Skip to main content

एक उदास कंटाळवाना चेहरा

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 07/11/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पाने गळू लागलीत झाडांची हवा वाहत असते नको तितक्या वेगाने थरथरत राहतात त्याच्या खिडकीवरचे पडदे दरवाजा बंद असला तरी हवा टकटकत बसते दारावर एक उदास वातावरण झपाटून टाकते मनाला बाहेर प्रकाश असून अंधारून गेलेला दिवसा देखील कानांना येत राहतो रातकिड्यांचा आवाज उगाचच एखादं पाखरू वळचणीला एखादं पान गळणा-या फांदीवर घट्ट बसून रुतलेलं काळ्या काळ्या फांदीच्या बोटाना धरून बसलेलं आवळून टाकलाय गळा आपल्या निष्टुर हातानी तरीही तो स्वताला ढकलीत रहातो पर्णहीन झाडाची पायवाट अंगावर शिरशिरी नि नाक झडून गेल्याचा भास तळे शुभ्र एक उदास तवंग त्याच्या अंगावर मृत होताना ताठरून जाते जसे एक जनावर एक घट्ट साय जमलीय तळ्याच्या डोळ्यात आणि साचून गेलीय एक घट्ट भीती शप्पत मनात कसा एक उदास चेहरा आलाय माझ्या समोर ह्या देशाचा तो आठवीत बसतो त्याच्या देशातील हवा ती सुखद थंडी कोप-यावरच्या मारुतीच्या देवळातील संध्याकाळचा दिवा ती टणकन वाजणारी घंटी शप्पत … ह्या एकांतात मनाला फक्त तेवढाच एक आधार .....!! प्रकाश
लेखनविषय:

वाचने 1095
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

प्रतिमांच्या सुयोग्य वापराने कविता परिणामकारक झाली आहे. कविता आवडली. अवांतर (ह. घ्या) : मुपि वरील आम्रविका, परदेश प्रवास ( अन अर्थातच मुपिवरील लेखांचे आमचे आद्य विडंबन ( ही आमची झैरात बरं का!) आठवले.