✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अत्तरायण..! भाग - १

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 12/02/2014 - 18:17  ·  लेख
लेख
अत्तर म्हटलं..की.. रमझानचे दिवस आहेत. संध्याकाळची वेळ आहे.शाळेतल्या मित्रांच्या कंपूनी "दिवट्या...चल..आज मोमिनपुर्‍यात जायचय..यायचं हां तू...ते भटजी वगैरे गेलं तेल लावत.लै नाटकं नाय करायची" ..अशी धमकी मैत्री खात्यात दिलेली आहे.मी ही आज ते तहुरा कोल्ड्रिंक्स,तो इराणी श्टाइल चाय, ती मोठ्ठी तळलेली पोळि/पुरी आणि तो सत्यनारायणाच्या प्रसादाशी स्पर्धा करणारा शिरा, काळेजामुन्,डब्बल का मिठ्ठा,वेगवेगळे अरेबिक खजुर-(काहि अत्यंत गोड,पण तोंडात सालं चिकटवणारे,तर काहि अत्यंत मधाळ चवीचे..खाता खाता 'बी' कधी तोंडातून बाहेर आली,याचा पत्ताहि न लागू देणारे..), असं भरपूर चरल्यावर नंतर साधं पत्ता तंबाखुचं अत्यंत सालस किक देणारं पान चघळून झालेलं आहे..अश्यात पुढे एक सुरम्याचा श्टॉल लागतो आहे. मग साधा नाहितर स्पेशल सुरमा डोळ्यांना चढवून्,दोन्/तीन मिनिटं त्याच खुर्चीत डोळ्यांना थो......डं झोंबत गार गार वाटवत्,निपचीत त्या खुर्चीत पडून रहातो आहे..कडेनी मिनारावर लावलेल्या भोंग्यातून.... असदुल्ल लल्ला...आ...हु..अकबर... असे काहि तरी सूर कानावर पडत आहेत..सुरमेवाला पुढची गिर्‍हाइकं पाहाता..मला, अब उठो भै! ..म्हणतो आहे...

आणि....

