कालातीत घोडदौड

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in भटकंती
2 Nov 2014 - 12:58 am

हेच वर्णन माझ्या ब्लॉगवर इंग्रजीमध्ये येथे वाचता येईल.

*****
जम्मू भागातील पीरपांजाल पर्वतरांगात फिरताना जर्जर रस्त्यांमुळे हाडे खिळखिळी होत असली, तरी चकित करणारे अनुभवही येतात.

Map

*****
यापूर्वी या भागाबद्दल लिहिलेले फुटकळ काही:

आडवाटेवरील रियासी

चिनाब रेल्वे पूल

****
या भागात घोडा गली (मराठीत घोडखिंड म्हणायला हरकत नाही) हे नाव अनेकदा ऐकण्यास मिळते. कारण ही एखादी विशिष्ट गल्ली (खिंड) नसून, एक सामान्य नामच आहे. दगडाचे प्राचीन घोडे आणि घोडेस्वार हे या खिंडींमधून कुण्याकाळी उभे करण्यात आले होते. पूर्वी या सर्व खिंडींमधून पायी अथवा घोड्यांवरून जाण्याचे मार्ग होते. त्यापैकी काही खिंडी गाडीरस्त्यांनी जोडल्या गेल्या आहेत. पण अनेक खिंडी दुर्गम भागात गावोगाव पसरलेल्या आहेत. तिथे पोचणे दुरापास्त असून, तासनतास चालल्याशिवाय गत्यंतर नाही.

यातील बहुतेक घोडे हे दुर्लक्षित आणि भग्न अवस्थेत आहेत. कधीकधी अचानक एखाद्या गावातील पाणवठ्यावर एखादा 'घोडा' कपडे धुण्यासाठी उपयोगात आणलेलाही दिसतो. शिवाय, हा भूप्रदेश आता जवळजवळ संपूर्णपणे मुस्लिम झालेला आहे. त्यामुळे बहुधा या 'हिंदू' शिल्पांचा स्तर खालचा मानला जात असावा.

हे शापित घोडे आणि स्वार अनंतकाळपासून कुणाची वाट पाहत आहेत, हे कोडे आहे. मला तरी असे वाटले की या केवळ दिशादर्शक खुणा असाव्यात.

मी पाहिलेल्या दोन घोडा गल्ल्या:

*****
१. जमसलान गावाजवळ

माहोर - गुल रस्त्यावर असलेल्या या लहानशा गावाजवळ ही खिंड आहे. ही पाहाण्यासाठी सुमारे पाऊण तास चालत (चढत) जावे लागते.

Ghoda Gali near Jamsalan 1

Ghoda Gali near Jamsalan 2

Ghoda Gali near Jamsalan 3

Ghoda Gali near Jamsalan 4

*****
२. गुल शहराजवळ

ही गल्ली गुल - रामबन रस्त्याला लागूनच आहे. येथील घोडे थोड्या मोठ्या आकाराचे आहेत. पहिल्या छायाचित्रात ठेवलेल्या पेनची मदत घेऊन आकाराचा अंदाज लावता येईल.

Ghoda Gali near Gul 1

Ghoda Gali near Gul 2

Ghoda Gali near Gul 4

Ghoda Gali near Gul 5

जलकुंड

Ghoda Gali near Gul 3
*****

कसे पोचावे:- जम्मू - श्रीनगर हमरस्त्याने रामबनपर्यंत जावे. तिथून गुलच्या दिशेला डावीकडे वळावे. रामबन - गुल अंतर सुमारे ६० कि.मी.

जवळ इतर पाहण्याजोगे:- वर दिलेले दुवे वाचावेत.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

2 Nov 2014 - 7:02 am | खटपट्या

फोटो फार धुरकट आले आहेत. घोड्यांबद्द्ल अजुन माहीती मिळाली असती तर बरे झाले असते.
वल्लींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

मलाही याबाबतीत काहीच माहित नाहीपण साधारण १० व्या शतकात हे घोडे कोरले गेले असावेत.

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2014 - 4:41 pm | चलत मुसाफिर

पावसाची संततधार आणि दाट धुके अशा वातावरणात चिखल तुडवीत पर्वत चढून जाऊन काढलेले फोटो असल्यामुळे धूसर येणे स्वाभाविक आहे. जमसलान गावाचे फोटो तसे आहेत. पण गुल शहरानजिकचे फोटो स्पष्ट दिसत आहेत असे वाटते.

मुक्त विहारि's picture

2 Nov 2014 - 5:52 pm | मुक्त विहारि

आमचा गणेशा झाला.....

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2014 - 4:42 pm | चलत मुसाफिर

समजलो नाही.

कपिलमुनी's picture

3 Nov 2014 - 5:00 pm | कपिलमुनी

त्यांना फोटो दिसत नाहीत

अद्भूत आहे ठिकाण तितकेच गूढही.

एका वेगळ्याच जगात गेल्यागत वाटले. घोडगळही एकदम मस्ताड आहेत. लैच आवडले.

बॅटमॅन's picture

3 Nov 2014 - 12:05 am | बॅटमॅन

गूढ वाटायचे अजूनेक कारण म्हणजे ते 'भारतीय' असे वाटत नाही. (*) युरोपियन गूढ स्टाईलगत वाटते. अंमळ ब्रेव्हहार्ट पिच्चरची आठवण झाली फोटो पाहून.

(*)म्हणजे काय अन कसे, ते तेवढे विचारू नका. वाटले तेवढे सांगितले.

थॉर माणूस's picture

3 Nov 2014 - 5:11 pm | थॉर माणूस

घोड्यावर ट्रीपल सीट... नक्कीच भारतीय आहेत. ;)

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2014 - 5:50 pm | चलत मुसाफिर

*lol* *lol* *lol*
आपला मुद्दा विचारार्ह आहे.

पण ही शिल्पे ग्रीक शैलीतली असल्यासारखी वाटतात का? जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.

आदूबाळ's picture

3 Nov 2014 - 12:10 am | आदूबाळ

इंट्रेस्टिंग!

मृत्युन्जय's picture

3 Nov 2014 - 12:58 pm | मृत्युन्जय

हे असे काही भारतात आहे हेच माहिती नव्हते. पुरातत्व खाते नक्कीच झोपा काढते आहे आणि पर्यावरण खातेही. युरोपात आत्तापावेतो केवळ याच्यासाठी एक टुर आयोजित केली गेली असती.

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2014 - 4:47 pm | चलत मुसाफिर

या सर्व जागा मुद्दाम पहाण्यायोग्य आहेत यात शंकाच नाही. पण खराब रस्ते, लांब अंतरे, कठीण पर्वतीय भाग, दुष्कर पायी चढाई आणि सोयीसुविधांचा संपूर्ण अभाव यामुळे मौजमजा करायला आलेला पर्यटक इकडे वळणे जरा मुश्किलच आहे. कदाचित काश्मीर रेल्वे सुरू झाल्यावर चित्र बदलेल (या प्रस्तावित रेल्वेमार्गावरील धाडम रेल्वे स्टेशन हे गुल शहराच्या जवळ आहे).

कवितानागेश's picture

4 Nov 2014 - 8:30 am | कवितानागेश

हे असे काही भारतात आहे हेच माहिती नव्हते.>> +१
एकदम वेगळा प्रकार पहायला मिळाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2014 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेगळाच प्रकार सहमत.

-दिलीप बिरुटे

खरच असल काही आहे भारतात हेच माहीत नव्हत.
त्या जलकुंभातला एक अजून पाणी सांडतो आहे. किती सुंदर!!

चुकलामाकला's picture

7 Nov 2014 - 8:10 am | चुकलामाकला

आयला , एकदम नविन. तुमची पण कमाल आहे , कसे शोधुन काढलेत हे ठिकाण ?

मदनबाण's picture

10 Nov 2014 - 10:02 am | मदनबाण

अजुन माहिती वाचायला आवडली असती. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 4:57 pm | चलत मुसाफिर

कलम 370 गेले आणि काश्मीर केंद्रशासित झाले. आता त्यालाही सहाआठ महिने होऊ घातले. निमित्ताने धागा पुन्हा वर काढावा म्हणतो.. :-)

किल्लेदार's picture

7 Apr 2020 - 9:24 pm | किल्लेदार

आणि इंटरेस्टिंग पण. बघायला हवे. जम्मू ते श्रीनगर प्रवास कधी झाला नाही.

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 11:20 pm | चलत मुसाफिर

जम्मू- कटडा- रियासी- माहोर- गुल- उधमपूर असा रस्ता घ्यावा लागेल. बराच जास्त लांब आणि कठीण रस्ता आहे. पर्यटकांना राहण्यासाठी या भागात (कटडा वगळता इतरत्र) काहीच सोयी नाहीत.

जम्मू- उधमपूर जो सरळ रस्ता आहे तो मात्र आता संपूर्ण चौपदरी झाला आहे.

मनो's picture

8 Apr 2020 - 12:03 am | मनो

माहीती इथे आहे
https://scfh.ru/en/papers/riders-lost-in-the-himalayas/

Undoubtedly, the monuments date from the pre-Muslim period of the region’s history though they are neither Buddhist nor Hindu. We are facing an entirely original cultural layer supposedly belonging to a “dark” period of Indian history connected with the Hephthalite conquest and rule (5th to 7th cc.). This ethnicity was as enigmatic as it was powerful and left a detectable trace in the history of both Central Asia and India.

पुढे

In order to explain why we think that the stone statues of horsemen could be attributed to the Hephthalite culture, let us turn to the statues themselves.

The first thing that catches your eye at once is that all the riders have the same face. To convey the image of a warrior, the unknown masters created a character that embodies the warrior host in their entirety by personifying the most typical and marked features. The flatly cut napes of all the men figurines may reflect a typical anthropological trait of the population – ​the so-called ring, or fronto-occipital deformation. This type of artificial deformation was characteristic of the Central Asian peoples in the early 1st c. This regional tradition was domesticated by the nomads known by the collective name of the Huns, who then spread it around Europe and India.