कालातीत घोडदौड
हेच वर्णन माझ्या ब्लॉगवर इंग्रजीमध्ये येथे वाचता येईल.
*****
जम्मू भागातील पीरपांजाल पर्वतरांगात फिरताना जर्जर रस्त्यांमुळे हाडे खिळखिळी होत असली, तरी चकित करणारे अनुभवही येतात.
*****
यापूर्वी या भागाबद्दल लिहिलेले फुटकळ काही:
आडवाटेवरील रियासी
चिनाब रेल्वे पूल
****
या भागात घोडा गली (मराठीत घोडखिंड म्हणायला हरकत नाही) हे नाव अनेकदा ऐकण्यास मिळते. कारण ही एखादी विशिष्ट गल्ली (खिंड) नसून, एक सामान्य नामच आहे. दगडाचे प्राचीन घोडे आणि घोडेस्वार हे या खिंडींमधून कुण्याकाळी उभे करण्यात आले होते. पूर्वी या सर्व खिंडींमधून पायी अथवा घोड्यांवरून जाण्याचे मार्ग होते. त्यापैकी काही खिंडी गाडीरस्त्यांनी जोडल्या गेल्या आहेत. पण अनेक खिंडी दुर्गम भागात गावोगाव पसरलेल्या आहेत. तिथे पोचणे दुरापास्त असून, तासनतास चालल्याशिवाय गत्यंतर नाही.
यातील बहुतेक घोडे हे दुर्लक्षित आणि भग्न अवस्थेत आहेत. कधीकधी अचानक एखाद्या गावातील पाणवठ्यावर एखादा 'घोडा' कपडे धुण्यासाठी उपयोगात आणलेलाही दिसतो. शिवाय, हा भूप्रदेश आता जवळजवळ संपूर्णपणे मुस्लिम झालेला आहे. त्यामुळे बहुधा या 'हिंदू' शिल्पांचा स्तर खालचा मानला जात असावा.
हे शापित घोडे आणि स्वार अनंतकाळपासून कुणाची वाट पाहत आहेत, हे कोडे आहे. मला तरी असे वाटले की या केवळ दिशादर्शक खुणा असाव्यात.
मी पाहिलेल्या दोन घोडा गल्ल्या:
*****
१. जमसलान गावाजवळ
माहोर - गुल रस्त्यावर असलेल्या या लहानशा गावाजवळ ही खिंड आहे. ही पाहाण्यासाठी सुमारे पाऊण तास चालत (चढत) जावे लागते.
*****
२. गुल शहराजवळ
ही गल्ली गुल - रामबन रस्त्याला लागूनच आहे. येथील घोडे थोड्या मोठ्या आकाराचे आहेत. पहिल्या छायाचित्रात ठेवलेल्या पेनची मदत घेऊन आकाराचा अंदाज लावता येईल.
जलकुंड
*****
कसे पोचावे:- जम्मू - श्रीनगर हमरस्त्याने रामबनपर्यंत जावे. तिथून गुलच्या दिशेला डावीकडे वळावे. रामबन - गुल अंतर सुमारे ६० कि.मी.
जवळ इतर पाहण्याजोगे:- वर दिलेले दुवे वाचावेत.

वाचने
13044
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
फोटो फार धुरकट आले आहेत.
In reply to फोटो फार धुरकट आले आहेत. by खटपट्या
मलाही याबाबतीत काहीच माहित
In reply to फोटो फार धुरकट आले आहेत. by खटपट्या
धुके
फोटो बाबत
In reply to फोटो बाबत by मुक्त विहारि
??
In reply to ?? by चलत मुसाफिर
फोटो
अद्भूत आहे ठिकाण तितकेच गूढही
एका वेगळ्याच जगात गेल्यागत
In reply to एका वेगळ्याच जगात गेल्यागत by बॅटमॅन
गूढ वाटायचे अजूनेक कारण
In reply to गूढ वाटायचे अजूनेक कारण by बॅटमॅन
घोड्यावर ट्रीपल सीट... नक्कीच
In reply to घोड्यावर ट्रीपल सीट... नक्कीच by थॉर माणूस
मुद्दा पटला...!
इंट्रेस्टिंग!
हे असे काही भारतात आहे हेच
In reply to हे असे काही भारतात आहे हेच by मृत्युन्जय
पर्यटन
हे असे काही भारतात आहे हेच
माहितीपूर्ण.
खरच असल काही आहे भारतात हेच
आयला , एकदम नविन. तुमची पण
अजुन माहिती वाचायला आवडली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }370 गेले
वेगळेच आहे
In reply to वेगळेच आहे by किल्लेदार
हा रस्ता वेगळा
माहीती इथे आहेhttps://scfh.ru