तिथुन उठल्यावर पुढे मला एक अत्तराचा स्टॉल बोलावतो आहे.. हे चित्र अजुनंही दिसतं. माझी अत्तरांशी ओळख तशी सर्वसामान्यपणे लहानपणी होते ती झालेली होतीच. त्यातंही कोकणातल्या घरगुती सोहळ्यांमधले..लावलेल्या (आणि ल्यालेल्या.. ;) ..) अत्तरांचे काहि खास वास, मेंदूत रजिस्टरंही झाले होते.अजुनंही आहेत. पण अत्तरांशी दोस्ती सुरु झाली ती आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मधल्या मित्रांच्या टोळक्यामुळेच. म्हणजे आमच्या टोळीत कुणिही अत्तरांचा खासा शौकिन नाही. रमझानच्या सिझनला सगळे मोमिनपुर्‍यात जायचे ,ते प्रामुख्यानी खाटखुट खायलाच. पण त्यांचं खाणं,आणि माझं अत्तरांबरोबर गाणं,त्याच एका वक्ताला सुरु झालं.नंतर पुढे अशीच ३/४ वर्ष गेली. बाकिचे सर्व मित्र अनेक कारणानी बंद झाले.पण मी सुरु-राहिलो ते अत्तरांमुळेच. मोमिनपुर्‍यात मध्यभागी डाव्या बाजुला एक अत्तरांचा भला मोठ्ठा स्टॉल तेंव्हा लागायचा. अताही तो आहे,पण एका बाजुच्या कोपर्‍यात पानटपरी सारखा तो दिवंगत झालाय. बाँबस्फोट/हल्ले इत्यादी प्रकरणं सुरु झाल्यापासून,मोमिनपुर्‍यातला सगळाच तो जोस एकंदरीतच ओसरलेला आहे. पण तेंव्हा मात्र तो स्टॉल एखाद्या फटाक्यांच्या स्टॉल इतका मोठ्ठा असायचा. असाच एकदा मी रात्री ११ नंतर ,करंट आल्यासारखा मोमिनापुर्‍यात गेलो होतो.दिवस रमझानचेच होते..आधी गेल्या गेल्या ते तहुरा कोल्ड्रिंक्स वाल्याकडचं एक दाट दुध कोल्ड्रिंक लावलं,आणि बार मळत मळत..अत्तर वाल्याकडे गेलो. त्यानी गेल्या गेल्या पहिलं मजमुआचं फ्री सँपल माझ्या हातावर चढवलं. मीही मग ते गा....र श्वासासह ,बिडीचा झुरका मारवा तसं मनगटावरून नाकात-घेतलं आणि पहिली किक बसली. मग क्क्काय??? माझे दोन्ही हात भरेपर्यंत त्यानी त्या काचेच्या शलाकेनी माझ्या अंगावर मस्त रंगपंचमी केली. (करणार का नै मेला!? ;) मी त्याचं दरवर्षीचं ,संपूर्ण रमझान-मिळून्,चांगलं पाचशे ते हजाराचं-गिर्‍हाइक होतो! ) मग मी हिना ,जन्नत उल फिरदोस, मस्क, अशी काहि अत्तरं घेतली. और तब से ये सिलसिला शुरु रहा है,वो आजतक. त्यानंतरच्या दहा ते बारा वर्षांचा हिशेब पहाता मी अत्तरांच्या प्रांतात आज आहे, तो ही केवळ हौशी! शौकिन नाही..अट्टल शौकिन तर मुळीच नाही. कारण अत्तरांशी दोस्ती जमते..तशीच जमवत जावी.उगीच नसती सलगी करायला जाऊ नाही. नाहितर अत्तरांची नावं कळतात..अत्तरं काहि कळत नाहीत अशी अवस्था होते. अत्तरं हुंगावी नाकानी,वेध घ्यावा तो मेंदुनी आणि जानपेहेचान करवावी ती स्मृतींनी.. म्हणूनच मी माझी अत्तर ओळख मांडणार आहे ती स्मृतींच्या आधारे. :) १) हीना:- हे एक अत्यंत कॉमन अत्तर आहे. दाट वास असलेलं.त्यामुळेच ह्याचे जितके शौकिन सापडतात्,तितकेच तिरस्कार करणारेही अढळतात. माझ्या एका मित्रानी तर या अत्तराची 'पेश्ट कंट्रोलचं औषध" अशी संभावना केलि होती. त्यावर त्याची कंपुतल्या इतरांकडून..नरकात जाशील रे मेल्या... किडे पडतील किडे ( =)) ) अशी उलट संभावना झालेलीही मला अठवते. मी मात्र पहिल्यांदा हे अत्तर टेस्ट केलं ते एका खास प्रसंगात. पुणे वेदपाठ शाळेत शिकत असताना एकदा संध्याकाळी आमचा एक असाच अत्तरवेडा मित्र माझ्या समोर आला. आणि मला दम दिल्या सारखं.."हात कर पुढे!!!" असं म्हणाला मी गपगुमान मनगट त्याच्या कडे रोखलं. त्यानी एक अ‍ॅल्युमॅनिअमची छोटी बुधली काढली,आणि वरचं काळं-रबरी बुच बाजुला करून चांगलं बोटभर अत्तर माझ्या दोन्ही हातांना लावलं. मी ती बुधली उघडल्यापासूनच डोळे मिटले होते...असा काहि धुं................................द करणारा वास श्वासातून वहायला लागला होता,की बा...स! नंतर ते हाताला लागलेलं अत्तरं मी भुकेलेल्या माणसानी भराभरा गरम अन्नावर तुटून पडावं, तसं ५ मिनिटं नाकावरनं दोन्ही हात फिरवत आत घेतच राहिलो होतो. नंतर आमचा तो मित्र - " एकदम जहरी माल आहे,मला माहित होतं तुला लागू पडणार!" - असं म्हणून हसत हसत(तो हसला का ते माहित नाही अजुनंही..दुष्ष्ट! :-/ ..) तो तसाच निघून गेला. नंतर मला कळलं की ते 'हीना' त्यानी खास लखनौ का कुठून तरी मागवलं होतं. अजुनंही मला थंडीचे दिवस आले की ज्या अत्तरांची अठवण होते..त्यातलं हे एक आहे.. हीना... ग्गार हवेवर याचा भरभरून वास घेतल्या नंतर का कोण जाणे प्रचंड उबदार वाटतं... आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा... इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। ==================== क्रमशः....
  • अत्तरायण..! भाग - २
  • अत्तरायण..! भाग - ३

Book traversal links for अत्तरायण..! भाग - १

  • अत्तरायण..! भाग - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
29839 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

@वेदांत, पद्मावति , झेन ›››

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/30/2016 - 11:14 नवीन
@वेदांत, पद्मावति , झेन ››› धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

मारवा
Sun, 07/31/2016 - 19:11 नवीन
लेख आवडला बाकी सुगंधाने स्त्रीया आकर्षीत होतात वगैरे अजुन तरी अनुभवलेले नाही. अर्थात माझी मर्यादा
  • Log in or register to post comments

मला अत्तरांबद्दल विशेष ज्ञान

निखिल निरगुडे
Mon, 08/01/2016 - 00:01 नवीन
मला अत्तरांबद्दल विशेष ज्ञान नसून देखील तुमच्या लेखनामुळे वाचायला मजा अली.. मस्त!
  • Log in or register to post comments

अरे वा!

चतुरंग
Mon, 08/01/2016 - 00:30 नवीन
आत्मुगुर्जींची ही सुगंधयात्रा वाचायची राहूनच गेलेली! सुवासिक लिहिलं आहे. मलाही अत्तरं आवडतात परंतु नैसर्गिक आणि मंद सुगंधाची.
  • Log in or register to post comments

हायला

चाणक्य
Mon, 08/01/2016 - 11:06 नवीन
हे राहूनच गेलं होतं. गुर्जी फुडचं लिवा की. ३च भाग ?
  • Log in or register to post comments

+१

वेदांत
Mon, 08/01/2016 - 11:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा