Skip to main content

तु

Published on शुक्रवार, 06/02/2015
आज... थरथरत्या नाजुक पानावरच दव तुझ्या ओठांची आठवण करून देतय आणि त्याच पानाची जमिनीकडे झुकलेली कडा तुझ्या लाज-या पापण्यांची. पानामगुन हळूच डोकावणार फुल म्हणजे तर मूर्तिमंत तूच. खिड़की पल्याड उभी राहून हळूच माझ्याकडे पहाणारी.... आज ही पहाट संपूच नये अस वाटतय. कारण खळाळणा-या झा-यामधून तुझ हासु एकु येतय. वडाच्या पानांना चुकवत जमिनीवर उतरलेली सूर्याची तिरीप तुझ्या अवखळपणाची आठवण करून देते आहे. जस निघायच्या घाईतही माझे डोळे तुला शोधतात आणि हे पक्क माहीत असलेली तू उगाच कामात असल्याच भासवातेस. हाय ... हा वाहणारा वारा... तुझ्या चेह-यावर झुकणा-या बटांशी खेळतोय जणु. ही पहाट... हा निसर्ग....इथे असणारा मी.... विरणार धुक... आणि माझी वेडी आशा ... कदाचित् तू आज तरी येशील!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3929
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

असले विचार मनात असलेला जर कुणी मिपाकर नवरा असेल तर त्याचा लकडी पुलाच्या मध्यावर जाहीर मुका घ्यायला आपण तयार आहोत!!! =))

In reply to by पिवळा डांबिस

असले विचार मनात असलेला जर कुणी मिपाकर नवरा असेल तर त्याचा लकडी पुलाच्या मध्यावर जाहीर मुका घ्यायला आपण तयार आहोत!!!
आणि मिपाकर नवरी असेल तर? दीज डेज एनी ओरिएन्टेशन इज पॉसिबल..!! ;)

In reply to by गवि

नवरी असेल तर मी स्वयंसेवक व्ह्यायला एका पायावर तयार आहे. ओरिएन्टेशनच नंतर बघु. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काय हो भलतेच उद्देश तुमचे.. तिची खणानारळाने ओटी भरीन असं अपेक्षित आहे या ठिकाणी उत्तर. संमेलनाहून आलेले दिसता..!!

In reply to by गवि

अरे अरे अरे गवि, याला म्हणतात चोराच्या मनात चांदण म्हणुन सांगतो संम्मेलनाला जायचे टाळत जाउ नका. पैजारबुवा,

धन्य आहात आपण.बादवे झारर्यातुन हसु गाळून ऐकू येईल का? मला लेखिका मोजींची बहिण आहे बहुतेक.

In reply to by मनिमौ

मस्त मस्त. झार्‍यातलं हसू मी पण वाचलं आणि हसत होते

आज 'पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न' (परत) वाचलं, अन त्यानंतर लगेचच हा लेखं वाचला, ……. छातीत कळ आली !

थरथरत्या नाजुक पानावरच - डेक्कन नाही पानाची जमिनीकडे झुकलेली कडा - एक हि पेठ नाही पानामगुन हळूच डोकावणार फुल - मंडई पण नाही खिड़की पल्याड उभी राहून हळूच.. - कर्वेनगर नाही वडाच्या पानांना…- येरवडा पण नाही खळाळणा-या झा-या(किंवा झऱ्या)मधून - संगमवाडी नाही ही पहाट... हा निसर्ग - छे छे हे पुणं नाहीच