Skip to main content

गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

लेखक आरोही यांनी बुधवार, 19/11/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम . कृती : सर्व प्रथम गाजर धुवून ,त्याची साले काढून ,किसून घ्यावे . एका कढाई मध्ये साजूक तूप घालून त्यात गाजराचा कीस टाकावा . थोडा रंग बदले पर्यंत परतावा ,साधारण ५ मिनिटे . नंतर त्यात condensed milk आणि साखर टाकून परतावे २ मी .परतावे मिश्रण थोडे पातळ होईल ते घट्ट होईपर्यंत परतावे आणि शिजू द्यावे .. मिश्रण शिजत आले आहे आहे असे वाटले कि त्यात डेसिकेटेड कोकोनट टाकावे ,अजून २ मी .परतून आच बंद करून मिश्रण गार होण्यासाठी एका ताटात काढावे . मिश्रण चांगले गार झाले कि त्यात मिल्क पावडर टाकुन एकजीव करावे आणि त्याचे लाडू वळून हवे तसे सजवावे . वर बदामाचे काप लावावेत . 1 साखर किवा c.मिल्क आपापल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करता येईल . डेसिकेटेड कोकोनट अजून उरले असल्यास त्यात ते लाडू घोळवून घ्यावेत .इ मी हा पदार्थ लेकाच्या शाळेतील स्पर्धेसाठी केला असल्याने जरा वेगळ्या रीतीने सजवला आहे .आणि येथे द्यायचे नक्की नसल्याने जास्त फोटो नाही काढले .. नेहमीच्या गाजर हलव्या पेक्षा थोडी वेगळी पण छान पण वेगळी चव सगळ्यांना आवडतेच . *smile* 2

वाचने 12145
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

खोबरं घातलेला गाजर हलवा खाल्ला आहे. छान लागतो. ही लाडूही छानच असणार! सादरीकरण अप्रतिम, आणि त्यावर खूपच मेहनत घेतली आहे तुम्ही. त्यामानाने फोटो तितका चांगला नाही आला.

गाजराचा हलवा अन खोबरे असलेले लाडू खूप आवडतात. ही पाकृ रोचक आहे. कल्पक सादरीकरण आवडले.