आजोबा जर कागद असते तर
त्यानं त्यांची नाव केली असती
आजोबा जर डोंगर असते तर
त्याने खोल उडी घेतली असती
आजोबा अंगणात उभे असले की
त्याला चक्क झाड वाटतात
हाताच्या फांदीला लोंबकाळलं की
आजोबा चक्क झोका होतात
झोका घेताना
तो कधीच घाबरत नाही
डोळे मिचकावून
बघितले की
भीती कसली वाटत नाही ….
आजोबा काही काम करताना
करतो त्यांचं लक्ष विचलित
घुसळतो अंग नि अंग
हलकेच घुसतो मिठीत ....
आजोबांना वाटून जाते
तो .म्हणजे ..
मी आहे ...?
का …
मी म्हणजे….
तो आहे .....??
मग
फुटून जातो मायेचा पाझर
आजोबांच्या काळजातून ....
आणि आजोबा बघू लागतात
मायेच्या पाझरणा-या झ-याला
आपल्याच रक्तातून …!!
प्रकाश
| लेखनविषय: |
|---|
वाचने
964
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर