुम्हाला special discount rate offer करत आहे
मी ः नंतर फोन करा आता मी मिटींग मध्ये आहे
बॅंंक सेल्स ः कधी फोन करु
मी ः तसा मी नेहमी अलार्म लावून झोपतो पण सकाळी पाच वाजता फोन केलास तर फार बरं होईल मला आॅफिसला जाण्यास नेहमी उशिर होतो
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 5.
बॅंंक सेल्स ः सर तुमच A/c आमच्या बॅंंकेत आहे आणि तुमचा ज्तंबा तमबवतक रेकाॅर्ड चांगला आहे म्हणून बॅंंक तुम्हाला क्रेडिट कार्ड आॅफर करत आहे
मी ः धन्यवाद, मला नकोय
बॅंंक सेल्स ः घ्या ना. तुम्हाला शाॅपिंगए पेट्ोल वर रिबेट मिळेल
मी ः माझयाकडे ना कार आहे आणि ना बाईक आहे आणि पेट्ोल आपल्या पोटात गेल्यावर आपण डिरेक्ट विमान बसतो.
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 6.
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः सर, मी .... संस्थेतून बोलतेय, तुमच्या साठी आमच्याकडे एमबीए कोर्स आहे
मी ः स्वगत, अहो आमच्या इंग्रजीची बोंब आहे मी भलेही तुमचा एमबीए कोर्स पोपटपंची करुन पास होईन पण मॅनेजर च्या खुर्चीत बसल्यावर इंग्रजी तर त्या लेवलच बोलता आले पाहिजे ना.
मी ःअहो माझी फिल्ड वेगळी आहे, मी सोफटवेअर मध्ये आहे
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः ठिक आहे त्याचासाठीही आमच्याकडे कोर्स आहे
मी ः तुम्ही मला त्याचे detail mail करा
काही दिवसानंतर................
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः सर मग काय विचार केला
मी ः मला एक कोर्स करायचा आहे, त्याच duration & fee काय असेल
कोणता कोर्स सर
मी ः intercourse
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 7.
काॅल सेंटर एक्सक्यूटिवः सर, मी .... टुर अन्ड ट्रावेल कंपनी तून बोलतोय
मी ः बर
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः आमच्याकडे तुमच्यासाठी टुर पॅकेज
मी ः मी सारी दुनिया फिरुन आलो आहे आता फक्त स्वर्ग आणि नरक पाहयाचा बाकी आहे, तुम्ही कोठे पाठविणार मला.
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 8.
बिहारी स्त्री चा फोन आला.
बि. स्त्री ः कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
बि. स्त्री ः परत कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
बि. स्त्री ः परत कोण बोलतय
मी ः मी अमिताभ बच्चन बोलतोय
बि. स्त्री ः पप्पु के पप्पा, चाचा, चाची, अमिताभ बच्चन है फोनावा पर
मी ः आता मात्र फोन कट करण्याची पाळी माझी होती.
टिपः यातील काही प्रसंग काल्पनिक आहेत.तुमचेही मजेशीर किस्से येउ दया.
याद्या
5555
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
लँडलाईन फोन जोरात होते
:))) :))) :)))
हेलो हेलो,मी जेठालाल नागडा बोलतेय..
In reply to :))) :))) :))) by अदि
एक ऐकीव , वेळ रात्री अडीच
हेच
एक किस्सा
अरेरे........
आमच्या काळातील गोष्ट ,
आजी रॉक्स ...
In reply to आमच्या काळातील गोष्ट , by ईन्टरफेल
आजी रॉक्स ...
In reply to आजी रॉक्स ... by mayurpankhie
सगळे किस्से मस्त..
काल्पनिक
In reply to सगळे किस्से मस्त.. by mayurpankhie
हाहाहा!
आज हि डोळ्या समोर येतोय तो