Skip to main content

पाण्यासारखी...

पाण्यासारखी...

Published on सोमवार, 24/11/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा मी तुला म्हटलं, तू आहेस पाण्यासारखी... जो रंग टाकावा, तो सामावून घेणारी, रंगाच्याही नकळत रंगासारखी रंगणारी... आज पुन्हा आठवतंय, आज पुन्हा ते पटतंय पण संदर्भ किती वेगळा... पाणीसुद्धा काही वेळा किती कोरडं असतं मिसळू पाहणारं बरंच काही त्याच्यासाठी उपरं असतं... खरंच तू पाण्यासारखी आहेस खरंच, आज पुन्हा पटलं नकळत किती खरं सांगितलं मी नवल? दु:ख मनात दाटलं...
लेखनविषय:

याद्या 1325
प्रतिक्रिया 3

कदचित हा स्वतःशी तटस्थ संवाद असावा का?

छान!