हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
का?
१०००% सहमत. सक्ती विरोधात
इतकाच वाहतूक कायद्याचा आदर
इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती.बाकी काहीही असो. या वाक्याला कडकडून टाळ्या.हे हे हे
आतापर्यंतची निरीक्षणे
म्युच्युअली एक्स्क्लुसिव?
येते ना!
तुमचे पर्सेप्शन थोडे चुकले आहे.
जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल
जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल.हल्ली पुण्यात अश्याच प्रकारे गाडी चालवावी लागते... जरा इस्काटून... पुण्यात गाडी चालवताना, स्वतः नियम पाळण्याची जेवढी खबरदारी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक "दुसरा कोणीतरी नियम मोडणारच आहे तेव्हा तिकडे ल़क्ष देवून अपघात टाळण्याची खबरदारी घ्यावी लागते.", हा स्वानुभव आहे.+१
मी पुण्यातच
>>कशाला विरोध करावा याचा काही
>>हेल्मेट्ला विरिध करणारे
सरळ
अंमळ दुरुस्ती.
कोण भाईकाका?
आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर
अगदी बरोबर
सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून
पाताळही उलटे पाहिल्यास
पाताळात पाहिल्यावर काय दिसणार म्हणा
तुमचा मुलगा हेल्मेट वापरत
जर एखादा सगळे नियम पाळतो,
हेल्मेट न वापरता मेला तर
आनंद आहे
आता पैसे भरायला लागल्यावर
आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच? (जाताजाता- माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो).पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर?हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.जरा तर कॉमन सेन्स वापरा की.यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.पैशाबद्दल कुणी विचारलंय का?
माझा सल्ला
+१
उत्तरे !
ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय?कळवळा ? हेल्मेट सक्तिच काय , सरकारला जनतेच्या कोणत्याच गोष्टिविषयी कळवळा नाही ,म्हणून मग सगळेच नियम धाब्यावर बसविणार का ?कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?असू देत की ! सरकार ने आपल्या जवळच्या अनेकांचे अनेकवेळा भले केले आहे तेव्हा नाही तुमच्या पोटात दुखले ? आणि तुम्ही बनवा की स्वस्त , टिकाऊ , आय एस आइ मार्क वाले हेल्मेट ? कुणी मना केली आहे का ?रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय?नाही , पण जीव वाचण्याची , कमी इजा होण्याची शक्यता वाढते. छत्री बाळगल्याने पाऊस थांबत नाही , तुमचे डोके भिजत नाही.+१०००००
(No subject)
चक्क प्रकाका लिहते झाले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipरिक्शा वाल्यांना तर xxxxx..
विरोध सक्तीला नाही
हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट
+१ सहमत
...
अस्स
शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ
हे बाकी कळतच्च नाहीये
नियम विदाउट सक्ती कसा काय असू
आमचा नियम रद्द करायला विरोध
सुरक्षिततेला अग्रक्रम असावा.
...
होय.
पण मला मुळात हेच कळले नव्हते
अतिशय पटले
+१
अनेक जण अनुभव सांगत आहेत त्याप्रमाणे